अहो घरी या ना… मी तुमच्यावर लई प्रेम करतेय… शिक्षकाची पत्नी रडून रडून घायाळ, व्हिडिओ व्हायरल; ती सवय…
बरेली येथील सरकारी शाळेतील शिक्षक पुष्पेंद्र गंगवार ऑनलाइन गेमिंगच्या व्यसनामुळे प्रचंड कर्जात सापडले. कर्ज आणि मानसिक ताण यामुळे ते चार दिवसांपासून बेपत्ता आहेत. त्यांची पत्नी त्यांना घरी परतण्याची विनंती करत आहे आणि पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. ही घटना त्रिलोक बिहार कॉलनी येथे घडली.

उत्तर प्रदेशातील बरेली येथील एका सरकारी शाळेतील शिक्षक पुष्पेंद्र गंगवार गेल्या चार दिवसापासून बेपत्ता आहेत. पुष्पेंद्र यांना ऑनलाइन गेम खेळण्याची सवय होती. त्यामुळे त्यांनी प्रचंड कर्ज घेतलं होतं. कर्जाचा डोंगर एवढा झाला की त्यांना डिप्रेशन आलं. मानसिक तणावात होते ते. देणेकरी दारावर येऊ लागल्याने पुष्पेंद्रने अचानक घर सोडलं. चार दिवसापासून ते घरी परतला नाही. इकडे त्याची बायको रडून रडून घायाळ जाली आहे. अहो, घरी या ना… मी तुमच्यावर खूप प्रेम करतेय… असं ती वारंवार म्हणतेय. हातजोडून ती मिणतवाऱ्याही करत आहे. पण तिच्या नवऱ्याचा काहीच पत्ता लागत नाहीये.
बरेली जिल्ह्यातील इज्जतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील त्रिलोक बिहार कॉलनीतील ही घटना आहे. पुष्पेंद्र गंगवार बुधवारी अचानक घरातून पसार झाला. रात्री उशीर झाला तरी तो परत आला नाही. त्यामुळे कुटुंबीय चिंतित झाले. त्याने त्याचा शोध सुरू केला. बरीच शोधाशोध करूनही त्याचा काहीच पत्ता लागला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी थेट इज्जत नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. त्याचा मोबाईलही बंद येत आहे. त्यामुळे त्याच्याशी संपर्कच होत नसल्याचं कुटुंबीयांचं म्हणणं आहे.
वाचा: सासूने जावयासोबत पळून जाण्याचा बनवला मास्टर प्लान, नवऱ्याला कळालं अन्…
एक सवय भारी पडली…
पुष्पेंद्रला एक सवय भारी पडली. ती म्हणजे ऑनलाईन गेमिंगची. त्याला काही काळापासून ऑनलाईन गेमिंगची सवय लागली होती. सुरुवातीला तो केवळ टाइमपास म्हणून खेळत होता. त्यानंतर ही सवय एवढी वाढली की त्याचा पगारही या गेमिंगमध्ये जाऊ लागला. पगार कमी पडला म्हणून त्याने नातेवाईक आणि मित्रपरिवारांकडून कर्ज घेतलं. त्यामुळे कर्ज वाढले. कर्ज देणारेही पैशाचा तगादा लावू लागले. त्यामुळे आर्थिक तंगीमुळे तो तणावात आला. मानसिक तणावामुळेच तो घराबाहेर पडल्याचं सांगितलं जात आहे.
आम्ही तुमच्याशिवाय राहूच शकत नाही
पुष्पेंद्रच्या बायकोचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात ती रडून रडून हैराण झाल्याचं दिसत आहे. नवऱ्याला ती घरी येण्याची वारंवार विनंती करत आहे. रडून रडून तिचे हाल झालेले दिसत आहेत. अहो तुम्ही घरी या ना… माझं तुमच्यावर लई प्रेम आहे हो… असं ती रडत रडतच बोलताना दिसत आहे. नवरा कोणत्या परिस्थितीत असेल, काय खात असेल? त्याचं काय झालं असेल? या प्रश्नांनी तिला घेरलं आहे. मी आणि आपली मुलं तुमच्या शिवाय राहू शकत नाही हो. घरातील सर्वच हतबल, परेशान झाले आहेत, असंही ती या व्हिडीओत बोलताना दिसत आहे. तिच्या डोळ्यात एकाचवेळी भय आणि चिंताही दिसत आहे.
इज्जतनगरच्या पोलिसांकडून शोध सुरू
इज्जतनगरच्या पोलिसांकडून पुष्पेंद्रचा शोध सुरू करण्यात आला आहे. त्याचे कॉल डिटेल्स शोधले जात आहेत. त्याचं शेवटचं लोकेशनही शोधलं जात आहे. लवकरच त्याला आम्ही शोधू. त्याला व्यवस्थित घरी आणू, असं पोलिसांचं म्हणणं आहे.
