मुंबईत तीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, दोघांना 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

मुंबईत एका चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना न्यायालयाने 20 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

मुंबईत तीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, दोघांना 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
Follow us
| Updated on: Dec 08, 2020 | 5:05 PM

मुंबई : मुंबईत एका चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना न्यायालयाने 20 वर्षांची शिक्षा सुनावली (Mumbai 3 Year Old Girl Raped) आहे. याप्रकरणी दोघांना 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. हे दोघंही कॉलेजमध्ये शिकतात, त्यांचं वय 20 वर्ष आहे. यांना पॉस्को न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे (Mumbai 3 Year Old Girl Raped).

‘द टाइम्स ऑफ इंडिया’नुसार, ही घटना 2018 ची आहे. घटनेवेळी मुलीचं वय फक्त तीन वर्ष होतं. या नराधमांपैकी एक हा चिमुकलीच्या शेजारीच राहायचा. त्याने 20 नोव्हेंबर 2018 ला या चिमुकलीवर अत्याचार केला. यादरम्यान दुसरा आरोपी हे सर्व पाहात होता. त्यानंतर त्यानेही मुलीवर अत्याचार केला. तर तिसरा आरोपी जो होता त्यानेही मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. पण, तिसरा आरोपी हा नाबालिक होता.

खटल्यादरम्यान, मुलगी, तिची आई आणि काका साक्षीदार बनले. ही चिमुकली त्यांना इमारतीतील कॉमन पॅसेजमध्ये अस्वस्थ परिस्थितीत आढळून आल्याचं त्यांनी न्यायालयात सांगितलं. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान, आरोपीने कमी वयाचा दाखलाही दिला होता. पण, न्यायालयाने त्याची विनंती फेटाळून लावली.

“जर आम्ही कमी वयाचा विचार केला तर कुठल्याही आरोपीला दोषी ठरवता येणार नाही, शिक्षा सुनावता येणार नाही. ती चिमुकली आरोपीला दादा म्हणून संबोधित करायची. पण, आरोपीने तिचा विश्वासघात करत तिच्यावर अत्याचार केला”, असं न्यायालयाने म्हटलं.

Mumbai 3 Year Old Girl Raped

संबंधित बातम्या :

फेसबुकवरची ओळख पडली महागात; व्यापाऱ्याला 30 लाखाला गंडा, दापोली पोलिसात तक्रार

मोबाईलला नेटवर्क नसल्याने घराबाहेर आलेल्या अल्पवयीन तरुणीवर बलात्कार, दोन जणांवर गुन्हा

जीवनसाथी डॉट कॉमवरून महिलांची फसवणूक करणाऱ्याला अटक; 7 लाखांचा मुद्देमाल जप्त

Non Stop LIVE Update
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.