AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हुंड्याचे राहिलेले 1 लाख 60 हजारांसाठी सासरच्यांकडून जाच, तुळजापुरात विवाहितेची आत्महत्या

हुंड्यासाठी राहिलेले 1 लाख 60 हजार न दिल्याने सासरची मंडळी प्रियाचा जाच करायची. तिला मारहाण करायची, अशी माहिती आहे. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात कलम 306, 34 नुसार नवरा, सासू , सासरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हुंड्याचे राहिलेले 1 लाख 60 हजारांसाठी सासरच्यांकडून जाच, तुळजापुरात विवाहितेची आत्महत्या
आत्महत्या प्रातिनिधिक छायाचित्र
| Edited By: | Updated on: Oct 23, 2021 | 3:10 PM
Share

उस्मानाबाद : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना उस्मानाबादेत घडली आहे. तुळजापूर शहरातील प्रिया घोडके नावाच्या महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

हुंड्यासाठी राहिलेले 1 लाख 60 हजार न दिल्याने सासरची मंडळी प्रियाचा जाच करायची. तिला मारहाण करायची, अशी माहिती आहे. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात कलम 306, 34 नुसार नवरा, सासू , सासरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लग्नानंतर तरुणीची अवघ्या 20 दिवसांत आत्महत्या

एका तरुणीने आपल्या कुटुंबियांचा विरोध असताना आपल्या प्रियकरासोबत लग्न केलं. पण लग्नानंतर अवघ्या 20 दिवसांत तिने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे संबंधित परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे मृतक तरुणीचा पती हा तिच्या मृत्यूनंतर बेपत्ता झाला आहे. त्याच्या वागणुकीमुळेच तरुणीने आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. पोलीस आरोपी पतीचा शोध घेत आहेत.

नेमकं प्रकरण काय?

संबंधित घटना ही दिल्लीच्या पटेल नगर भागात घडली आहे. मृतक तरुणीचं नाव नेहा चौहान असं आहे. तर आरोपी पतीचं राहुल बाथम असं नाव आहे. विशेष म्हणजे मृतक नेहा आणि आरोपी राहुल यांची तीन महिन्यांपूर्वीच ओळख झाली होती. नेहा शहरातील एका शोरुमजवळील एका खासगी कार्यालयात नोकरी करायची. कार्यायलात येता-जाताना तिची ओळख राहुलसोबत झाली. त्यांच्यात चांगली मैत्री झाली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

नेहा आणि राहुल यांनी दोघांनी लग्न करण्याचं ठरवलं. पण नेहाच्या कुटुंबियांचा लग्नाला विरोध होता. पण कुटुंबियांचा रोष पत्कारत नेहाने राहुलसोबत एका मंदिरात लग्न केलं. दोघांचं लग्न 22 ऑगस्ट रोजी झालं. पण लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी राहुलची वागणूक बदलली. तो तिला मारहाण करु लागला. यानंतर पती-पत्नीत वारंवार वाद होऊ लागला. राहुल हा दारु पित असल्याचं नेहाला लग्नानंतर कळालं. राहुलकडून सातत्याने सुरु असलेल्या छळाला कंटाळून नेहाने अखेर 12 सप्टेंबरला आत्महत्या केली. आत्महत्येच्या आधीच्या रात्री नेहाचं पती राहुलसोबत कडाक्याचं भांडण झालं होतं. त्यानंतर दोघं घरात झोपले होते. पण दुसऱ्या दिवशी सकाळी राहुलला जाग आली तेव्हा घरात नेहाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्यानंतर राहुल फरार झाला.

संबंधित बातम्या :

अमरावतीत आर्थित विवंचनेतून शेतकऱ्याच्या मुलीची आत्महत्या, मन सुन्न करणारी सुसाईड नोट समोर

पत्नीसोबत वादानंतर पतीची आत्महत्या, घाटात झाडाला गळफास, पुण्यात खळबळ

पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.