भिवंडीतील ओला चालकाच्या हत्येचं गूढ उकललं, पत्नीकडूनच प्रियकराच्या साथीने सुपारी

मुंबई-नाशिक महामार्गावर भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावरील माणकोली नाका येथे एका कारमध्ये मृतदेह आढळला होता. महामार्गावरील माणकोली परिसरात उड्डाणपुलाच्या खाली उभ्या असलेल्या व्हॅगन आर कारच्या ड्रायव्हरचा हा मृतदेह होता.

भिवंडीतील ओला चालकाच्या हत्येचं गूढ उकललं, पत्नीकडूनच प्रियकराच्या साथीने सुपारी
भिवंडीत ओला कार चालकाची हत्या

भिवंडी : भिवंडीत ओला कार चालकाची गळा आवळून हत्या झाल्याच्या प्रकरणाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. ड्रायव्हरच्या पत्नीनेच प्रियकराच्या साथीने त्याची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई-नाशिक महामार्गावर उभ्या असलेल्या एका कारमध्ये मृतदेह आढळल्याने दोन दिवसांपूर्वी खळबळ उडाली होती.

चालकाच्या पत्नीनेच पतीच्या हत्येची सुपारी दिल्याचा आरोप आहे. पत्नीने प्रियकर आणि मैत्रिणीच्या मदतीने पतीच्या हत्येचा कट रचला होता. तिघांना भिवंडीतील नारपोली पोलिसांनी अटक केली आहे. तर हत्या करणारे दोघे जण फरार झाले आहेत.

नेमकं काय घडलं?

मुंबई-नाशिक महामार्गावर भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावरील माणकोली नाका येथे एका कारमध्ये मृतदेह आढळला होता. महामार्गावरील माणकोली परिसरात उड्डाणपुलाच्या खाली उभ्या असलेल्या व्हॅगन आर कारच्या ड्रायव्हरचा हा मृतदेह होता. या घटनेची माहिती स्थानिक नारपोली पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाची तपासणी केली. मृतदेहाच्या गळ्याभोवती आवळल्याचे व्रण दिसल्याने ही हत्या असल्याचे निष्पन्न झाले आहे.

लॉकडाऊनमुळे काम बंद

प्रभाकर पांडू गंजी (वय 42 वर्ष) असे मयत व्यक्तीचे नाव असून तो पद्मा नगर – भिवंडी येथील रहिवासी होता. यंत्रमाग कारखान्यात व्यवस्थापक म्हणून काम करत असताना लॉकडाऊनमुळे काम बंद झाले. त्यामुळे आर्थिक टंचाईतून सुटका करून घेण्यासाठी त्याने स्वतःच्या व्हॅगन आर कारला ओलामध्ये लावून घेतलं. स्वतःच ड्रायव्हर म्हणून त्याने मागील एक महिन्यापासून काम करण्यास सुरुवात केली होती.

विवाहबाह्य संबंधांतून हत्या

विवाहबाह्य संबंधांतून पत्नीनेच प्रियकर आणि मैत्रिणीच्या मदतीने प्रभाकर पांडू गंजी यांच्या हत्येची सुपारी दिल्याचे पोलीस तपासात समोर आले. तिघांना भिवंडीतील नारपोली पोलिसांनी अटक केली आहे.

संबंधित बातम्या :

मॅनेजरची नोकरी गेली, महिन्यापासून ओला कारचा ड्रायव्हर, भिवंडीत गाडीमध्येच गळा दाबून हत्या

पोक्सो अंतर्गत गुन्हा, महिन्याभरात कारागृहात आत्महत्या, भल्या पहाटे कैद्याने स्वत:ला का संपवलं?

मोहिते-साठे गटात तुफान राडा, धारधार शस्त्राने भर दिवसा तिघांचा खून, सांगलीमध्ये खळबळ

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI