Dombivali Crime : रात्रीच्या वेळी रस्त्यावरुन जात असताना कलाकाराला लुटले, 24 तासात चोरटा जेरबंद

डोंबिवलीत चोरट्यांचा सुळसुळाट सुरु आहे. रस्त्यावरुन जाणाऱ्या नागरिकांनाही चोरटे टार्गेट करत आहेत. मारहाण करत लुटण्याच्या घटना उघडकीस येत आहेत.

Dombivali Crime : रात्रीच्या वेळी रस्त्यावरुन जात असताना कलाकाराला लुटले, 24 तासात चोरटा जेरबंद
डोंबिवलीत कलाकाराला लुटले
Follow us
| Updated on: Sep 01, 2023 | 4:23 PM

डोंबिवली / 1 सप्टेंबर 2023 : डोंबिवलीत लूटमारीच्या घटना थांबण्याचे नावच घेताना दिसत नाहीत. रात्रीच्या वेळी रस्त्यावरुन चालत जात असताना एका ज्युनिअर आर्टिस्टला डोळ्यात स्प्रे मारुन लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी महात्मा फुले पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. विजय अग्रवाल असे लुटण्यात आलेल्या कलाकाराचे नाव आहे. पोलिसांनी 24 तासाच्या आत लुटपाट करणाऱ्या सराईत चोरट्याला उल्हासनगरमधून बेड्या ठोकल्या आहेत. शाहिद लतीफ शेख उर्फ छोटा बेरिंग असे आरोपीचे नाव असून, त्याच्यावर कल्याण परिसरात 7 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. भररस्त्यात घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

ज्युनिअर अभिनेता विजय अग्रवाल हा गुरुवारी रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास कल्याण पश्चिममेतील एकविरानगर येथे घरी चालला होता. यावेळी संतोषीमाता रोडवर सहजानंद चौकाजवळ एका अनोळखी माणसाने त्याचा मोबाईल मागितला. अभिनेत्याने मोबाईल देण्यास नकार दिला. यानंतर आरोपीने अभिनेत्याच्या डोळ्यात स्प्रे मारत त्याला मारहाण केली आणि त्याच्या खिशातील मोबाईल काढून पोबारा केला.

याप्रकरणी अभिनेत्याने महात्मा फुले पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. कल्याण महात्मा फुले पोलीस चौकीचे सीनियर पी आय अशोक होनमाने, क्राईम पी आय प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली एपीआय किरण भिसे, पोलीस हवालदार सुजित टिकेकर, जितेंद्र चौधरी, रामेश्वर गामने, अनंता कागरे, सूर्यवंशी, दीपक थोरात, शिपटे यांचे एक पथक तयार करत तपास सुरू केला.

हे सुद्धा वाचा

या पथकाला गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरुन उल्हासनगर परिसरात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. आरोपी सराईत गुन्हेगार असून, महात्मा फुले बाजारपेठ आणि खडकपाडा पोलीस ठाण्यात त्याच्यावर 7 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत.

'संजय राऊतांची प्रतिक्रिया आश्चर्यकारक..', थेट पवार कुटुंबातूनच फटकारे
'संजय राऊतांची प्रतिक्रिया आश्चर्यकारक..', थेट पवार कुटुंबातूनच फटकारे.
शिंदे काय बोलले की एका वाक्यानं थेट 'आपत्ती व्यवस्थापन समिती'त एन्ट्री
शिंदे काय बोलले की एका वाक्यानं थेट 'आपत्ती व्यवस्थापन समिती'त एन्ट्री.
'आव्हाडांना फक्त रॉकेल टाकायचाच धंदा...', धस भडकले, कशावरून जुंपली?
'आव्हाडांना फक्त रॉकेल टाकायचाच धंदा...', धस भडकले, कशावरून जुंपली?.
बँकॉक फ्लाईट... एका फोननं गल्ली-दिल्लीपर्यंत सारी यंत्रणा टाईट?
बँकॉक फ्लाईट... एका फोननं गल्ली-दिल्लीपर्यंत सारी यंत्रणा टाईट?.
शिंदेंसारखा आतंरराष्ट्रीय दलाल पवारांसोबत, त्या सत्कारावरून राऊत भडकले
शिंदेंसारखा आतंरराष्ट्रीय दलाल पवारांसोबत, त्या सत्कारावरून राऊत भडकले.
स्टारडम सोडून अध्यात्माकडे वळले 'हे' सेलिब्रिटी
स्टारडम सोडून अध्यात्माकडे वळले 'हे' सेलिब्रिटी.
पुणे विद्यापीठातील 2 धक्कादायक घटना समोर, एकाला उंदीर चावला तर आता...
पुणे विद्यापीठातील 2 धक्कादायक घटना समोर, एकाला उंदीर चावला तर आता....
कॉपी करणाऱ्यांचं आता काही खरं नाही, कारण...परीक्षेबाबत CM मोठा निर्णय
कॉपी करणाऱ्यांचं आता काही खरं नाही, कारण...परीक्षेबाबत CM मोठा निर्णय.
तुम्हाला मीडियाचा M माहीत नव्हता, तेव्हापासून; आव्हाड-धसांमध्ये जुंपली
तुम्हाला मीडियाचा M माहीत नव्हता, तेव्हापासून; आव्हाड-धसांमध्ये जुंपली.
एक मेसेज, फोन बंद, तानाजी सावंतांचा मुलगा बेपत्ता,न सांगता कुठे गेला?
एक मेसेज, फोन बंद, तानाजी सावंतांचा मुलगा बेपत्ता,न सांगता कुठे गेला?.