AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बदलापुरात मर्सिडीज कारने फेरीवाल्यांना उडवलं!, संतप्त जमावाकडून कारचालकाला चोप

बदलापूर पश्चिमेच्या मुख्य बाजारपेठेतील खाऊगल्लीत दिवाकर शेट्टी हा इसम वास्तव्याला आहे. आज दुपारच्या सुमारास शेट्टी हा त्याच्या मर्सिडीज कारने या गल्लीतून जात असताना त्याने 3 ते 4 फेरीवाल्यांना उडवलं.

बदलापुरात मर्सिडीज कारने फेरीवाल्यांना उडवलं!, संतप्त जमावाकडून कारचालकाला चोप
मर्सिडीज कारने फेरीवाल्यांना उडवलंImage Credit source: TV9
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Jan 14, 2023 | 4:35 PM
Share

बदलापूर : बदलापूरमध्ये एका मर्सिडीज कारने फेरीवाल्यांना उडवल्याची खळबळजनक घटना घडली आहे. बदलापूर पश्चिमेच्या रेल्वे स्थानकाबाहेरील मुख्य बाजारपेठेत आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत फेरीवाले जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर संतप्त जमावाने मर्सिडीज कार चालकाला बेदम चोप दिला आहे. दिवाकर शेट्टी असे आरोपी कार चालकाचे नाव आहे. मारहाणीत कार चालकही जखमी झाला आहे. याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

बदलापूर पश्चिमेतील खाऊगल्लीत घडली घटना

बदलापूर पश्चिमेच्या मुख्य बाजारपेठेतील खाऊगल्लीत दिवाकर शेट्टी हा इसम वास्तव्याला आहे. आज दुपारच्या सुमारास शेट्टी हा त्याच्या मर्सिडीज कारने या गल्लीतून जात असताना त्याने 3 ते 4 फेरीवाल्यांना उडवलं.

संतप्त जमावाकडून कार चालकाला बेदम चोप

या अपघातात फेरीवाले जखमी झाले असून, त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं. यानंतर संतप्त जमावाने दिवाकर शेट्टी याला बेदम चोप दिला. यामध्ये दिवाकर शेट्टी हा सुद्धा जखमी झाला, पोलिसांनी त्यालाही रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे.

घटनेचा पोलिसांकडून तपास सुरु

दरम्यान, दिवाकर शेट्टी आणि हे फेरीवाले यांचे पूर्वीचे वाद असून, याच वादातून शेट्टी याने फेरीवाल्यांना उडवल्याची या परिसरात चर्चा आहे. मात्र या सगळ्याचा तपास सुरू असून तपासाअंती या घटनेचं नेमकं कारण समोर येईल, अशी माहिती बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी दिली आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?