AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक! रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी खिशातून 35 हजार रुपये चोरले

मृतदेह नातेवाईकांकडे सोपवण्यापूर्वी तो व्यवस्थित पॅक करण्यात आला. | money stolen from dead patients pocket

धक्कादायक! रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी खिशातून 35 हजार रुपये चोरले
रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी खिशातून 35 हजार चोरले
| Updated on: Apr 30, 2021 | 9:44 AM
Share

धुळे: आरोग्य सुविधांअभावी रस्त्यावरच तडफडत जीव सोडणारे रुग्ण, जीवनावश्यक औषधांचा काळाबाजार या आणि अशा अनेक माणुसकीचे अध:पतन करणाऱ्या घटना गेल्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळाल्या आहेत. यामध्ये आता आणखी एका घटनेची भर पडली आहे. धुळ्यातील एका रुग्णालयात उपचाराधीन असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी त्याच्या खिशातील पैसे चोरल्याचे (Theft) समोर आले आहे. या घटनेमुळे माणुसकी खरंच संपली आहे की काय, असा प्रश्न पुन्हा एकदा उद्भवला आहे. (Hospital employee stolen money from dead patients pocket)

धुळ्यातील श्री गणेशा मल्टी स्पेशालिटी दवाखान्यात हा प्रकार घडला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. यामध्ये रुग्णालयातील एक कर्मचारी मृताच्या खिशातील पैसे काढताना दिसत आहे. मृतदेह नातेवाईकांकडे सोपवण्यापूर्वी तो व्यवस्थित पॅक करण्यात आला. रुग्णालयातील चार तरुण कर्मचाऱ्यांनी हे काम केले. त्यावेळी या तरुणांनी मृतदेह ठेवण्यात आलेल्या बॅगची चेन उघडून रुग्णाच्या खिशात असलेली रोकड काढून घेतली.  त्यानंतर मृतदेह नातेवाईकांकडे सोपवण्यात आला. ही गोष्ट नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी रुग्णालय प्रशासनाला याबद्दल कळवले. त्यांच्या दाव्यानुसार, मृत रुग्णाच्या खिशातील 35 हजार रुपये लंपास करण्यात आले आहेत.

महिलेच्या मृत्यूनंतर अडीच तोळ्यांची सोन्याची पोत लंपास, नाशिकच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार

काही दिवसांपूर्वी नाशिकच्या रुग्णालयातही मृत महिलेच्या गळ्यातील अडीच तोळ्यांची सोन्याची पोत चोरी झाल्याचा प्रकार समोर आला होता. स्पंदन रुग्णालयात हा प्रकार घडला होता. मृत महिलेल्या मुलाने याप्रकरणी पोलिसांत फिर्याद नोंदविली होती.

गौरव शिंदे यांच्या आई कल्याण शिंदे यांची कोरोनामुळे तब्येत खालावली. त्यांना कुटुंबीयांनी राजीव गांधी भवन परिसरातील स्पंदन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचार सुरु असताना, त्यांचा मृत्यू झाला. हॉस्पिटलने मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. मात्र, शिंदे यांच्या गळ्यातील तब्बल अडीच तोळ्यांची सोन्याची पोत चोरीला गेल्याचे उघडकीस आले. ही बाब गौरव शिंदे यांनी हॉस्पिटल प्रशासनाच्या लक्षात आणून दिली. हॉस्पिटल प्रशासनाने उपस्थित कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली. सीसीटीव्ही तपासले. मात्र, त्यातून चोरी गेलेली पोत सापडत नसल्याने गौरव शिंदे यांनी सरकारवाडा पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली होती.

संबंधित बातम्या:

VIDEO | हॉस्पिटलपर्यंत पोहोचला पण बेडच नाही, नाशिकमध्ये पत्नीच्या मांडीवरच पतीने प्राण सोडले

मुंबई हादरली! टीव्ही बघण्यासाठी गेलेल्या 5 वर्षीय मुलीवर बलात्कार, मेडिकलच्या विद्यार्थ्याला अटक

काळीज पिळवटून टाकणारी घटना, रुग्णवाहिका न मिळाल्याने मुलाने बाईकवरुन नेला आईचा मृतदेह

(Hospital employee stolen money from dead patients pocket)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.