AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अल्पवयीन मुलीसोबत केले ‘हे’ कृत्य, न्यायालयाने आरोपीला सुनावली ‘ही’ शिक्षा

घटनेप्रकरणी मुलीच्या वडिलांनी माहिम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. खटल्याच्या सुनावणीदरम्यान मुलगी, तिचे वडिल आणि प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याच्या जबाबाची दखल घेतली.

अल्पवयीन मुलीसोबत केले 'हे' कृत्य, न्यायालयाने आरोपीला सुनावली 'ही' शिक्षा
तरुणीचा पाठलाग करणाऱ्या आरोपीची निर्दोष सुटकाImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Oct 13, 2022 | 4:39 PM
Share

मुंबई : आजकाल लहान मुलांवरील लैंगिक गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. अशीच एक घटना मुंबईत घडली होती. शाळकरी मुलीची ओढणी खेचल्याप्रकरणी (Molestation of School Girl) मुंबईतील विशेष न्यायालयाने (Special Court Mumbai) एका 20 वर्षीय तरुणाला तीन वर्षाची कारावासाची शिक्षा (Three Year Imprisonment) सुनावली आहे. विशेष न्यायाधीश प्रिया बनकर यांनी मंगळवारी निकाल देताना कलम 354, कलम 506 अन्वये आणि पोस्को कायद्यानुसार दोषी ठरवत शिक्षा सुनावली. अशा घटनांचा पीडितेवर खोलवर परिणाम होतो आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही याचा फटका बसत असल्याचे मत यावेळी न्यायालयाने नोंदवले आहे.

आरोपी मुलीच्या घराबाहेर उभा रहायचा

घटनेतील आरोपी पीडित मुलीच्या घराबाहेर उभा रहायचा. घटनेच्या दिवशीही आरोपी मुलीच्या घराबाहेर उभा होता. पीडित मुलगी घराजवळच्या दुकानात जाण्यासाठी घराबाहेर पडली असता आरोपीने तिची ओढणी खेचली आणि हातही धरला. इतकेच नाही तर तिच्या वडिलांनाही मारण्याची धमकी दिली.

माहिम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती

घटना घडली तेव्हा मुलगी 15 वर्षाची होती आणि इयत्ता दहावीत शिकत होती. घटनेप्रकरणी मुलीच्या वडिलांनी माहिम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. खटल्याच्या सुनावणीदरम्यान मुलगी, तिचे वडिल आणि प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याच्या जबाबाची दखल घेतली.

लहान मुलांवरील गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी 2012 मध्ये महिला आणि बाल विकास मंत्रालयाने लैंगिक छळ, लैंगिक शोषण आणि पोर्नोसारख्या जघन्य गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण करण्यासाठी याची निर्मिती केली होती.

या कायद्यांतर्गत 12 वर्षांखालील मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची तरतूद आहे. लहान मुलांवरील वाढते गुन्हे पाहता पोस्को कायद्यात काही सुधारणा करण्यात आल्या आहेत.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.