उच्चशिक्षित तरुणाकडून 35 पेक्षा अधिक तरुणींची फसवणूक, लग्नाचे आमिष दाखवून उकळले लाखो रुपये, आरोपीला अटक

मुंबईमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मॅट्रीमोनियल साईट्च्या माध्यमातून आरोपीने अनेक तरुणींची फसवणूक करत त्यांना लाखोंचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. विशाल चव्हाण असे या आरोपीचे नाव आहे.

उच्चशिक्षित तरुणाकडून 35 पेक्षा अधिक तरुणींची फसवणूक, लग्नाचे आमिष दाखवून उकळले लाखो रुपये, आरोपीला अटक
Follow us
| Updated on: Jan 18, 2022 | 9:13 PM

मुंबई :  मुंबईमधून (mumbai)  एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मॅट्रीमोनियल साईट्च्या ( Matrimonial Site) माध्यमातून आरोपीने अनेक तरुणींची फसवणूक करत त्यांना लाखोंचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. विशाल चव्हाण असे या आरोपीचे नाव आहे.  विशेष म्हणजे हा आरोपी उच्चशिक्षित असून, त्यांने बीटेक, एमबीएपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्याने आतापर्यंत जवळपास 35 ते 40 तरुणींची फसवणूक केली असून, या माध्यमातून त्याने त्यांच्याकडून 25 ते 30 लाख रुपये उकळल्याचे समोर आले आहे. त्याच्याविरोधात अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. शेवटी पोलिसांनी (Mumbai Police) तांत्रिक बाबिंच्या आधारे आरोपीचा माग काढत त्याला अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट सातच्या वतीने ही कारवाई करण्यात आली. आरोपी स्व:ताची ओळख लपवण्यासाठी कल्याणमधील एका फ्लॅटमध्ये बाहेरून कुलूप लावून आतमध्ये वास्तव्य करत होता. अखेर पोलिसांनी शोध घेऊन, आरोपी विशाल चव्हाण याला बेड्या ठोकल्या आहेत.

‘असा’ करायचा फसवणूक 

घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा एका मॅट्रीमोनियल साईटवरून, लग्नासाठी म्हणून मुलींशी ओळख करायचा. त्यानंतर तो त्यांच्याशी जवळीक निर्माण करायचा. एकदा जवळीक निर्माण झाली की, तो लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याकडे पैशांची मागणी करत असे. अशाचप्रकारे त्याने आतापर्यंत तब्बल  35 ते 40 तरुणींची फसवणूक केली असून, या माध्यमातून त्याने त्यांच्याकडून 25 ते 30 लाख रुपये उकळल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणेज हा आरोपी उच्चशिक्षित असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

ओळख लपवण्यासाठी फ्लटला बाहेरून कुलूप

संबंधित आरोपीविरोधात तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. तांत्रिक बाबिंच्या तापासाआधारे पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. विशाल चव्हाण याने कल्याणमध्ये एक फ्लॅट देखील घेतला होता. आपली ओळख उघड होऊ नये, म्हणून आरोपी फ्लॅटला बाहेरून कुलुप लावून आतमध्ये वास्तव्य करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपीची चौकशी सुरू असून, त्याचा इतर काही गुन्ह्यात सहभाग आहे का? याच तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

संबंधित बातम्या

बायको मुलांना विष दिलं, मग स्वतः गळफास घेतला! नागपुरात अख्ख्या कुटुंबानं का केली आत्महत्या?

चोरीच्या उद्देशाने आलेल्या अज्ञात आरोपीचा बँकेच्या सुरक्षा रक्षकावर हल्ला, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

बांधकाम व्यवसायिकाला भोंदू बाबाने घातला 48 लाखांचा गंडा, मृत्यूनंतर डायरी सापडल्याने भांडाफोड, आरोपीला अटक

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.