भंगारवेचक तरुणांची कल्याण स्टेशनवर आपापसात हाणामारी, चाकू हल्ल्यात एकाचा मृत्यू

अमजद खान

| Edited By: |

Updated on: Jul 04, 2021 | 1:36 PM

कल्याण जीआरपीने संतोष राठोड नावाच्या तरुणाला ताब्यात घेतले आहे. मुख्य आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे.

भंगारवेचक तरुणांची कल्याण स्टेशनवर आपापसात हाणामारी, चाकू हल्ल्यात एकाचा मृत्यू
भंगार वेचणाऱ्या तरुणांची आपापसात हाणामारी

कल्याण : भंगार वेचक तरुणांमध्ये आपापसात झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू झाला. मारहाण होत असलेल्या तरुणाने चाकूने प्रतिहल्ला केला असता एकाला प्राण गमवावे लागले. मध्य रेल्वेवरील कल्याण स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर घडलेला प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. (Kalyan Scrap seller attacked by fellow mates dies action caught on CCTV)

मारहाण होणाऱ्या तरुणाचा चाकूहल्ला

कल्याण स्टेशनवर काल भरदिवसा हा प्रकार घडला. शनिवारी सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास कल्याण स्थानकातील फलाट क्रमांक 1 वर भंगार वेचणाऱ्या 3 तरुणांची आपापसात हाणामारी झाली. दोघे जण तिसऱ्या भंगार वेचक तरुणाला मारहाण करत होते. मार खाणाऱ्या तरुणाने त्याच्यावर हल्ला करणाऱ्या दोघांपैकी एकावर चाकूने हल्ला केला.

एक जण ताब्यात, मुख्य आरोपीचा शोध

यामध्ये नारायण नावाचा तरुण जागीच ठार झाला. कल्याण जीआरपीने संतोष राठोड नावाच्या तरुणाला ताब्यात घेतले आहे. मुख्य आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे.

कल्याणमध्ये जमावाची तिघांना मारहाण

दुसरीकडे, कल्याणमध्येच एका युवतीसह दोघा तरुणांना मारहाण केल्या प्रकरणी रिक्षा चालकासह 11 जणांना अटक करण्यात आली आहे. रिक्षाचालकाने छेड काढल्यानंतर तरुणीने मदतीसाठी दोघा मित्रांना बोलावले, मात्र जमावाने या तिघांनाच बेदम मारहाण केली होती. शुक्रवारी घडलेल्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

नेमकं प्रकरण काय?

संबंधित तरुणीने उल्हासनगरहून डोंबिवलीला जाण्यासाठी रिक्षा पकडली होती. रिक्षाने प्रवास करत असताना रिक्षाचालकाने तिची छेड काढली. यानंतर तरुणीने आपल्या दोन मित्रांना याबाबतची माहिती दिली आणि त्यांना तातडीने एका ठिकाणी येण्यास सांगितले. तिचे दोन्ही मित्र कल्याण पूर्वेकडील कोळसेवाडी परिसरात पोहोचलो. यावेळी त्यांचा रिक्षाचालकाशी वाद झाला.

वादावादी सुरु असताना उपस्थित जमावाने तरुणीसह तिच्या दोघा मित्रांनाच मारहाण सुरु केली. पट्ट्याने तिघांनाही बेदम मारहाण होत असल्याचा व्हिडीओ समोर आला. गैरसमजातून ही मारहाण झाल्याचा दावा केला जात होता. त्यानंतर उशिरा या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. अखेर रिक्षा चालकासह 11 जणांना अटक करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या : 

VIDEO | कल्याणमध्ये रिक्षाचालकाकडून तरुणीची छेडछाड, मदतीसाठी पोहोचलेल्या दोघांना जमावाची मारहाण

ठाणे महापालिकेची धडक कारवाई सुरुच, दिवा भागात अनधिकृत बांधकामांवर हातोडा

(Kalyan Scrap seller attacked by fellow mates dies action caught on CCTV)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI