अश्विनी बिद्रेंच्या हत्येनंतर कुरुंदकरची परस्पर फ्लॅटला रंगरंगोटी, घरमालकाच्या दाव्याने ट्विस्ट

हर्षल भदाणे पाटील

| Edited By: |

Updated on: Aug 29, 2021 | 8:01 AM

अश्विनी बिद्रे यांची हत्या झाल्यानंतर फ्लॅटचा कलर बदलला असल्याची माहिती पोलिस तपासात उघड झाली होती. शुक्रवारी झालेल्या साक्ष आणि उलटतपासणीमध्ये फ्लॅट मालकाने केलेल्या खुलाशामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.

अश्विनी बिद्रेंच्या हत्येनंतर कुरुंदकरची परस्पर फ्लॅटला रंगरंगोटी, घरमालकाच्या दाव्याने ट्विस्ट
सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे

Follow us on

नवी मुंबई : सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे (Ashwini Bidre) हत्या प्रकरणातील तीन व्यक्तींची साक्ष आणि उलटतपासणी शुक्रवारी न्यायमूर्ती माधुरी आनंद यांच्या समक्ष झाली. बिद्रे यांची हत्या ज्या फ्लॅटमध्ये झाल्याचा दावा केला जातो, त्या फ्लॅटचा रंग भाडेकरु असलेल्या पोलिस अधिकारी अभय कुरुंदकर (Abhay Kurundkar) याने परस्पर बदलल्याची साक्ष फ्लॅटचे मालक रामानंद स्वामी यांनी न्यायालयात दिली.

परवानगीविना फ्लॅटला रंगकाम

अश्विनी बिद्रे यांची हत्या झाल्यानंतर फ्लॅटचा कलर बदलला असल्याची माहिती पोलिस तपासात उघड झाली होती. शुक्रवारी झालेल्या साक्ष आणि उलटतपासणीमध्ये फ्लॅट मालकाने केलेल्या खुलाशामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. फ्लॅटला नव्याने कलर करण्यासाठी त्याने आपल्याकडून कोणतीही परवानगी घेतली नव्हती. फ्लॅट रंगवल्याची माहिती आपल्याला इमारतीच्या वॉचमनकडून कळाली, असा दावा मालकाने केला.

कुंदन भंडारीच्या मोबाईल लोकेशनची माहिती

कुरुंदकर याचा सहकारी कुंदन भंडारी यांच्या मोबाईल लोकेशन संदर्भातील टाटा टेलिकम्युनिकेशनचे नोडल ऑफिसर बेबी जॉन यांची साक्षही शुक्रवारी झाली. यापूर्वी कुंदन भंडारी यांच्या वकिलांनी बिद्रे यांची हत्या झाली त्या दिवशी आणि अन्य दिवशीही भंडारी त्या परिसरात नव्हते, असा युक्तिवाद केला होता. पण भंडारींच्या मोबाईल सिमच्या नेटवर्क प्रकरणी टाटा टेलिकम्युनिकेशनचे नोडल ऑफिसर बेबी जॉनची उलटतपासणी झाली. यामध्ये त्यांनी कागदपत्रे सादर करून भंडारींच्या ठावठिकाणाची माहिती दिली.

फ्लॅटचे भाडे न मिळाल्याने वडिलांना फोन

अश्विनी बिंद्रे हार्मिनिक बिल्डिंग मधील बी 501 मध्ये जुलै 2015 पासून राहात होत्या. त्यांनी मार्च 2016 पर्यंतचे भाडे आपल्या खात्यावर ऑनलाईन जमा केले. पण एप्रिल 2016 पासून त्यांनी भाडे दिले नाही. त्यामुळे आपण त्यांना वारंवार फोन केला. मात्र, त्यांचा फोन बंद येत होता. त्यामुळे आपण जून 2016 मध्ये ऑस्ट्रेलियातून आल्यानंतर पोलिस ठाण्यात जाऊन बिद्रे यांचे वडील जयकुमार बिद्रे यांचा फोन नंबर मिळवला. त्यांना फोन करून अश्विनी बिद्रे आणि भाड्याबद्दल विचारणा केली, त्यावेळेस तुमचे भाडे तुम्हाला लवकरच मिळेल आणि आम्ही अश्विनीचा शोध घेत आहोत, असे त्यांच्या वडिलांनी सांगितल्याची माहिती फ्लॅटचे मालक रामानंद स्वामी यांनी दिली. या प्रकरणाची पुढील सुनावणी तीन सप्टेंबरला होणार आहे.

संबंधित बातम्या :

अश्विनी बिद्रे हत्याकांडातील मुख्य आरोपीच्या पत्नीचा कोरोनाने मृत्यू, मुलगा-मुलगीही पॉझिटिव्ह, कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला

बहुचर्चित पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्येप्रकरणात सरकारचा बोटचेपेपणा उघड

Non Stop LIVE Update

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI