Mumabi Crime : मुंबईत शिक्षिका पेशाला काळिमा फासणारी घटना, शिक्षकाकडून चार विद्यार्थिनीवर अत्याचार

आता शाळेतही मुली सुरक्षित नसल्याच्या घटना समोर येत आहेत. अशीच घटना सध्या मुंबईत उघडकीस आली आहे. या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली आहे.

Mumabi Crime : मुंबईत शिक्षिका पेशाला काळिमा फासणारी घटना, शिक्षकाकडून चार विद्यार्थिनीवर अत्याचार
मुंबईत शाळकरी मुलींवर शिक्षकांकडून अत्याचारImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 22, 2023 | 6:45 PM

मुंबई / 22 ऑगस्ट 2023 : मुंबईतील विक्रोळी परिसरात शिक्षकी पेशालाच काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका पालिकेच्या शाळेत चार मुलींवर पीटी शिक्षकानेच लैंगिक अत्याचार केल्याने खळबळ उडाली आहे. शिक्षा देण्याच्या नावाखाली हा शिक्षक मुलींचा लैंगिक छळ करीत असल्याची माहिती काही विद्यार्थिनींनी त्यांच्या पालकांना दिली होती. त्यांनतर आज या पालकांनी या शिक्षकाला चोप देत पोलिसांच्या हवाली केले आहे. विक्रोळी पोलीस ठाण्यात शिक्षकावर गुन्हा दाखल करून त्याला आता अटक केलेली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. ही घटना उघड होताच नागरिक आणि पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे.

वंचित बहुजन आघाडी आणि शिंदे गट आमने-सामने

विक्रोळी पूर्वेतील एका मनपा शाळेतील 4 विद्यार्थिनींवर पीटी शिक्षकाने लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी पोलिसांनी पीटी शिक्षकाला अटक केली असून, या घटनेमुळे विक्रोळी पोलीस स्टेशनसमोर सर्वच राजकीय पक्षांनी धाव घेतली. या घटनेचा जाहीर निषेध करत शिक्षकावर कडक कारवाईची मागणी देखील करण्यात आली. शिंदे गटाचे पदाधिकारी हे या घटने संदर्भात विक्रोळी पोलीस स्टेशनमध्ये आले होते. याच दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष चेतन अहिरे यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिंदे सरकारचा जाहीर निषेध करण्यास सुरुवात केली. यामुळे विक्रोळी पोलिस स्टेशनसमोर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.