मनसे आमदार राजू पाटलांची सुपारी, दोघांकडून रवी पुजारीला तब्बल 15 लाख, जाणून घ्या पूर्ण प्रकरण

अमजद खान

| Edited By: |

Updated on: Jul 07, 2021 | 3:48 PM

मनसे आमदार राजू पाटील यांनी आज (7 जुलै) मुंबईतील ईडी कार्यालयाला भेट दिली. त्यांच्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे (MNS MLA Raju Patil visit ED office in Mumbai on Ravi Pujari case). 

मनसे आमदार राजू पाटलांची सुपारी, दोघांकडून रवी पुजारीला तब्बल 15 लाख, जाणून घ्या पूर्ण प्रकरण
मनसे आमदाराची महापालिकेवर जोरदार टीका

कल्याण : मनसे आमदार राजू पाटील यांनी आज (7 जुलै) मुंबईतील ईडी कार्यालयाला भेट दिली. त्यांच्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. राज्यातील सध्या अनेक दिग्गज नेत्यांमागे ईडीच्या चौकशीचा ससेमीरा लागलेला दिसतोय. त्यामुळे राजू पाटील यांनाही अशाच संबंधित कारणासाठी ईडी कार्यालयात जावं लागलं असेल का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली. पण ईडी कार्यालयातून बाहेर आल्यानंतर राजू पाटील यांनी योग्य कारण सांगत संपूर्ण प्रकरणाचा उलगडा केला. त्यांनी सांगितलेली माहिती तर धक्कादायक आहेच. याशिवाय आपल्या लोकप्रतिनिधींना सुरक्षेची किती आवश्यकता आहे, हे यातून अधोरेखित होते (MNS MLA Raju Patil visit ED office in Mumbai on Ravi Pujari case).

नेमकं प्रकरण काय?

मुंबई क्राईम ब्रांचने 2015 साली दयानंद जाटान आणि विपीन पाटील या दोघांना अटक केली होती. डोंबिवलीत राहणारा विपीन पाटील हा मोठा दारु विक्रेता आहे. दयानंद जाटान आणि विपीन पाटील या दोघांवर गंभीर आरोप आहेत. दयानंद आणि विपीन हे ठाणे जिल्ह्यातील कोणत्या व्यक्तीकडे जास्त पैसे आहेत, कोणत्या बिल्डरचे काम सुरु आहे, कोणत्या नेत्याला धमकी दिल्याने फायदा होईल, अशाबाबतची सर्व माहिती परदेशात बसलेल्या कुख्यात डॉन रवी पूजारीला द्यायचे. ठाणे जिल्ह्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीचे कोणते गुन्हेगार आपल्यासाठी कामाला येऊ शकतात, अशी देखील माहिती ते रवी पुजारीला पुरवायचे.

राजू पाटील आता साक्षीदार

दयानंद जाटान आणि विपीन पाटील यांनी रवी पुजारीला मनसे आमदार राजू पाटील यांची सुपारी दिली होती. यासाठी त्यांनी 15 लाख रुपये रवी पुजारीला पाठवले होते. आता रवी पुजारीला अटक करुन भारतात आणलं गेलं आहे. रवी पूजारीशी संबंधित सगळ्या गुन्ह्यांचा तपास सुरु आहे. विपीन याने राजू पाटील यांची सुपारी दिल्याने आमदार या प्रकरणी साक्षीदार म्हणून आहेत.

राजू पाटील यांना ईडीचे समन्स

ईडीने आमदार राजू पाटलांना त्यांच्या जबाब नोंदविण्यासाठी 23 जून रोजी समन्स बजावला होता. ते जबाब देऊन आले आहेत. ते आज मुंबईत कामानिमित्त गेले असता आता या प्रकरणी त्यांची काही गरज आहे का? हे विचारण्यासाठी ईडीच्या कार्यालयात गेल्याची माहिती राजू पाटील यांनी दिली. पण ईडीच्या कार्यालयातील राजू पाटील यांच्या जाण्याने राजकारणात चर्चेला उधाण आलं आहे (MNS MLA Raju Patil visit ED office in Mumbai on Ravi Pujari case).

हेही वाचा :

गर्लफ्रेंडच्या नादात मुलगा बिघडला, जेव्हा पोटचाच गोळा बापाची हत्या करतो, अस्वस्थ करणारी घटना

एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरींचा ईडी कोठडीत मुक्काम वाढला

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI