Bhiwandi GST : ना माल दिला, ना सेवा पुरवली! तरिही जीएसटीच्या नावाखाली लाटले तब्बल 23 कोटी, मोड्स ऑपरेंडीही उघड!

जीएसटी चोरी प्रतिबंधक पथकाने या संपूर्ण प्रकाराचा सखोल तपास करण्यात सुरुवात केली. त्यावेळी या कंपन्या एका मोठ्या जीएसटी फ्रॉडशी संबंधित असल्याचं उघड झालं. प्रमुख आरोपी हसमुख पटेल यांच्या राहत्या घरात शोध घेण्यात आला. या तपासातून अनेक खळबळजनक बाबी समोर आल्या.

Bhiwandi GST : ना माल दिला, ना सेवा पुरवली! तरिही जीएसटीच्या नावाखाली लाटले तब्बल 23 कोटी, मोड्स ऑपरेंडीही उघड!
मोठी कारवाईImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Sep 14, 2022 | 6:04 AM

ठाणे : भिवंडीतून (Bhiwandi Crime News) जीएसटी चोरी (GST Crime) प्रतिबंधक कारवाई करताना जीएसटीच्या भिवंडी येथील पथकाने एका आरोपीला अटक केली आहे. कोणताही माल न पुरवता, कोणतीही सेवा न देता तब्बल कोट्यवधी रुपये जीएसटीच्या नावाखाली लाटल्याचा प्रकार या कारवाईतून उघडकीस आलाय. थोडे थोडेके नव्हे तर तब्बल 23 कोटी रुपये जीएसटीच्या नावाखाली घेण्यात आलेत. त्यासाठी 132 कोटी रुपयांची बनावटं बिलंही वापरण्यात आल्याचं तपासातून समोर आलंय. या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक (Main Accused arrested) करण्यात आलीय. तसंच 23 सप्टेंबरपर्यंत आरोपीला न्यायालयीन कोठडीही सुनावण्यात आलीय. 9 सप्टेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली होती. आता या प्रकरणाची मोड्स ऑपरेंडी काय होती, हेही समोर आलंय. भिवंडी जीएसटी आयुक्तालयाने केलेली ही सगळ्यात मोठी कारवाई मानली जातेय.

कोण आहे आरोपी?

हसमुख पटेल असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. जीएसटीच्या भिवंडी आयुक्तांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास केला असता 132 कोटी रुपयांच्या बोगस बिलांचं प्रकरण समोर आलं होतं. त्यानंतर याचा खोलवर शोध घेण्यात आला. तेव्हा हसमुख पटेल या मुख्य सूत्रधाराने खोट्या कंपन्यांच्या नावाखाली बनावट बिलं तयार केली. या बिलांच्या आधारे जीएसटीच्या नावाखाली पैसे लाटल्याचा प्रकार समोर आला आहे.

तपासातून काय समोर आलं?

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, जीएसटी आयुक्तालयाकडून वेगवेगळ्या कंपन्याचा तपास केला जात होता. त्यात मेसर्स मेक्टेक स्टील ट्रेडींग प्रायव्हेट लिमिटेड, मेसर्स यूजीएसके ट्रेडर्स, मेसर्श वर्ल्ड एन्टरप्रायजेस, मेसर्स रोलेक्स एन्टरप्रायजेस, मेसर्स एचएचटी एन्टरप्रायजेस, मेसर्स यश एन्टरप्रायजेस या कंपन्यांची नावं होतं. या कंपन्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे हसमुख पटेल यांच्यााशी संबंधित असल्याचं निदर्शनास आलं.

