AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीम इंडियाच्या माजी कॅप्टनची ED कडून तब्बल 9 तास चौकशी

रात्री 9 वाजता तो ईडी कार्यालयातून निघाला. HCA मधील कथित आर्थिक अनियमिततेशी संबंधित ही चौकशी आहे. ईडीने या संबंधी मागच्यावर्षी नोव्हेंबरमध्ये छापेमारी केली होती.

टीम इंडियाच्या माजी कॅप्टनची ED कडून तब्बल 9 तास चौकशी
Cricket_Pitch
| Updated on: Oct 09, 2024 | 1:51 PM
Share

भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार आणि काँग्रेस नेता मोहम्मद अजहरुद्दीन हैदराबाद क्रिकेट असोशिएशनमधील कथित आर्थिक घोटाळा प्रकरणात मंगळवारी ईडीसमोर हजर झाला. नऊ तासापेक्षा पण जास्तवेळ त्याची चौकशी झाली. मोहम्मद अजहरुद्दीन 61 वर्षांचा आहे. 3 ऑक्टोंबरला त्याला ईडी समोर हजर व्हायला सांगितलं होतं. माजी खासदार असलेल्या मोहम्मद अजहरुद्दीनने वेळ मागून घेतला. त्यानंतर त्याला 8 ऑक्टोंबरला बोलवण्यात आलं.

सफेद सदरा-लेंगा परिधान करुन आलेला मोहम्मद अजहरुद्दीन सकाळी 11 वाजता फतेह मैदान रोड येथील ईडी कार्यालयात आला. त्याच्यासोबत त्याची कायदेशीर टीम सुद्धा होती. रात्री 9 वाजता तो ईडी कार्यालयातून निघाला. HCA मधील कथित आर्थिक अनियमिततेशी संबंधित ही चौकशी आहे. ईडीने या संबंधी मागच्यावर्षी नोव्हेंबरमध्ये छापेमारी केली होती.

अजहरुद्दीन काय म्हणाला?

‘चौकशीत मी सहकार्य करतोय’ असं मोहम्मद अजहरुद्दीन बाहेर येताना पत्रकारांना सांगितलं. जे आरोप करण्यात आलेत, ते निराधार आणि चुकीचे आहेत. त्याशिवाय मला जास्त काही बोलायचं नाहीय. HCA अध्यक्ष म्हणून अजहरुद्दीन यांच्या कार्यकाळातील त्यांची भूमिका चौकशीच्या फेऱ्यात आहे. मागच्यावर्षी तेलंगण विधानसभा निवडणुकीत अजहरुद्दीनचा पराभव झालेला. मागच्यावर्षी तेलंगण पोलिसांनी गुन्हा नोंदवल्यानंतर अजहरुद्दीनने सांगितलं की, ‘त्याच्याविरोधात लावण्यात आलेले आरोप चुकीचे आहेत. प्रतिमा खराब करण्याचा हेतू यामागे आहे’

Follow Us
श्रीवर्धन आमचा अभेद्य बालेकिल्ला! महेंद्र दळवींच्या टीकेवर तटकरे...
श्रीवर्धन आमचा अभेद्य बालेकिल्ला! महेंद्र दळवींच्या टीकेवर सुनील तटकरेंचं सूचक उत्तर
रुपाली चाकणकरांच्या ट्रेडमार्कवर दिपाली सय्यद संतापल्या; थेट म्हणाल्या
Dipali Sayyed : रुपाली चाकणकरांच्या ट्रेडमार्कवर दिपाली सय्यद संतापल्या; थेट म्हणाल्या....
पुणे-गुवाहाटी इंडिगो विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; 192 प्रवासी सुखरूप...
Pune : पुणे-गुवाहाटी इंडिगो विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; 192 प्रवासी सुखरूप, नेमकं काय घडलं होतं?
अमित शहांचा दोन दिवसांचा पुणे दौरा; भारत टॅक्सीचा शुभारंभ...
अमित शहांचा दोन दिवसांचा पुणे दौरा; भारत टॅक्सीचा शुभारंभ, अजित पवारांच्या पुतळ्याचेही करणार अनावरण!
रुपाली चाकणकरांच्या नाव फोटो ट्रेंडमार्क प्रकरणी मोठी अपडेट समोर; नेमक
रुपाली चाकणकरांच्या नाव, फोटो ट्रेंडमार्क प्रकरणी मोठी अपडेट समोर; नेमकं काय घडलं?
रुपाली चाकणकरांच्या ट्रेडमार्कचा वाद पेटला; संगीता तिवारी म्हणाल्या...
रुपाली चाकणकरांच्या ट्रेडमार्कचा वाद पेटला; संगीता तिवारी म्हणाल्या, 'साडी नेसायला...
अमित शहांच्या पुणे दौऱ्यापूर्वीच पोलिसांची कारवाई? काँग्रेस कार्यकर्ते
अमित शहांच्या पुणे दौऱ्यापूर्वीच पोलिसांची कारवाई? काँग्रेस कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात
बिरसा मुंडा जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींची उपस्थिती; आदिवासी बांधव...
बिरसा मुंडा जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींची उपस्थिती; आदिवासी बांधवांच्या यशोगाथेतून उलगडला विकासाचा प्रवास
रुपाली चाकणकरांनी नाव, फोटो अन् शैलीचं ट्रेडमार्क केलं; परवानगीशिवाय..
Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांनी नाव, फोटो अन् शैलीचं ट्रेडमार्क केलं; परवानगीशिवाय वापरल्यास थेट...
अजितदादांचं नेतृत्व केवळ...; संजय शिरसाटांकडून नेतृत्वाचं कौतुक
Sanjay Shirsat : अजितदादांचं नेतृत्व केवळ...; संजय शिरसाटांकडून नेतृत्वाचं कौतुक