AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सचिन वाझेसोबत 5 स्टारमध्ये दिसलेली ‘मिस्ट्री वूमन’ वेश्या, ‘एनआयए’ला महिलेचाच जबाब

वाझेसोबत फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सीसीटीव्हीत दिसणारी ती मिस्ट्री वूमन वेश्या म्हणून काम करत होती. ऑगस्ट 2020 पासून सचिन वाझे त्या महिलेला दरमहा 50 हजार द्यायचा. याशिवाय वाझेने दोन तीन कंपन्यांमध्येही तिला भागीदार बनवलं होतं, अशी माहिती समोर आली आहे

सचिन वाझेसोबत 5 स्टारमध्ये दिसलेली 'मिस्ट्री वूमन' वेश्या, 'एनआयए'ला महिलेचाच जबाब
sachin vaze
| Edited By: | Updated on: Sep 09, 2021 | 8:47 AM
Share

मुंबई : निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझेसोबत (Sachin Vaze) फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सीसीटीव्हीत दिसणारी ती मिस्ट्री वूमन वेश्या म्हणून काम करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महिलेने ‘एनआयए’ला दिलेल्या जबाबात याचा उल्लेख आहे. वाझे तिला खूप वर्षापासून ओळखायचा, वाझेनेच तिला ते काम बंद करायला सांगितलं होतं.

काय आहे प्रकरण?

वाझेसोबत फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सीसीटीव्हीत दिसणारी ती मिस्ट्री वूमन वेश्या म्हणून काम करत होती. ऑगस्ट 2020 पासून सचिन वाझे त्या महिलेला दरमहा 50 हजार द्यायचा. याशिवाय वाझेने दोन तीन कंपन्यांमध्येही तिला भागीदार बनवलं होतं. सचिन वाझेने तिला 16 फेब्रुवारीला मुंबई पोलीस आयुक्तांच्या ऑफिसमध्ये बोलावून 40 लाख रुपयांची रोख रक्कम दिली होती, अशी माहिती समोर आली आहे.

मोजून 786 सिरीयल नंबरच्या नोटा परत कर, आणि उरलेले पैसे ठेवून घे असं सांगितलं होतं. त्यानुसार त्या महिलेने 36 लाख रुपये वाझेला फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये परत आणून दिले, जे सीसीटीव्हीत दिसलं. सचिन वाझेने त्या महिलेला भागीदार बनवलेल्या मयांक ऑटोमेशन या कंपनीच्या खात्यात एनआयएला दीड कोटी रुपये सापडले होते, असा उल्लेख आरोपपत्रामध्ये आहे. वाझे तिला खूप वर्षापासून ओळखायचा, वाझेनेच तिला वेश्या व्यवसायाचं काम बंद करायला सांगितलं होतं.

परमबीर सिंह यांनी सायबर तज्ज्ञाला लाच दिल्याचा आरोप

दुसरीकडे, उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटिलियाबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणी (Mukesh Ambani Antilia Bomb Scare) अहवालात छेडछाड करण्यासाठी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी सायबर तज्ज्ञाला 5 लाख रुपयांची लाच दिल्याचा आरोप झाला आहे. एनआयएच्या आरोपपत्रात सायबर तज्ज्ञाचा जबाब नोंदवण्यात आला आहे. अँटिलियाबाहेर सापडलेल्या स्फोटकाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या जैश-उल-हिंद संघटनेचं नाव अहवालात घुसवण्यासाठी परमबीर सिंह यांनी लाच दिल्याचा आरोप आहे.

अँटिलिया स्फोटक प्रकरणात एक मोठा कट असून आणखी काही संशयित असल्याचा दावा एनआयएने आरोपपत्रात केला आहे. परमबीर सिंग यांनी ज्या सायबर तज्ज्ञाकडून रिपोर्ट बनवून घेतला, तो सीपी मुंबई या ऑफिशियल मेल आयडीवर मी पाठवला, असं सायबर तज्ज्ञाने जबाबात म्हटलं आहे.

सायबर तज्ज्ञाची दिशाभूल केल्याचा दावा

परमबीर सिंग यांनी या सायबर तज्ज्ञाला विश्वासात घेण्यासाठी हे ऑफिशियल आणि खूप कॉन्फिडेनशीयल काम आहे. यासंदर्भात मी एनआयएच्या आयजींशीही बोलणार आहे असं सांगितलं होतं. दिल्लीतल्या इस्राईल एम्बसीसमोर झालेला ब्लास्ट ज्या पद्धतीने दहशतवादी संघटनेशी जोडला गेला आणि त्याची पाळंमुळं तिहार जेलमध्ये सापडली त्यावरुनच असाच अहवाल तयार करण्यासाठी परमबीर यांनी सायबर तज्ज्ञाला सांगितल्याची माहिती आहे.

सचिन वाझे पुन्हा स्कॉर्पिओजवळ का?

ज्या दिवशी स्फोटकांची गाडी अँटिलिया परिसरात ठेवण्यात आली, त्या दिवशी सचिन वाझे दुसऱ्यांदा स्कॉर्पिओजवळ का गेला, याचं कारण आरोपपत्रात देण्यात आलं आहे. पोलीस आयडी कार्ड स्कॉर्पिओ गाडीत राहिलं, असं सचिन वाझेला वाटलं. म्हणून ते तपासण्यासाठी तो पुन्हा गेल्याचा दावा करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

अँटिलिया स्फोटक प्रकरणात ‘जैश-उल-हिंद’चं नाव घुसवा, परमबीर सिंह यांची सायबर तज्ज्ञाला लाच?

अंतर ठेवून बसा, कोर्टात सचिन वाझे-सुनील मानेचा बोलण्याचा प्रयत्न, न्यायाधीशांनी फटकारलं

गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.