हे सुद्धा वाचा

पाहा लाईव्ह घडामोडी : Video

जीएसटी चोरी प्रतिबंधक पथकाने या संपूर्ण प्रकाराचा सखोल तपास करण्यात सुरुवात केली. त्यावेळी या कंपन्या एका मोठ्या जीएसटी फ्रॉडशी संबंधित असल्याचं उघड झालं. प्रमुख आरोपी हसमुख पटेल यांच्या राहत्या घरात शोध घेण्यात आला. या तपासातून अनेक खळबळजनक बाबी समोर आल्या. हसमुख पटेल यांनं बनावट कंपन्यांचं एक जाळं तयार केलं होतं. त्याद्वारे त्याने 23.16 कोटी रुपयांचा बोगस आयटीसी तयार केला. 132 कोटी रुपयांची बिलं कोणतंही काम केल्याविनाच किंवा कोणताही माल न देताच तयार करण्यात आली होती, असंही तपासातून समोर आलं.

32 बोगस कंपन्या, 132 कोटीची खोटी बिलं

मुख्य आरोपी हसमुख पटेलचीही चौकशी करण्यात आली. त्यानंतर आरोपीनेही आपण 32 बोगस कंपन्या तयार केल्या असल्याची कबुली दिली. वेगवेगळ्या जीएसटी आयुक्तालयांच्या विभागातून बोगस पद्धतीने जीएसटी चोरी होत असल्याचं प्रकरण उघडकीस आल्यानं आताएकच खळबळ उडाली आहे. आता अटक करण्यात आलेल्या हसमुखची अधिक चौकशी केली जातेय. त्याला 23 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. जीएसटी कायदा 2017च्या कलम 69 च्या अन्वये हसमुख पटेलवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Non Stop LIVE Update
'लोकसभा असो की विधानसभा विकलेला माल परत नाही', अंधारेंचा रोख कुणावर
'लोकसभा असो की विधानसभा विकलेला माल परत नाही', अंधारेंचा रोख कुणावर.
... म्हणून मला संधी नाही; अजित दादांच्या वक्तव्यावरून कुणाचा खोचक टोला
... म्हणून मला संधी नाही; अजित दादांच्या वक्तव्यावरून कुणाचा खोचक टोला.
भुजबळ तुतारीचा प्रचार करताय, शिवसेना आमदाराच्या वक्तव्यावर म्हणाले...
भुजबळ तुतारीचा प्रचार करताय, शिवसेना आमदाराच्या वक्तव्यावर म्हणाले....
पदवीधर मतदारसंघ निवडणूक जाहीर, ठाकरे आणि शिंदे गटाकडून ही नावं आघाडीवर
पदवीधर मतदारसंघ निवडणूक जाहीर, ठाकरे आणि शिंदे गटाकडून ही नावं आघाडीवर.
काँग्रेससोबत जाऊन ठाकरेंची गद्दारी, आदित्यच्या कपाळावर हवं मेरा बाप...
काँग्रेससोबत जाऊन ठाकरेंची गद्दारी, आदित्यच्या कपाळावर हवं मेरा बाप....
15 सेकंद पोलीस हटवा, कळणारही नाही की…नवनीत राणांचं ओवैसींना ओपन चॅलेंज
15 सेकंद पोलीस हटवा, कळणारही नाही की…नवनीत राणांचं ओवैसींना ओपन चॅलेंज.
मनोज जरांगे पाटलांची तब्बल 100 एकरात भव्य सभा, आज संवाद बैठक
मनोज जरांगे पाटलांची तब्बल 100 एकरात भव्य सभा, आज संवाद बैठक.
ताई दाओसच्या गुलाबी थंडीत तुम्ही काय केलंय हे...शीतल म्हात्रेंचा इशारा
ताई दाओसच्या गुलाबी थंडीत तुम्ही काय केलंय हे...शीतल म्हात्रेंचा इशारा.
छगन भुजबळांकडून तुतारीचा प्रचार, शिवसेना आमदाराच्या आरोपानं खळबळ
छगन भुजबळांकडून तुतारीचा प्रचार, शिवसेना आमदाराच्या आरोपानं खळबळ.
लिहून ठेवा... ४ जूननंतर शिंदे तुरूंगात किंवा... बड्या नेत्याचं वक्तव्य
लिहून ठेवा... ४ जूननंतर शिंदे तुरूंगात किंवा... बड्या नेत्याचं वक्तव्य.