CCTV | कोंबड्या नेणाऱ्या टेम्पोची बाईकला समोरासमोर धडक, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

वसई शहरात टेम्पो आणि बाईकचा भीषण अपघात झाल्याचं समोर आलं आहे. वसईतील रानगाव भागात आज (बुधवारी) सकाळी पावणे सात वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या भरधाव टेम्पोने समोरुन आलेल्या दुचाकीस्वाराला धडक दिली.

CCTV | कोंबड्या नेणाऱ्या टेम्पोची बाईकला समोरासमोर धडक, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
वसईत टेम्पो-बाईकचा अपघात
Follow us
| Updated on: Feb 02, 2022 | 3:16 PM

वसई : वसईत टेम्पो आणि बाईकचा भीषण अपघात (Vasai Accident) झाल्याचं समोर आलं आहे. दुचाकी आणि टेम्पो यांची समोरासमोर धडक होऊन हा अपघात (Tempo Bike Accident) झाला. कोंबड्यांची वाहतूक करणारा टेम्पो भरधाव वेगात जात असताना चालकाने समोरुन आलेल्या दुचाकीस्वाराला उडवले. मुंबईजवळच्या वसई शहरात हा भीषण अपघात घडला. पहाटे 6 वाजून 50 मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातामध्ये बाईकवर पाठीमागे बसलेल्या प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. तर बाईक चालवणारा तरुण अपघातातून बचावला आहे. हेल्मेट घातल्यामुळे दुचाकीस्वार तरुणाचा जीव वाचल्याची माहिती आहे. ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. या अपघाताची वसई पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

नेमकं काय घडलं?

वसई शहरात टेम्पो आणि बाईकचा भीषण अपघात झाल्याचं समोर आलं आहे. वसईतील रानगाव भागात आज (बुधवारी) सकाळी पावणे सात वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या भरधाव टेम्पोने समोरुन आलेल्या दुचाकीस्वाराला धडक दिली. यात मोटारसायकलवरील पाठीमागे बसलेल्या एकाचा जागीच मृत्यू झाला, तर मोटारसायकल चालकाने हेल्मेट घातलेले असल्याने त्याचा जीव वाचला आहे.

हेल्मेटमुळे बाईकचालक वाचला

या अपघाताचा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अपघाताच्या वेळी परेश मेहेर बाईक चालवत होता. सुदैवाने हेल्मेट घातल्यामुळे अपघातातून त्याचा जीव वाचला, तर नारायण राघो मेहेर (वय 54 वर्ष) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

कॉलेज शिपायाचा जागीच अंत

ते वसईतील वर्तक इंजिनिअरिंग कॉलेज येथे शिपाई म्हणून कार्यरत होते. या घटनेमुळे मेहेर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ते नोकरी करत असलेल्या कॉलेजसह त्यांचे नातेवाईक, मित्र परिवार यांच्याकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

या अपघाताची भीषण दृश्यं परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. या अपघाताची वसई पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

PHOTO | ट्रकचा चेंदामेंदा, रस्त्यावर लाल चिखल! औरंगाबादमधील वैजापुरात विचित्र अपघात कसा घडला?

धुळ्यात Mumbai- आग्रा महामार्गावर भीषण अपघात, केमिकलच्या टँकरला भीषण आग

VIDEO | डिव्हायडरचा अंदाज चुकल्याने भीषण अपघात, पाच प्रवाशांसह कार पुलावरुन थेट खाली

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.