AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादीच्या स्वच्छ प्रतिमेच्या नेत्याचा मुलगा बेटिंगमध्ये अडकला, उल्हासनगरात बेड्या

गिरीश जेसवानी हा उल्हासनगर महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक दादा सतरामदास जेसवानी यांचा मुलगा आहे. सतरामदास जेसवानी यांची स्वच्छ प्रतिमेचे ज्येष्ठ नगरसेवक म्हणून उल्हासनगरात ओळख आहे

राष्ट्रवादीच्या स्वच्छ प्रतिमेच्या नेत्याचा मुलगा बेटिंगमध्ये अडकला, उल्हासनगरात बेड्या
उल्हासनगरात बेटिंग प्रकरणी दोघांना अटक
| Edited By: | Updated on: Oct 06, 2021 | 7:51 AM
Share

उल्हासनगर : उल्हासनगरात क्रिकेटवरील बेटिंग प्रकरणी गुन्हे शाखेने दोघा जणांना बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे अटक केलेल्या आरोपींमध्ये उल्हासनगर महापालिकेतील राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नगरसेवकाच्या मुलाचाही समावेश आहे. सतरामदास जेसवानी यांची स्वच्छ प्रतिमेचे ज्येष्ठ नगरसेवक म्हणून उल्हासनगरात ओळख आहे.

काय आहे प्रकरण?

सध्या आयपीएलचा हंगाम असून सोमवारी चेन्नई विरुद्ध दिल्ली सामना सुरु असताना त्यावर बेटिंग चालू असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या उल्हासनगर युनिट 4 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी क्रिकेट बुकी विशाल सावलानी याच्या घरी धाड टाकली.

ज्येष्ठ नगरसेवक दादा सतरामदास जेसवानी यांचा मुलगा

यावेळी विशाल सावलानी आणि गिरीश जेसवानी हे दोघे बेटिंग करताना आढळून आले. यापैकी गिरीश जेसवानी हा उल्हासनगर महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक दादा सतरामदास जेसवानी यांचा मुलगा आहे. सतरामदास जेसवानी यांची स्वच्छ प्रतिमेचे ज्येष्ठ नगरसेवक म्हणून उल्हासनगरात ओळख आहे. मात्र त्यांच्या मुलाला बेटिंग प्रकरणात अटक झाल्याने खळबळ उडाली आहे.

अटक केलेल्या विशाल सावलानी आणि गिरीश जेसवानी यांच्याकडून पोलिसांनी तीन मोबाईल, सिम कार्ड्स, डायरी, लॅपटॉप आणि अन्य साहित्य जप्त केलं आहे. मागील दोन दिवसातली उल्हासनगर शहरातली ही सट्टेबाजांवर केलेली दुसरी कारवाई आहे. त्यामुळं सट्टेबाज उल्हासनगर शहर सोडून अन्यत्र गेल्याची शहरात चर्चा आहे.

उल्हासनगरात सलग दुसरी कारवाई

याआधी, उल्हासनगरात आयपीएल सामन्यांवर सुरु असलेल्या बेटिंगचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला होता. तसंच तीन बुकींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. या तिघांकडून 25 लाख रुपये रोख, लॅपटॉप, मोबाईल फोन्स, ट्रान्समिशन मशीन जप्त करण्यात आली होती.

काय आहे प्रकरण?

उल्हासनगरच्या कॅम्प 3 भागातील थायरासिंग दरबार परिसरात माँ बजाज व्हिला नावाचा बंगला आहे. या बंगल्यात काही बुकी आयपीएल सामन्यांवर बेटिंग करत असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेनं शनिवारी आयपीएल मॅच सुरू असताना या बंगल्यावर धाड टाकली होती.

बेटिंग सुरू असतानाच रंगेहाथ बेड्या

या ठिकाणी गुगल पे द्वारे बेट स्वीकारून ऑनलाईन सॉफ्टवेअरवर त्याची नोंद केली जात असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. त्यामुळं बेटिंग सुरू असतानाच पोलिसांनी रंगेहाथ तीन बुकींना अटक केली. धर्मेंद्र बजाज, राहुल बजाज आणि चिरंजीव अनिल आहुजा अशी या तीन बुकींची नावं आहेत.

या तिघांकडून 25 लाख रुपये रोख, लॅपटॉप, मोबाईल फोन्स, ट्रान्समिशन मशीन जप्त करण्यात आली. सकाळी 4 वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पुण्यात सट्टेबाजांना अटक

याआधी, पुण्याजवळील गहुंजे स्टेडियमजवळ झालेल्या क्रिकेट बेटिंगचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन समोर आले होते. वेस्ट इंडिज येथील एका इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवरील कर्मचाऱ्याचे नाव समोर आले होते. भारत विरुद्ध इंग्लड सामन्यातील प्रत्येक बॉलवर डोंगरावरुन दुर्बिणीच्या माध्यमातून नजर ठेवली गेली होती. सट्टेबाजी करणाऱ्या 33 बुकींना पुण्यात मार्च महिन्यात अटक करण्यात आली होती.

गडचिरोलीत ऑनलाईन बेटिंग

दुसरीकडे, गडचिरोलीसह संपूर्ण राज्यात सक्रिय असलेल्या बीटेक्स 1 को आणि नाईस 777 नेट या ऑनलाईन बेटिंग प्लॅटफार्मवर जुगार खेळणाऱ्या टोळीला पोलीसांनी जेरबंद केले. ऑलिम्पिक स्पर्धेसह आयपीएल, फुटबॉल आणि विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रकारात बेटींग करण्यात या टोळीचा समावेश असून याचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत असल्याचा अंदाज आहे. पोलीसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

संबंधित बातम्या :

डोंगरावरुन दुर्बिणीतून प्रत्येक बॉलवर नजर, पुण्यात ‘टीव्हीपेक्षा तेज’ सट्टेबाजी करणाऱ्या 33 बुकींना अटक

Ind Vs Eng | गहुंजेजवळील क्रिकेट बेटिंगचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन, वेस्ट इंडिजमधील स्टेडियम कर्मचारी रडारवर

आयपीएल सामन्यांवर बेटिंग, उल्हासनगरात तीन बुकींना अटक, 25 लाखांची रोकड जप्त

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.