Aryan Khan | आर्यन खानला ‘जेल की बेल’? NCB च्या कोठडीबाबत कोर्टात फैसला होणार

आर्यन खानच्या बाजूने प्रसिद्ध वकील सतीश मानशिंदे यांनी युक्तिवाद केला होता. आर्यन खान याच्याकडे कोणतेही ड्रग्ज सापडलेले नव्हते. तसेच त्याकडे बोर्डिंग पास नव्हता. त्याला पार्टीचं निमंत्रण देण्यात आलं होतं, असं त्यांनी सांगितलं होतं.

Aryan Khan | आर्यन खानला 'जेल की बेल'? NCB च्या कोठडीबाबत कोर्टात फैसला होणार
Shahrukh Khan Aryan Khan
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अनिश बेंद्रे

Oct 07, 2021 | 3:29 PM

मुंबई : बॉलिवूडचा किंग शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला आज पुन्हा कोर्टात हजर केले जाणार आहे. आर्यनला जामीन मिळणार की त्याच्या कोठडीत वाढ होणार, याचा फैसला काही वेळात होणार आहे. एनसीबीने (NCB) अटक केल्यानंतर आर्यन खानची कोठडी 7 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली होती.

ड्रग्ज प्रकरणात देण्यात आलेल्या एका दिवसाच्या कोठडीची मुदत संपल्यानंतर आर्यन खानला 4 ऑक्टोबरला दुपारी न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी न्यायालयात तब्बल अडीच तासांचा युक्तिवाद झाला होता. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने 7 ऑक्टोबरपर्यंत आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांना कोठडी सुनावली होती.

सतिश मानेशिंदे यांचा कोर्टात नेमका काय दावा?

आर्यन खानच्या बाजूने प्रसिद्ध वकील सतीश मानशिंदे यांनी युक्तिवाद केला होता. आर्यन खान याच्याकडे कोणतेही ड्रग्ज सापडलेले नव्हते. तसेच त्याकडे बोर्डिंग पास नव्हता. त्याला पार्टीचं निमंत्रण देण्यात आलं होतं. त्यामुळे तो पार्टीसाठी गेला होता. त्याची बॅग चेक करण्यात आली तेव्हा त्याच्या बॅगेतही काहीच मिळालं नाही. त्याचा मित्र अरबाज याच्याकडे 6 ग्रॅम चरस सापडलं. दिल्लीची मॉडेल मुनमुन धरेजा हिच्याकडे 5 ग्रॅम चरस सापडलं होतं. या दोन आरोपींकडे सापडलेल्या ड्रग्जचा आर्यनचा संबंध नाही, असं आर्यनची बाजू मांडणारे वकील सतीश मानेशिंदे यांनी कोर्टात सांगितलं होतं.

कोर्टात नेमका कोणता युक्तिवाद झाला होता?

एनसीबीचे वकील : आर्यनच्या मोबईलमधून धक्कादायक फोटो मिळाले आहेत. तसेच मोबाईल चॅटमधून अनेक पुरावे मिळाले आहेत. क्रूझ पार्टीचं आंततराष्ट्रीय कनेक्शन उघड होत आहे. आर्यनसह नऊ आरोपींना 11 ऑक्टोबरपर्यंत कोठडी द्यावी

वकील सतिश मानशिंदे : एनसीबीच्या तपासात आर्यनकडे ड्रग्ज सापडलेलं नाही. अरबाज मर्चंटकडे 6 ग्रॅम ड्रग्ज सापडलं. आर्यनचा ड्रग्ज खरेदी तसेच विक्रीमध्ये काहीही संबंध नाही त्यामुळे आंतरराष्ट्रीय संबंध कसा? व्हॉट्सअ‌ॅप चॅटिंगमुळे ड्रग्ज पेडलर ठरवता येत नाही. व्हॅट्सअ‌ॅप चॅट पुरावे म्हणून पाहता येत नाहीत.

इतर बातम्या :

Aryan Khan Drug Case | आर्यन खानला दिलासा नाहीच, कोठडीत 7 ऑक्टोबरपर्यंत वाढ

Mumbai drugs case : आर्यन खानच्या फोनमध्ये आक्षेपार्ह फोटो, कोर्टात NCBचा मोठा दावा

Cruise Party EXCLUSIVE Video : आर्यन खानला NCB ने उचललं, त्या क्रुझ पार्टीचा एक्स्क्लुझिव्ह व्हिडीओ

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें