Indrani Mukharji : भायखळा तुरुंगातील आंदोलन प्रकरणी इंद्राणी मुखर्जीला किल्ला कोर्टाकडून जामीन

Indrani Mukharji : भायखळा तुरुंगातील आंदोलन प्रकरणी इंद्राणी मुखर्जीला किल्ला कोर्टाकडून जामीन
प्रेमविवाह केला म्हणून मुलीचा वडिलांच्या संपत्तीवरचा हक्क संपत नाही
Image Credit source: टीव्ही9

अतिरिक्त मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटच्या कोर्टाने इंद्राणी मुखर्जीला या खटल्याशी संबंधित कोणालाही प्रलोभन, धमकी न देण्याच्या अटीसह 15,000 रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. इंद्राणी मुखर्जीने तिचे वकील सना रईस खान यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती.

ब्रिजभान जैस्वार

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Mar 20, 2022 | 12:58 AM

मुंबई : बहुचर्चित शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी (Indrani Mukharji) हिला मुंबईतील किल्ला कोर्टाने एका प्रकरणात दिलासा दिला आहे. 2017 मध्ये भायखळा तुरुंगात इतर कैद्यांना भडकावून आंदोलन केल्याप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात इंद्राणीला इस्प्लेनेड कोर्टाकडून जामीन (Bail) मंजूर झाला आहे. हा जामीन मिळाला असला तरी इंद्राणी ही शीना बोरा हत्याकांड प्रकरणात तुरुंगातच राहणार आहे. त्यामुळे जामीनंतरही तिची सुटका होऊ शकणार नाही. (Fort court grants bail to Indrani Mukherjee in Byculla jail agitation case)

कैदी मंजुळा शेट्येच्या मृत्यूनंतर महिला कैद्यांच्या संतापाचा उद्रेक

भायखळा तुरुंगातील सहकारी कैदी मंजुळा शेट्ये हिचा कारागृह कर्मचाऱ्यांच्या हातून मृत्यू झाल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर महिला कारागृहात एकच खळबळ उडाली होती. घटनेनंतर इतर महिला कैद्यांच्या संतापाचा उद्रेक झाला होता. संतप्त महिला कैद्यांनी भायखळा तुरुंगाच्या मालमत्तेचे नुकसान केले होते. यादरम्यान सहा तुरुंग रक्षकांना जखमी केल्याचाही आरोप आहे. मंजुळा शेट्ये हिच्यावर अत्याचार करणाऱ्या तुरुंग कर्मचाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी एफआयआर नोंदवावा, अशी मागणी संतप्त कैद्यांनी केली होती. तुरुंग कर्मचाऱ्यांमुळेच मंजुळाचा बळी गेला, असा दावा कैद्यांनी केला होता.

कोर्टाकडून आरोपपत्राची दखल

भायखळा तुरुंगातील हिंसाचार प्रकरणात पोलिसांच्या गुन्हे शाखेने गेल्या वर्षी आरोपपत्र दाखल केले होते. त्या आरोपपत्राची इस्प्लेनेड मॅजिस्ट्रेट कोर्टाने दखल घेतली आणि आरोपींना समन्स बजावले. याचदरम्यान इंद्राणी मुखर्जीला खटल्याला हजर राहण्याच्या अटीवर जामिनावर सोडण्यात आले. 2017 मध्ये मंजुळा शेट्येच्या मृत्यूनंतर इंद्राणी मुखर्जी व भायखळा महिला कारागृहातील 30 हून अधिक कैद्यांवर गुन्हेगारी कट, दंगल आणि धमकीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. मंजुळा शेट्ये हिच्या मृत्यूची चौकशी व्हावी अशी मागणी करीत आणि कारागृह कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप करत महिला कैद्यांनी आंदोलन केले होते. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी गेल्या वर्षी आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर न्यायालयाने आरोपींना सुनावणीदरम्यान हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते.

15,000 रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन

अतिरिक्त मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटच्या कोर्टाने इंद्राणी मुखर्जीला या खटल्याशी संबंधित कोणालाही प्रलोभन, धमकी न देण्याच्या अटीसह 15,000 रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. इंद्राणी मुखर्जीने तिचे वकील सना रईस खान यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती. तपासादरम्यान आरोपी इंद्राणी मुखर्जीला अटक झाली नव्हती. तपास अधिकाऱ्यांनी दोषारोपपत्र दाखल केले आहे. याचा अर्थ आरोपीची कोठडीत चौकशी करणे आवश्यक नाही, असे इंद्राणीला जामीन मंजूर करताना न्यायालयाने म्हटले. (Fort court grants bail to Indrani Mukherjee in Byculla jail agitation case)

इतर बातम्या

Dabholkar Murder Case : डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाला मोठं वळण, खुन्यांची ओळख अखेर पटली

धक्कादायक : पुण्यात 11 वर्षीय मुलीवर बाप, भाऊ, आजोबा आणि चुलत मामाकडूनच लैंगिक अत्याचार!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें