BMC च्या नर्सचा धावत्या ट्रेनमध्ये विनयभंग, 22 वर्षीय तरुणाला पालघरमध्ये अटक

वाणगाव स्थानकाजवळ आरोपी महिला डब्यात शिरला. त्याने नर्सच्या हातातील मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याने आपला विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही तरुणीने केला आहे.

BMC च्या नर्सचा धावत्या ट्रेनमध्ये विनयभंग, 22 वर्षीय तरुणाला पालघरमध्ये अटक
नर्सच्या विनयभंग प्रकरणी तरुणाला अटक

मोहम्मद हुसेन खान, टीव्ही 9 मराठी, पालघर : मुंबई महापालिकेत काम करणाऱ्या नर्सचा धावत्या ट्रेनमध्ये विनयभंग झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ड्युटीनंतर रविवारी रात्री शेवटच्या मेमूने घरी परतणाऱ्या तरुणीचा वाणगाव स्टेशनजवळ विनयभंग करण्यात आला. 22 वर्षीय तरुणाने नर्सचा मोबाईलही चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. (Mumbai BMC Nurse Molestation in Running Train at Palghar)

मोबाईल चोरण्याचा प्रयत्न

तक्रारदार नर्स रविवारी रात्री आपले काम संपवून डहाणू येथील आपल्या घरी निघाली होती. विरारहून तिने रात्री 10 वाजून 50 मिनिटांनी सुटणारी शेवटची मेमू (ट्रेन) पकडली. वाणगाव स्थानकाजवळ आरोपी महिला डब्यात शिरला. त्याने नर्सच्या हातातील मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला.

डहाणू स्टेशन येताच नर्सचा आरडाओरडा

नर्सने बहादुरी दाखवत त्याचा प्रतिकार केला आणि आपला मोबाईल परत मिळवला. मात्र त्यावेळी त्याने तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. डहाणू स्टेशन येताच नर्सने आरडाओरडा केला. मात्र तिने सांगितलेल्या वर्णनावरुन रेल्वे पोलिसांनी सतर्कता दाखवली आणि पळून जात असलेल्या आरोपीला पकडले.

तरुणावर पालघर रेल्वे पोलीस ठाण्यात चोरी आणि विनयभांगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली असल्याचे पोलीस निरीक्षक योगेश देवरे यांनी टीव्ही9 मराठीला सांगितले.

मोबाईल चोराशी झटापटीत विवाहितेचा मृत्यू

दुसरीकडे, मध्य रेल्वेवरील कळवा आणि मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान मोबाईल चोरासोबत झालेल्या झटापटीत लोकलखाली येऊन काही दिवसांपूर्वीच 35 वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाला होता. डोंबिवली येथे राहणाऱ्या विद्या पाटील या अंधेरीमध्ये एका खासगी कंपनीत नोकरी करत होत्या. त्यांनी कुर्ला रेल्वे स्थानकातून डोंबिवलीला जाण्यासाठी लोकल पकडली. त्यावेळी त्यांच्या महिला डब्यामध्ये केवळ पाच ते सहा महिला प्रवासी होत्या.

नेमकं काय घडलं

लोकल कळवा रेल्वे स्थानकात आली असता, एक चोरटा डब्यात शिरला. चोराने विद्या यांच्या हातात असलेला मोबाईल खेचला. विद्या यांनी त्याला प्रतिकारही केला. या झटापटीमध्ये चोरट्याने त्यांना हिसका दिला. त्यामुळे त्या धावत्या रेल्वेगाडीखाली फेकल्या गेल्या. यात त्यांचा मृत्यू झाला.

संबंधित बातम्या :

पाण्यावरुन किरकोळ वाद, 33 वर्षीय प्रवाशाचा ट्रेनबाहेर फेकल्याने मृत्यू, पुण्यातील प्रकार

मोबाईल चोरासोबत झटापट, लोकलखाली येऊन ठाण्यात विवाहितेचा मृत्यू, आरोपीला अखेर अटक

(Mumbai BMC Nurse Molestation in Running Train at Palghar)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI