अभिषेक घोसाळकर प्रकणात मॉरिस नोरोन्हा कुटुंबियांकडून समोर आली माहिती, खदखद कशी वाढली ते सांगून टाकलं

शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर हत्येप्रकरणात रोज काही ना काही पुढे येत आहे. हत्या करून आत्महत्या करण्याचं कारण काय? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. मॉरिस नोरोन्हाच्या मनात नेमकी काय खदखद होती असा प्रश्नही उपस्थि केला जात आहे. आता कुटुंबियांकडून हळूहळू करून याबाबतची माहिती समोर येत आहे.

अभिषेक घोसाळकर प्रकणात मॉरिस नोरोन्हा कुटुंबियांकडून समोर आली माहिती, खदखद कशी वाढली ते सांगून टाकलं
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण असं शिजलं! गोळीबाराआधी अशी खदखद वाढत गेल्याचं कुटुंबियांनी सांगितलं
Follow us
| Updated on: Feb 10, 2024 | 1:59 PM

मुंबई : शिवसेना माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण आणि मॉरिस नोरोन्हा आत्महत्या प्रकरणाने मुंबई हादरून गेली आहे. धक्कादायक घटना ऐकून कोणालाच काहीच कळेनासं झालं होतं. इतक्या निर्घृणपणे हत्या करून आत्महत्या करण्याचं कारण काय? तेही फेसबुक लाईव्ह करून घटना घडवून आणणं सर्वांनाच धक्कादायक होतं. त्यामुळे या घटनेमागे नेमका काय प्रकार आहे असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. आता मॉरिस नोरोन्हाच्या कुटुंबियांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना काही माहिती समोर आणली आहे. 2022 मध्ये गुन्हा दाखल झाल्याने मॉरिस अस्वस्थ झाला होता, असं कुटुंबियांनी सांगितलं. या गुन्ह्यात तक्रारदाराला अभिषेक घोसाळकरने मदत केली असल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे.  इतकंच काय तर अमेरिकन दूतावासाशी संपर्क साधत त्याचा व्यवसायावर गदा आणली होती, असाही कुटुंबियांनी खुलासा केला आहे. त्यामुळे ‘घोसळकरला धडा शिकवेन’, असं मॉरिस त्याच्या कुटुंबियांना कायम सांगायचा. पण त्यांनी मॉरिसचं म्हणणं काही मनावर घेतलं नाही. कारण मॉरिस अशा पद्धतीने खदखद व्यक्त करेल असं त्यांना वाटलं नव्हतं.

नोरोन्हा अमेरिकेत पोकर खेळाडू होता. तसेच अमेरिकेत व्यवसाय करायचा. 2022 मध्ये एका महिलेने बलात्कार, धमकी आणि फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल केला. या प्रकरणात त्याला त्रास झाला तसेच काही महिने तुरुंगात घालवावे लागले. त्याच वर्षी अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी यांनी त्याच्या विरोधात अपशब्द वापरल्याचा गुन्हा दाखल केला होता. मॉरिस नोरोन्हाची पत्नीने सांगितलं की, “या गोष्टींचा त्याला खूप त्रास झाला होता.” तसेच त्याचं रागावर नियंत्रण राहिलं नसल्याचं पत्नीने पुढे सांगितलं.

घटनेच्या दिवशी मॉरिसची पत्नी एका खासगी कंपनी कामावर गेली होती.  तसेच मुलगी घरी होती. मॉरिसच्या पत्नीने सांगितलं की, ” ओळखीच्या व्यक्तीचा पहिल्यांदा कॉल आला तेव्हा सांगितलं गेलं की घोसाळकरला गोळ्या मारल्या. राजकीय वैमनस्यातून सदर प्रकार घडल्याचं कळलं. त्यानंतर दुसऱ्या फोन कॉलवर त्यानेही आत्महत्या केल्याचं समजलं.” घटनेनंतर मॉरिसच्या पत्नीच्या आईने मुलीकडे धाव घेतली. कारण मुलगी घरी एकटीच होती.

पती मॉरिसकडे बंदूक कुठून आली याची कोणतीच माहिती नाही. तसेच घटनेच्या आधी त्याने घोसाळकर यांचा विषयही काढला नाही, असंही पत्नीने सांगितलं. “कोविड काळात केलेल्या कामासाठी त्याला कोरोना योद्धाच्या पुरस्काराने गौरविण्यात आलंं होतं. त्याने बऱ्याच लोकांना मदत केली होती. तसेच नगरसेवक निवडणूक लढवण्यास उत्सुक होता. नागरिकांसाठी चांगलं काम करण्याचा हेतू होता.”, असंही पत्नीने पुढे सांगितलं.

डिसेंबर 2023 मध्ये मॉरिस नोरोन्हाने अभिषेक घोसाळकरकडे मैत्रिचा हात पुढे केला होता. पण खऱ्या अर्थाने जखमेवर पट्टी बांधण्याचा हा प्रयत्न होता. पण त्याच्या मनात आपल्यासोबत मागे जे काही घडलं याबाबत खदखद होती, असंही कुटुंबियांनी पुढे सांगितलं.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.