Andheri Child Death : अंधेरीत पाण्याने भरलेल्या लिफ्टच्या खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, इमारतीच्या पर्यवेक्षकावर गुन्हा दाखल

याप्रकरणी डीएन नगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुरेशी सुरक्षा उपाययोजना करण्यास अयशस्वी झाल्याबद्दल पोलिसांनी साइटच्या पर्यवेक्षकावर आयपीसी कलम 304ए नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Andheri Child Death : अंधेरीत पाण्याने भरलेल्या लिफ्टच्या खड्ड्यात पडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, इमारतीच्या पर्यवेक्षकावर गुन्हा दाखल
मिठाईच्या दुकानातील उकळत्या पाण्यात पडली चिमुकली
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Dec 20, 2021 | 1:25 AM

मुंबई : बांधाकामाधीन इमारतीच्या पाण्याने भरलेल्या लिफ्टमध्ये पडून बुडाल्याने एका 7 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अंधेरीत घडली आहे. निर्माणाधीन इमारतीत सुरक्षेच्या पुरेशा उपाययोजना न केल्याने साईट पर्यवेक्षक आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर इमारतीच्या तळमजल्यावर विवाहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खेळता खेळता हा मुलगा पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडला.

बांधकामाधीन इमारतीच्या तळमजल्यावर लग्नाचे आयोजन करण्यात आले होते

मुंबईतील अंधेरी (पश्चिम) येथे एसआरए इमारतीचे बांधकाम सुरु आहे. या इमारतीच्या लिफ्टसाठी तयार करण्यात आलेल्या खड्ड्यात पाणी साचले होते. इमारतीच्या आसपासच्या परिसरात असलेल्या झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांनी या ठिकाणी विवाह सोहळा आयोजित केला होता. कोणत्याही परवानगीशिवाय तळमजल्यावर कामगारांनी लग्नाचे आयोजन केले होते. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या. याच विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मृत बालक आपल्या आई वडिलांसोबत आला होता. यावेळी खेळता खेळता तो लिफ्टच्या खड्ड्याजवळ गेला आणि तोल जाऊन खड्ड्यात पडला. विवाह सोहळ्यात जोरजोरात म्युझिक सुरु असल्याने मुलाच्या ओरडण्याचा आवाज कुणाला ऐकू गेला नाही.

मुलाची चप्पल पाण्यात तरंगताना दिसली

म्युझिकमुळे मुलाचा आवाज ऐकू न आल्याने कुणालाच मुलगा पाण्यत पडल्याचे कळले नाही. बराच मुलगा दिसत नाही म्हणून त्याच्या आई वडिलांनी त्याची शोधाशोध केली. मात्र खूप शोधल्यानंतरही मुलगा कुठे सापडत नव्हता. यावेळी मुलाचा शोध घेत आई वडिल लिफ्टच्या खड्ड्याजवळ पोहचले असता त्यांना मुलाची चप्पल पाण्यावर तरंगताना दिसली. त्यानंतर मुलाला पाण्यातून बाहेर काढण्यात आले. त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

इमारतीच्या पर्यवेक्षका विरोधात गुन्हा दाखल

याप्रकरणी डीएन नगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुरेशी सुरक्षा उपाययोजना करण्यास अयशस्वी झाल्याबद्दल पोलिसांनी साइटच्या पर्यवेक्षकावर आयपीसी कलम 304ए नुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच या घटनेला जबाबदार असणाऱ्या इतर लोकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला असून यात त्यांची भूमिका स्पष्ट झाल्यानंतरच त्यांची नावे घेऊ, असे पोलिसांनी सांगितले. (A 7-year-old boy died after falling into a pit filled with water)

इतर बातम्या

Uttar Pradesh: मित्राच्या पत्नीशी अनैतिक संबंध ठेवणे महागात पडले, तरुणाची बेदम मारहाण करीत हत्या

Car Accident | अक्सा बीचजवळ कारचा भीषण अपघात, एकाचा मृत्यू, 6 जण जखमी

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें