पतीने बायकोला बॉयफ्रेंडसह रंगेहाथ पकडले, भर बाजारात ते दोघं …

एक महिला तिच्या प्रियकरासोबत बाईक वर बसून बाजारात फिरत होती. तेवढ्यात तिच्या पतीने तिला पाहिल्याने सुरू झाला मोठ्ठा गोंधळ..

पतीने बायकोला बॉयफ्रेंडसह रंगेहाथ पकडले, भर बाजारात ते दोघं ...
husband cheats wife
Follow us
| Updated on: Jun 20, 2023 | 4:19 PM

पाटणा : पती, पत्नी और वो… हे तर आपण बऱ्याच वेळेस ऐकालं आहे. पण काहीवेळा पती-पत्नी येणारा वो हा एखादा पुरूषही असू शकतो. पत्नीचा तो मित्र पतीला समजला की सुरू होतो मोठ्ठा गोंधळ… अशीच काहीशी स्थिती एका गावात पहायला मिळाली. जिथे एक विवाहीत महिला माहेरी जाण्याच्या बहाण्याने तिच्या प्रियकरासोबत (married woman with boyfriend) भर बाजारात फिरत होती. अन् तेवढ्यात तिच्या पतीने (husband caught cheating) त्या दोघांनाही रंगेहाथ पकडलं. मग पुढे काय झालं ? रस्त्यावर सर्वांना हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला.

बिहारच्या जमुई येथील ही घटना पाहून सर्वच अवाक् झाले. येथील जिल्हा मुख्यालयातील जुन्या बाजारात एका विवाहितेला तिच्या प्रियकरासह दुचाकीवरून फिरताना पकडण्यात आले. मात्र पकडले गेल्यावरही ती महिला निर्लज्जपणे पतीसमोर खोटे बोलू लागली. आधी तिने सांगितले की बाईक चालवणारा तरुण तिचा मेहुणा आहे, पण नंतर तिने तिच्या पतीवरच घरगुती हिंसाचार आणि छळाचा आरोप केला. वाद वाढल्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत दोघांना समज देऊन शांत केले. मात्र पती पत्नीच्या दरम्यानचे हे प्रकरण आता गावभर चर्चेचा विषय ठरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोविंद पंडित हे भाटाचक येथील रहिवासी आहेत. 2021 साली त्यांचा विवाह नीतू कुमारी हिच्यासोबत विवाह झाला होता. लग्नानंतर सुरुवातीचा काही काळ सगळं काही ठीक सुरू होतं, पण हळूहळू सर्व काही बिघडू लागले.

एके दिवशी गोविंद यांची पत्नी माहेरी जात असल्याचे सांगून तिच्या घरी गेली. नंतर काही दिवसांनी एका कामानिमित्त गोविंद हे जमुई येथे आले होते. तेथे त्यांनी पत्नी नीतू हिला दुसऱ्या तरुणासोबत बाईकवरून जाताना पाहिले. त्यांनी त्या दोघांचा पाठलाग केला आणि त्या दोघांनाही जुन्या बाजारा जवळ पकडले.

पकडले गेल्यावरही नीतू जराही घाबरली नाही. उलट प्रियकराच्या प्रेमात वेडी झालेली ती एकामागोमाग एक असं खोटं बोलू लागली. आपण आजारी असून उपचारासाठी आल्याची थाप तिने सुरुवातीला मारली. मात्र गोविंदने थोडं खडसावून विचारले असता ती अजून एक खोटं बोलली. बाईक चालवणारा चरूण हा तिचा मेव्हणा असल्याचे बेमालूम खोटं सांगितलं. परंतु त्यांना हेही पटले नाही तेव्हा तिने भर बाजारात कांगावा करत गोविंद यांच्यावरच घरगुती हिंसाचाराचा आरोप केला.

पती दारू पिऊन मारहाण करत असल्याचा महिलेने केला आरोप

या सगळ्यानंतर नीतूने एक बनावट कहाणी रचली. नीतूने सांगितले की, तिचा पती गोविंद पंडित दारू पितो आणि भांडतो, मारहाण करतो. म्हणूनच तिला त्याच्यासोबत राहायचे नाही. एवढेच नव्हे तर आपल्या आईने आपला विवाह दुसऱ्या मुलाशी ठरवल्याचे सांगत, आपण त्याच तरूणासोबत बाईकवर फिरत असल्याचेही तिने स्पष्ट केले. आणि तिने सरळ पतीसोबत घरी जाण्यास नकार दिला.

भर रस्त्यात हा सर्व वाद सुरू होता, ते पाहून कोणीतरी पोलिसांना वर्दी दिली. घटनास्थळी पोलिसांनी दोघांमध्ये मध्यस्थी करत त्यांना पोलिस स्टेशनमध्ये घेऊन गेले. तेथे दोघांची समजूत काढण्यात आली व नंतर दोघांनाही सोडून देण्यात आले आहे. विवाहीत मुलगी नीतूला तिच्या आईच्या ताब्यात देण्यात आले, तर गोविंद पंडित यांनाही घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. सध्या ही घटना गावभर चर्चेचा विषय ठरली आहे.

Non Stop LIVE Update
माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा भाजप...,रवींद्र धंगेकरांची मागणी काय
माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा भाजप...,रवींद्र धंगेकरांची मागणी काय.
शिवतीर्थावर मोदी-राज एकाच मंचावर, युद्धपातळीवर तयारी; कधी धडाडणार तोफ?
शिवतीर्थावर मोदी-राज एकाच मंचावर, युद्धपातळीवर तयारी; कधी धडाडणार तोफ?.
यामिनी जाधवांना त्रास दिला, त्या रडल्या त्यांनी... शिंदेंचा गौप्यस्फोट
यामिनी जाधवांना त्रास दिला, त्या रडल्या त्यांनी... शिंदेंचा गौप्यस्फोट.
मोदींना जिरेटोप अन् विरोधकांची टीका, प्रफुल्ल पटेलांचं प्रत्युत्तर काय
मोदींना जिरेटोप अन् विरोधकांची टीका, प्रफुल्ल पटेलांचं प्रत्युत्तर काय.
ठाकरे व्होट जिहादचे आका, शिवसेनाभवनात बोलावून हिरवी चादर...कुणाची टीका
ठाकरे व्होट जिहादचे आका, शिवसेनाभवनात बोलावून हिरवी चादर...कुणाची टीका.
मिस्टर राज नॉट माय टार्गेट, तर माझ टार्गेट.. अंधारेंचा कुणावर हल्लाबोल
मिस्टर राज नॉट माय टार्गेट, तर माझ टार्गेट.. अंधारेंचा कुणावर हल्लाबोल.
दादांना शून्य जागा, सुनेत्रा पवार हरणार? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा काय
दादांना शून्य जागा, सुनेत्रा पवार हरणार? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा काय.
अंधारेंचा पलटवार, व्हिडीओचा सपाटा लावत राज ठाकरेंच्या भूमिकेची चिरफाड
अंधारेंचा पलटवार, व्हिडीओचा सपाटा लावत राज ठाकरेंच्या भूमिकेची चिरफाड.
'मविआ'ला 35 जागा तर 'इंडिया'ला बहुमत, शरद पवारांनंतर बाबांचा मोठा दावा
'मविआ'ला 35 जागा तर 'इंडिया'ला बहुमत, शरद पवारांनंतर बाबांचा मोठा दावा.
14 जीव गेलं पण अनधिकृत होर्डिंग लावणारा भावेश भिंडे कुठं लपला?
14 जीव गेलं पण अनधिकृत होर्डिंग लावणारा भावेश भिंडे कुठं लपला?.