सासू-सासरे लग्नाला गेले, घरात पती-पत्नी, मोठा वाद उफाळला, त्याने बायकोचा जीवच घेतला, नेमकं काय घडलं?

मिरज शहर आज एका हत्येच्या घटनेनं हादरलं आहे. विशेष म्हणजे एका पतीनेच आपल्या पत्नीची हत्या केली आहे.

सासू-सासरे लग्नाला गेले, घरात पती-पत्नी, मोठा वाद उफाळला, त्याने बायकोचा जीवच घेतला, नेमकं काय घडलं?
मिरजेत पतीकडून पत्नीची निघृण हत्या

सांगली : मिरज शहर आज एका हत्येच्या घटनेनं हादरलं आहे. विशेष म्हणजे एका पतीनेच आपल्या पत्नीची हत्या केली आहे. पती-पत्नीमध्ये वाद झाला होता. याच वादातून त्याने रागाच्या भरात पत्नीला चाकून भोसकून तिची हत्या केली. पती-पत्नीमध्ये नेमका काय वाद झाला, त्यांच्या वादामागे नेमकं काय कारण होतं हे अद्याप समजू शकलेलं नाही. हत्या करणारा पती हा सध्या फरार आहे. त्यामुळे या हत्येमागील खरं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पोलीस आरोपी नवऱ्याचा शोध घेत आहेत. पण या हत्येच्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. पती आपल्या पत्नीला इतक्या निघृणपणे मारहाण करुन तिची हत्या कशी करु शकतो? असा सवाल आता उपस्थित केला जातोय.

महिलेच्या पतीचा शोध सुरु

संबंधित घटना ही सांगली जिल्ह्यातील मिरज शहरात टाकडी रोडवर शिवम पार्क येथे आज (18 जुलै) घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेचा मिरज शहर पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलीस महिलेच्या सासू-सासऱ्यांचा जाबबही नोंदवणार आहेत. तसेच महिलेच्या पतीचा शोध घेणार आहेत. आरोपी पतीचं नाव चेतन असं आहे. तर त्याच्या मृतक पत्नीचं नाव पूजा आहे.

नेमकं काय घडलं?

चेतन याचा टेलरिंग व्यवसाय आहे. पूजा ही गृहिणी आपल्या पती, तीन मूलं आणि सासू-सासऱ्यासोबत शिवम पार्क येथे राहायला होती. भंगार व्यवसाय करून सासू-सासरे कुटुंब चालवतात. दरम्यान, सासू-सासरे दोघे आज लग्न कार्याला बाहेर गेले होते. यावेळी पती आणि पत्नीमध्ये वाद झाला.

यावेळी चेतन याने पत्नी पूजा हिला चाकूने भोकसले. त्याने चाकूने पूजा हिच्या शरीरावर चार वार केले. गंभीर जखमी झाल्याने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. पण रक्तस्त्राव जास्त झाल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर चेतन हा फरार झाला आहे. याप्रकरणी मिरज शहर पोलीस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा :

भावालाही मुलगी झाली, आपल्या लेकीचे लाड कोण करणार? यवतमाळमध्ये नणंदेने वहिनीला जाळले

जगावेगळी चोरी! तलावातून चोरले तब्बल 5 लाखांचे मासे, चौघांविरोधात तक्रार, पोलीसही चक्रावले

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI