शेअर बाजारात पैसे बुडाले, कर्जातून सावरण्यासाठी कर्मचाऱ्याने ‘असा’ रचला कट

कर्जाचा भार कसा कमी करायचा या विवंचनेत असलेल्या सुमितने स्वतःच्याच कंपनीचे पैसे लुटण्याचा कट रचला. यासाठी त्याने आपला मित्र चेतन विलास धाबे याला कटात सामील करुन घेतले.

शेअर बाजारात पैसे बुडाले, कर्जातून सावरण्यासाठी कर्मचाऱ्याने 'असा' रचला कट
टिटवाळ्यात महिलेला मारहाणImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Sep 07, 2022 | 2:33 AM

मुंबई : शेअर बाजारात गुंतवलेले पैसे बुडाल्याने कर्जबाजारी (Debt) झालेल्या तरुणाने स्वतःच्या कंपनीचे पैसे लुटण्याचा कट रचला. हा कट प्रत्यक्षात अंमलातही आणला. मात्र पोलिसांच्या तीक्ष्ण नजरेने अखेर आरोपीला घेरलेच. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी तरुणाची कसून चौकशी (Inquiry) केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. मुलुंड पोलिसांनी आरोपी तरुणासह त्याला मदत करणाऱ्या त्याच्या मित्राला अटक (Arrest) केली आहे.

डोंबिवली येथील रहिवासी असलेला सुमित दयाराम वाडेकर हा तरुण मुलुंड येथील सिद्धार्थ अँड असोसिएट्स या कंपनीत कामाला होता. सुमितने शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले होते. मात्र त्याचे पैसे बुडाले. यामुळे तो कर्जबाजारी झाला होता.

कर्जाचा भार कसा कमी करायचा या विवंचनेत असलेल्या सुमितने स्वतःच्याच कंपनीचे पैसे लुटण्याचा कट रचला. यासाठी त्याने आपला मित्र चेतन विलास धाबे याला कटात सामील करुन घेतले.

हे सुद्धा वाचा

कंपनीची रिकव्हरी केलेली रक्कम लुटण्याचा कट

सुमितने विविध भागातून रिकव्हरी केलेली कंपनीची 13 लाख 75 हजाराची रक्कम लुटण्याचे ठरवले. प्लानप्रमाणे सुमित रोकड घेऊन ऑफिसमध्ये शिरत असतानाच त्याचा मित्र चेतनने त्याच्या नाकावर क्लोरोफार्म लावलेला रुमाल लावला. यामुळे सुमित बेशुद्ध झाला. त्यानंतर चेतनने त्याच्याकडील रक्कम घेऊन पोबारा केला.

आपल्या नाकावर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने क्लोरोफॉर्मसारखे काही लावून बेशुद्ध केले आणि पैसे लुटून नेल्याचा बनाव सुमितने रचला. या लुटीच्या प्रकाराबाबत मुलुंड पोलिसांना माहिती देण्यात आली. मुलुंड पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत कंपनीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले.

सीसीटीव्ही फुटेज पाहून पोलिसांना संशय आला

सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांना सुमितच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. डॉक्टरांचा रिपोर्ट आणि तांत्रिक तपासाच्या मदतीने पोलिसांनी सुमितची कसून चौकशी केली. अखेर त्यानेच हा बनाव केल्याचे मान्य केले. त्याच्याकडून माहिती मिळताच पोलिसांनी त्याचा मित्र चेतनला रोख रकमेसह 12 तासांच्या आत अटक केली. (Mulund police arrested two youths who stole money from the company to pay off the loan)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.