Couple Attacked | घराचं दार तोडून झोपलेल्या दाम्पत्यावर सपासप वार, नालासोपाऱ्यात खळबळ

अमित मिश्रा (वय 30), ज्योती मिश्रा (वय 28) असे माथेफिरुच्या हल्ल्यात जखमी झालेल्या पती पत्नीचे नाव आहे. ते दोघेही मूळचे उत्तर प्रदेश येथील राहणारे आहेत.

Couple Attacked | घराचं दार तोडून झोपलेल्या दाम्पत्यावर सपासप वार, नालासोपाऱ्यात खळबळ
नालासोपाऱ्यात जोडप्यावर हल्ला
विजय गायकवाड

| Edited By: अनिश बेंद्रे

Dec 19, 2021 | 8:45 AM

नालासोपारा : घराचे दार तोडून झोपेत असणाऱ्या पती-पत्नीवर हल्ला करण्यात आला होता. मुंबईजवळच्या नालासोपारा परिसरात ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका अनोळखी माथेफिरु तरुणाने धारदार हत्याराने दाम्पत्यावर प्राणघातक वार केले. हल्ल्यानंतर आरोपी फरार झाला आहे.

काय आहे प्रकरण?

नालासोपारा पूर्व भावशेत पाडा येथे शनिवार पहाटे 3 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेत पती-पत्नीच्या गळ्यावर, छातीवर वार झाल्याने दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शताब्दी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

उत्तर प्रदेशचे जोडपे, नालासोपाऱ्यात वास्तव्य

अमित मिश्रा (वय 30), ज्योती मिश्रा (वय 28) असे माथेफिरुच्या हल्ल्यात जखमी झालेल्या पती पत्नीचे नाव आहे. ते दोघेही मूळचे उत्तर प्रदेश येथील राहणारे आहेत. हे जोडपं सध्या कामा निमित्त नालासोपारा पूर्व भावशेत पाडा येथे राहत होते.

हल्ल्याचं कारण अस्पष्ट

दोघांवर झालेल्या हल्ल्याचे नेमके कारण सध्या स्पष्ट झालेले नाही. याबाबत अनोळखी तरुणा विरोधात प्राणघात हल्ला केल्याप्रकरणी तुलिंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे.

काय आहे प्रकरण?

Traffic Police | Nagpur | मुंबईतील घटनेची नागपुरात पुनरावृत्ती! वाहतूक पोलिसाला फरफटत नेलं

Attack on Shiv Sena Activist | शिवसेना कार्यकर्त्यावर कणकवलीत तलवारीनं हल्ला! हल्ल्यामागे राणेंचा हात?

Bihar | दारुसाठी कल्ला, बिहारमधील पोलिसाचाही बाटलीवर डल्ला?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें