Mumbai Crime | मुंबईत वर्षानुवर्षे ड्रग्जचा व्यवसाय, पती-पत्नीला अटक, 35 लाखांचे हेरॉईन जप्त

झोन 12 चे डीसीपी सोमनाथ घार्गे यांना दहिसर परिसरात काही लोक ड्रग्जचा व्यवसाय करत असल्याची माहिती मिळाली होती. माहितीच्या आधारे डीसीपी पथकाच्या एटीसी पथकाने दहिसरच्या अंबावाडी जंक्शन पुष्प विहार कॉलनीत छापा टाकला

Mumbai Crime | मुंबईत वर्षानुवर्षे ड्रग्जचा व्यवसाय, पती-पत्नीला अटक, 35 लाखांचे हेरॉईन जप्त
ड्रग्ज तस्करी प्रकरणी कारवाई
Follow us
| Updated on: May 07, 2022 | 1:19 PM

मुंबई : मुंबईत वर्षानुवर्षे ड्रग्जचा व्यवसाय (Drugs) करणाऱ्या बंटी आणि बबलीला मुंबईच्या दहिसर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी 295 ग्रॅम हेरॉईन (Mumbai Crime News) जप्त केले असून, त्याची किंमत 35 लाख 40 हजार इतकी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पती-पत्नी दहिसरच्या अंबावाडी परिसरात राहतात, दोघेही ड्रग्जची खरेदी-विक्री करतात. त्यांच्यावर यापूर्वीही अमली पदार्थांची विक्री (Heroin Smuggling) केल्याचा आरोप आहे.

काय आहे प्रकरण?

झोन 12 चे डीसीपी सोमनाथ घार्गे यांना दहिसर परिसरात काही लोक ड्रग्जचा व्यवसाय करत असल्याची माहिती मिळाली होती. माहितीच्या आधारे डीसीपी पथकाच्या एटीसी पथकाने दहिसरच्या अंबावाडी जंक्शन पुष्प विहार कॉलनीत छापा टाकला, त्यात जमीर बाबू मुजावर आणि फरजाना जमीर मुजावर यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्या घरातून 295 ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले, ज्याची किंमत 35 लाख 40 हजार रुपये इतकी आहे.

हे दोघे पती-पत्नी दीर्घकाळापासून अंमली पदार्थांचा व्यवसाय करत होते. पोलिसांनी सांगितले की, दोघेही सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत अंबावाडी रेल्वे मार्गावर अंमली पदार्थांची विक्री करायचे. त्यांच्याविरुद्ध कस्तुरबा पोलीस, एमएचबी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत ७ हून अधिक गुन्हे दाखल आहेत.

संंबंधित बातम्या :

मुंबई विमानतळावर 3.98 किलो हेरॉईन जप्त, दक्षिण आफ्रिकन नागरिकाला अटक

Sangli | ऊसाच्या शेतात गांजाची लागवड, सांगलीत 25 किलोंचा गांजा आढळला

कॅटरिंगच्या व्यवसायाखाली मानवी तस्करी, एका कॉलमुळे नागपुरातील रॅकेटचा भांडाफोड

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.