AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मिस्टर इंडिया मनोज पाटीलचा आत्महत्येचा प्रयत्न, अभिनेता साहिल खानसह तिघांविरोधात गुन्हा

मिस्टर इंडिया मनोज पाटील (Mr India Manoj Patil) याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना 16 सप्टेंबरला सकाळी उघडकीस आली होती. विषारी गोळ्या खाऊन 29 वर्षीय मनोजने आपलं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

मिस्टर इंडिया मनोज पाटीलचा आत्महत्येचा प्रयत्न, अभिनेता साहिल खानसह तिघांविरोधात गुन्हा
मिस्टर इंडिया मनोज पाटील (डावीकडे), अभिनेता साहिल खान (उजवीकडे)
| Edited By: Anish Bendre | Updated on: Sep 17, 2021 | 2:53 PM
Share

मुंबई : मिस्टर इंडिया मनोज पाटील (Mr India Manoj Patil) याला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी बॉलिवूड अभिनेता साहिल खान (Sahil Khan) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहिलसह तिघा जणांवर गुन्हा नोंदवल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली. साहिल खानच्या त्रासाला कंटाळून मनोजने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला होता. त्यानंतर मनोजने पोलिसांना लिहिलेले पत्रही समोर आले होते. सध्या मनोजवर मुंबईतील कूपर रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची तब्येत स्थिर असल्याची माहिती आहे.

काय आहे प्रकरण?

मिस्टर इंडिया मनोज पाटील (Mr India Manoj Patil) याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना 16 सप्टेंबरला सकाळी उघडकीस आली होती. विषारी गोळ्या खाऊन 29 वर्षीय मनोजने आपलं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. 15 सप्टेंबरला रात्री उशिरा कुटुंबियांनी त्याला मुंबईतील कूपर रुग्णालयात दाखल केलं.

साहिल खानविरोधात याआधी मनोजने पोलिसांकडे तक्रार केलेलं पत्रही समोर आलं आहे. अभिनेता साहिल खान माझ्यावर जळतो, साहिल माझ्या न्युट्रिशन शॉपविषयी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून अपप्रचार करतो, तसेच माझं करिअर संपवण्याची धमकी देतो, असा आरोप मनोजने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत आहे.

कोण आहे मनोज पाटील?

मनोज पाटीलने 2016 मध्ये ‘मिस्टर इंडिया मेन्स फिजिक ओव्हरऑल चॅम्पियनशिप’ (Mr India Men’s Physique Championship) हा किताब पटकावला होता. तो एक सुप्रसिद्ध मॉडेल, अॅथलीट आणि ट्रेनरही आहे.

मनोज पाटीलचे आरोप काय?

“साहील खान नामक एक इन्फ्लुएन्सर आहे. तो काही दिवसांपासून इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे मला आणि माझ्या न्यूट्रिशन शॉपला टार्गेट करत आहे. त्यामुळे मला आणि माझ्या परिवाराला त्याचा खूप त्रास झाला आहे. मी एका मिडल क्लास फॅमिलीला बिलाँग करतो आणि माझ्या झालेल्या प्रगतीमुळे त्याला खूप जलस फील होत असल्यामुळे तो माझ्या आणि माझ्या शॉपबद्दल सोशल मीडियावर खूप काही बोलला आहे. त्याच्याद्वारे मला खूप धमक्या सुद्धा दिल्या गेल्या आहेत, की तुझं करिअर मी संपवून टाकेन. किंबहुना तो माझ्या बिल्डिंगखाली सुद्धा येऊन गेला. मला नाही माहित त्याच्यामागे त्याचा काय उद्देश होता.” असं मनोजने पत्रात लिहिलं होतं.

“हे सगळं चालू असताना आता तर तो माझ्या वाईफला घेऊन प्लॅन करतोय, की माझ्यावर माझ्या बायकोद्वारे काहीही अशी केस करुन मला अडकवायचं आणि मला कोर्ट कचेरीमध्ये ठेवून माझा यूएसएचा विजा कायमचा बरखास्त करायचा. कारण मला आता मिस्टर ऑलिम्पिया खेळण्यासाठी यूएसएला जायचंय. माझ्या आणि माझ्या वाईफमध्ये असलेल्या अनबनीचा फायदा घेऊन तिचा माईंड डायवर्ट करुन मला फसवून माझं करिअर कायमचं संपवायचं. आता हे सगळं पाहून मी आणि माझी फॅमिली खूप त्रस्त झालो आहोत. माझ्या घरी मी एकच कमवता मुलगा आहे आणि माझी आई हाऊसवाईफ आणि बाबा 65 वर्षांचे रिटायर्ड आहेत.” असंही मनोजने सांगितलं.

“मला हा सगळा छळ पाहता आता खरंच सुसाईड करायला तो भाग पाडत आहे, असाच माझा छळ चालू राहिला तर येत्या काही दिवसात मी माझ्या जीवाचे काहीही बरेवाईट करुन घेणार आणि त्यानंतर या गोष्टीची पूर्ण जिम्मेदारी सरकार, पोलीस आणि साहिल खान याची असणार” असं मनोज पाटीलने पोलिसांना लिहिलेल्या पत्रात आढळलं आहे.

कोण आहे साहिल खान?

साहिल खान एक बॉलिवूड चित्रपट अभिनेता, फिटनेस उद्योजक आणि यूट्यूबर आहे. फिटनेसविषयक जागरूकता वाढवण्यासाठी तो ओळखला जातो आणि त्याने मुंबईतील अनेक संस्थांकडून पुरस्कार पटकावले आहेत.

साहिल खानचा दावा काय?

“बॉडी बिल्डर राज फौजदारच्या मदतीसाठी मी समोर आलो होते. राज फौजदारला एक्सपायर झालेले स्टेरॉईड मनोज पाटीलने विकले होते. राज फौजदारचा व्हिडीओ मी सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर आता सहानुभूती मिळवण्यासाठी मनोजने सुसाईड नोट लिहून आत्महत्येचा प्रयत्न केला” असा आरोप साहिल खानने केला आहे. “मनोज पाटील आणि राज फौजदार यांच्यामधील वाद आहे” असं साहिन खान पत्रकार परिषद घेऊन म्हणाला होता.

साहिल खानने शेअर केलेल्या व्हिडीओत नेमकं काय?

साहिल खानने त्याच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर बॉडी बिल्डर राज फौजदार याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तो मनोज पाटीलला फोन करताना दिसतो. तसेच व्हाट्सअॅपवर चॅट करताना दिसतो. त्यानंतर तो फोनवर बातचितही करतो. यावेळी तो एक्स्पायर झालेल्या स्टेरॉईडचे दोन लाख रुपये मागतो. त्यावर मनोज कंपनीकडे तक्रार करुन पैसे मागवत असल्याचं बोलताना दिसत आहे. यावेळी दोघांमध्ये बाचाबाची होते. तसेच या व्हिडीओत राज फौजदार आपल्याला सपोर्ट करा, असं आवाहन प्रेक्षकांना करताना दिसतोय.

संबंधित बातम्या :

मि. इंडिया मनोज पाटीलनं सुसाईडचा प्रयत्न का केला? आरोपाच्या घेऱ्यात असलेला अभिनेता साहिल खान नेमका काय म्हणतो? 

“साहिल खान मनसेच्या कार्यालयात आला नाही, तर…” मनोज पाटील प्रकरणात मनसेची उडी

Manoj Patil | अभिनेता साहिल खान माझ्यावर जळतो, मिस्टर इंडिया मनोज पाटीलचा आत्महत्येचा प्रयत्न

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...