AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मटका क्वीन जयाच्या अडचणीत वाढ, मुंबई गुन्हे शाखेने केली ‘ही’ कारवाई

फसवणूक आणि महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत जयावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मटका क्वीन जयाच्या अडचणीत वाढ, मुंबई गुन्हे शाखेने केली 'ही' कारवाई
मटका क्वीन जयाच्या अडचणीत वाढImage Credit source: TV9
| Updated on: Sep 26, 2022 | 8:25 PM
Share

मुंबई : शहरात जुगार अड्डे सक्रिय केल्याप्रकरणी मटका क्वीन जया छेडा (Matka Queen Jaya Chheda) विरोधात मुंबई गुन्हे शाखेने 13 नवे गुन्हे नोंदवले आहेत. फसवणूक (Cheating) आणि महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत जयावर आरोप (Allegation) ठेवण्यात आले आहेत. जयाला तिचा पती आणि मटका क्वीन सुरेश भगत याच्या हत्येप्रकरणी 2013 मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. सुरेश भगतच्या हत्येप्रकरणी जयासह इतर पाच जणांना दोषी ठरवले होते. 2008 मध्ये सुरेश भगतची हत्या झाली होती.

मुंबई उच्च न्यायालयाने आजारपणामुळे जयाला 2018 मध्ये जामीन मंजूर केला होता. फसवणूक आणि महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत जयावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कल्याण मटका चालवण्यात सहभाग असल्याचा संशय

बेकायदेशीर असलेल्या राज्यातील सर्वात प्रसिद्ध लॉटरी प्रणालींपैकी एक असलेल्या कल्याण मटका चालवण्यात तिचा सहभाग असल्याचा अधिकार्‍यांना संशय आहे. मुंबईत कल्याण भगत व्यतिरिक्त रतन खत्री हा एकमेव व्यक्ती होता, ज्याला मटका किंग म्हटले जात होते.

खोट्या आरोप गोवले जात असल्याचा दावा

आपल्याविरोधात दाखल केलेले सर्व गुन्हे खोटे आहे. आपल्याला खोट्या आरोपात गोवण्यात आल्याचा दावा जयाने केला आहे. तसेच जयाने अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. याच आठवड्यात जयाच्या याचिकांवर कोर्ट सुनावणी घेण्याची शक्यता आहे.

अटकपूर्व जामीन अर्जावर अंतिम सुनावणी होईपर्यंत जयावर कोणतीही कारवाई करणार नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

मटका क्वीन जयाच्या काही अटकपूर्व जामीन याचिका 2022 मध्ये दाखल केलेल्या खटल्यांप्रकरणी आहेत. तर एक याचिका ती तुरुंगात असताना 2014 च्या खटल्याशी संबंधित आहे.

2014 च्या प्रकरणातील खटल्याचा तपास पूर्ण झाला आहे; त्यामुळे जयाला कोठडीची गरज नाही, असा युक्तीवाद जयाच्या वकिलांनी केला होता. न्यायालयानेही या युक्तिवादाशी सहमती दर्शवली आणि गेल्या महिन्यातच 2014 च्या खटल्यात जयाची याचिका मान्य केली होती.

कल्याणजी भगतने मुंबईत सर्वप्रथन सुरु केला ‘मटका’

मुंबईत सर्वप्रथम कल्याणजी भगत याने मटका सुरू केल्याचे मानले जाते. जयाचा माजी पती सुरेश भगत यालाही वडिलांप्रमाणे मटका किंग म्हटले जात होते. मात्र, 2008 मध्ये भगत याचा अपघाती मृत्यू झाला.

मात्र सुरेश याचा अपघाती मृत्यू नसून हत्या असल्याचा आरोप झाला होता. मटका व्यवसायावर ताबा मिळवण्यासाठी जयानेच सुरेशची हत्या घडवून आणल्याचा आरोप होता. पोलीस तपासात हे आरोप सिद्ध झाले आणि जयासह पाच जणांना शिक्षा झाली.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.