दीपिका पदुकोणची माजी मॅनेजर करिष्मा प्रकाशविरोधात NCB कडून महत्त्वाचे पुरावे कोर्टात सादर

करिष्मा प्रकाश हिचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सेशन्स कोर्टाने फेटाळला होता. त्यानंतर अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून करिष्माने मुंबई हायकोर्टात अर्ज केला आहे.

दीपिका पदुकोणची माजी मॅनेजर करिष्मा प्रकाशविरोधात NCB कडून महत्त्वाचे पुरावे कोर्टात सादर
दीपिका पदुकोण आणि करिष्मा प्रकाश

मुंबई : सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) हिची माजी मॅनेजर करिष्मा प्रकाशच्या (Karishma Prakash) विरोधात अनेक महत्त्वाचे पुरावे कोर्टात सादर करण्यात आले आहेत. एनसीबी अर्थात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मुंबई हायकोर्टात काल हे पुरावे सादर केले. करिष्माच्या अटकपूर्व जामीन अर्जावर 9 सप्टेंबर रोजी मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे.

करिष्मा प्रकाश हिचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सेशन्स कोर्टाने फेटाळला होता. त्यानंतर अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून करिष्माने मुंबई हायकोर्टात अर्ज केला आहे.

ड्रग्ज रॅकेट प्रकरणात चौकशी

करिष्मा प्रकाशने काही सेलिब्रिटींची मॅनेजर म्हणून काम केले आहे. ती अभिनेत्री दीपिका पदुकोण हिची मॅनेजर होती. करिष्माच्या घरी मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ सापडले होते. याबाबत एनसीबीने गुन्हा दाखल केला होता. अभिनेता सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतर बॉलिवूड इंडस्ट्रीतील ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला होता. या प्रकरणी करिष्मा प्रकाश हिच्यासह अनेक बड्या अभिनेत्रींना चौकशीला सामोरे जावे लागले होते.

करिष्मा प्रकाशवर कोणते आरोप?

एनसीबीने करिष्मा प्रकाशवर एनडीपीएस कायद्यातील कलम 27-अ हे कठोर कलमही लावले होते. अमली पदार्थांच्या तस्करीसाठी पैसा पुरवणे आणि यातील गुन्हेगारांना आश्रय देणे, याबद्दल हे कलम असून, त्याअंतर्गत दोषीला 10 ते 20 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. ‘एनसीबी’ने करिष्माला अटकपूर्व जामीन मंजूर करण्यासही तीव्र विरोध दर्शवला आहे.

करिष्माचे एनसीबी अधिकाऱ्यांवर आरोप

मार्च महिन्यात करिष्मा प्रकाशची एनसीबीमार्फत चौकशी करण्यात आली होती. चौकशीदरम्यान अधिकाऱ्यांनी दबाव आणल्याचा आरोप  करिष्मा प्रकाशने केला होता. “वकील बदल, अन्यथा तुझ्यावर गुन्ह्याची कठोर कलमे लावू” असे या अधिकाऱ्यांनी मला धमकावल्याचे करिष्मा प्रकाश हिने म्हटले होते. मात्र, एनसीबीने हा आरोप फेटाळून लावला होता. एनसीबीने यासंदर्भात न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करुन माहिती दिली होती. करिष्माविरोधात कठोर कलम लावण्याचे आधीपासूनच ठरले होते, असे यामध्ये स्पष्ट करण्यात आले होते.

संबंधित बातम्या:

Drug Case | दीपिका पदुकोण – मॅनेजर करिश्मा गोव्यात होत्या, सूत्रांची माहिती

वकील बदल नाहीतर… दीपिका पदुकोणच्या मॅनेजरला NCBच्या अधिकाऱ्यांची धमकी?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI