माहेरी गेलेल्या पत्नीची हत्या, घरगुती वादातून विरारमध्ये पतीचं टोकाचं पाऊल

विजय गायकवाड

| Edited By: |

Updated on: Sep 27, 2021 | 3:25 PM

28 वर्षांच्या सुप्रिया गुरवची कौटुंबिक वादातून पतीने धारदार हत्याराने वार करून निर्घृणपणे हत्या केली. विरार पूर्व फुलपाडा परिसरातील नरेंद्र माऊली अपार्टमेंट पहिल्या मजल्यावरील रूम नंबर 106 मध्ये ही हत्या करण्यात आली

माहेरी गेलेल्या पत्नीची हत्या, घरगुती वादातून विरारमध्ये पतीचं टोकाचं पाऊल
विरारमध्ये पतीकडून पत्नीची हत्या

विरार : घरगुती वादातून विरारमध्ये पतीने पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. धारदार हत्याराने वार करुन पतीने खून केल्याचा आरोप आहे. विरार पूर्व फुलपाडा गांधी चौकातील नरेंद्र माऊली अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली आहे. सुप्रिया गुरव (वय 28 वर्ष) असे हत्या झालेल्या पत्नीचे नाव असून, जगदीश गुरव असे आरोपी पतीचे नाव आहे. याबाबत विरार पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपी पती हा फरार झाला आहे.

नेमकं काय घडलं?

28 वर्षांच्या सुप्रिया गुरवची कौटुंबिक वादातून पतीने धारदार हत्याराने वार करून निर्घृणपणे हत्या केली. विरार पूर्व फुलपाडा परिसरातील नरेंद्र माऊली अपार्टमेंट पहिल्या मजल्यावरील रूम नंबर 106 मध्ये ही हत्या करण्यात आली आहे. काल मध्यरात्रीच्या सुमारास राहत्या घरातच ही घटना घडली आहे.

आरोपी पती फरार

हत्या झालेल्या महिलेला तीन मुलं असून ती आईकडे राहण्यासाठी अली होती. घरगुती वादातून हत्या केली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. विरार पोलीस ठाण्यात कलम 302 प्रमाणे हत्येचा गुन्हा दाखल केला असून, आरोपी पतीच्या शोधासाठी 2 विशेष पथके तयार करून रवाना केले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

फुलपाडा परिसरात हत्याकांडाचे सत्र

विरार पूर्व फुलपाडा परिसरात हत्याकांडाचे सत्र सुरूच आहे. बांधकाम व्यावसायिक निशांत कदम याच्या हत्येनंतर आता पतीने पत्नीची हत्या केल्याने परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या परिसरात गस्त वाढवावी अशी मागणी स्थनिक नागरिक करत आहेत.

छत्तीसगडमध्ये पत्नीकडून पतीची हत्या

दुसरीकडे, छत्तीसगडच्या कोरिया जिल्ह्यातील बैकुंठपूर पोलीस स्टेशन परिसरात हृदयाचा थरकाप उडवणारी एक घटना उघडकीस आली आहे. पतीच्या मोबाईलमध्ये दुसऱ्या महिलेचा फोटो पाहून पत्नीने संतापाच्या भरात त्याची निर्घृण हत्या केली. पती रात्री झोपेत असताना पत्नीने त्याच्या डोक्यावर आधी हातोड्याने वार केले आणि नंतर त्याच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करून त्याचा खून केला. पतीची हत्या केल्यानंतर ती रात्रभर तिथेच त्याच्या मृतदेहाजवळ बसून राहिली. युवकाचे आजोबा दुसऱ्या दिवशी घरी पोहोचले, तेव्हा ही घटना उघड झाली. मात्र, त्यावेळी आरोपी पत्नी आत्मसमर्पण करण्यासाठी पोलीस स्टेशनला गेली होती.

मोबाईलमध्ये दुसऱ्या महिलेचा फोटो

छत्तीसगडच्या कोरिया जिल्ह्यातील सारा पहाड पारा येथील रहिवासी भूपेंद्र राजवाडे याचा विवाह दोन वर्षांपूर्वी मांजापारा येथील रहिवासी अनुराधा हिच्याशी झाला होता. त्यांना एक वर्षाची मुलगी देखील आहे. भूपेंद्र रविवारी संध्याकाळी उशिरा बाजारातून परतला. त्यानंतर तो जेवण करुन झोपायला गेला. यावेळी अनुराधा त्याचा मोबाईल बघत होती. मोबाईलमध्ये दुसऱ्या महिलेचा फोटो पाहून तिला राग आला. रागाच्या भरातच तिने अंगणात खाटेवर झोपलेल्या भूपेंद्रची कुऱ्हाडीने वार करुन निर्घृण हत्या केली.

हत्येनंतर रक्ताचे डाग पुसले, मृतदेहाचे कपडे बदलले

दुसऱ्या दिवशी जेव्हा भूपेंद्रचे आजोबा घरी पोहोचले, तेव्हा त्यांनी भूपेंद्रचा मृतदेह पाहिला. मात्र पत्नी अनुराधा बेपत्ता होती. गावकऱ्यांकडे चौकशी केली असता, त्यांनी अनुराधाला सकाळी गावाबाहेर जाताना पाहिल्याचे सांगितले. हत्येनंतर अनुराधाने घरात सांडलेले रक्त पुसून स्वच्छ केले होते. भूपेंद्रच्या मृतदेहावरून कपडेही बदलण्यात आले होते. ती रात्रभर खोलीत होती आणि सकाळी लवकर गावाबाहेर गेली. पोलिसांनी घरातून रक्ताने माखलेले कपडे, कुऱ्हाड आणि इतर पुरावे गोळा केले.

15-20 दिवस घरी नसल्याने वाद

पोलिसांनी सांगितले की, भूपेंद्र सोलर फिटिंगचे काम करत असे. काही महिने तो छत्तीसगड जिल्ह्यातील बिहारपूर येथे राहून आपले काम करत होता. दरम्यानच्या काळात तो 15-20 दिवस घरी गेला नव्हता. यावरुन पती -पत्नीमध्ये वारंवार वाद होत होते. घटनेच्या रात्री मोबाईलवर महिलेचा फोटो पाहिल्यानंतर ती भडकली. यानंतर अनुराधाने झोपलेल्या भूपेंद्रची हत्या केली. आधी तिने हा प्रकार लपवण्याचा प्रयत्न केला, पण नंतर आत्मसमर्पण केले.

प्रोफेसर पत्नीकडून डॉक्टर पतीची हत्या

दुसरीकडे, 63 वर्षीय डॉक्टर पतीची हत्या केल्या प्रकरणी 61 वर्षीय प्रोफेसर पत्नीला अटक करण्यात आल्याची घटना काही महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशात उघडकीस आली होती. पतीसोबत दीर्घ काळापासून सुरु असलेल्या वादातून पत्नीने हे धक्कादायक पाऊल उचलल्याचा आरोप झाला. पत्नीने जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळून आधी पतीला बेशुद्ध केलं, त्यानंतर त्याला विजेचा झटका देऊन ठार मारलं.

संबंधित बातम्या :

पाच मुलांच्या आईचा तरुणावर जडला जीव, प्रियकराच्या साथीने पतीची हत्या

दिरासोबत राहण्यासाठी आधी पतीची हत्या, आता वहिनीने त्याच दिराचाही जीव घेतला

प्रियकराच्या साथीने पतीची हत्या, मुलीने पोलिसांना सांगितलं बाबांना किचनमध्ये पुरलंय!

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI