Mumbai Crime : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह पोस्ट करणे भोवले, दादरमधून तरुणाला अटक

हल्ली सोशल मीडियाचा गैरवापर करत चुकीचे कृत्य करण्याचे प्रमाण तरुणांमध्ये वाढले आहे. राजकीय मंडळींविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करण्याचं प्रमाण अधिक आहे.

Mumbai Crime : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह पोस्ट करणे भोवले, दादरमधून तरुणाला अटक
Follow us
| Updated on: Aug 24, 2023 | 11:07 AM

मुंबई / 24 ऑगस्ट 2023 : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. सदर तरुणाला दादर येथून अटक केली आहे. कैलास कापडी असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. आरोपी कैलास हा सार्थक कपाडी नावाच्या ट्विटवर हॅन्डलवरून भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांना ट्रॉल करत होता. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने कापडीला अटक केली आहे. तरुणाने हे कृत्य का केले याबाबत अद्याप कळू शकले नाही. पोलीस आरोपीची चौकशी करत आहेत.

ट्विटर हँडलवरुन नेत्यांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट

दादरमधील वाडिया रोडवर कैलास कापडी हा तरुण राहतो. सार्थक कापडी नावाच्या ट्विटर हँडलवरुन त्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली होती. शिंदे गटातल्या अनेक नेत्यांवर तसेच महिलांवर तरुणाने आक्षेपार्ह पोस्ट केल्याचं समोर आलं आहे. यानंतर मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने कारवाई करत त्याला अटक केली आहे.

आयपी अॅड्रेसवरुन तरुणाला केलं ट्रेस

आक्षेपार्ह पोस्टनंतर आरोपी कापडीवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्याच्या आयपी अॅड्रेसवरुन त्याचं लोकेशन तपासलं. त्यानुसार त्याला ट्रेस करुन शोध घेतला आणि अटक केली आहे. हल्ली सोशल मीडियाचा गैरवापर करत नेते मंडळी, सेसिब्रेटी यांच्यावर आक्षेपार्ह पोस्टक करण्याच्या घटना वाढल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या सभांचा धडका?
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या सभांचा धडका?.
अमरावती मतदारसंघात नवनीत राणांसह 'या' दोन उमेदवारांना आयोगाकडून नोटीस
अमरावती मतदारसंघात नवनीत राणांसह 'या' दोन उमेदवारांना आयोगाकडून नोटीस.
शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान पहिल्यांदा बदललं, बारामतीत काय घडलं?
शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान पहिल्यांदा बदललं, बारामतीत काय घडलं?.
नाऱ्या आडवा ये... ठाकरेंची टीका, राणेंनी प्रत्युत्तर देत काढली औकात
नाऱ्या आडवा ये... ठाकरेंची टीका, राणेंनी प्रत्युत्तर देत काढली औकात.