AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अरेच्चा ! हे तर खोटे डॉक्टर, मुंबईतील धक्कादायक प्रकार उघड

आपल्याला जीवनदान देणारी डॉक्टरं देखील खोटं असू शकतात, अशी माहिती आता समोर आली आहे. मुंबईत तर असे अनेक डॉक्टर वेगवेगळ्या ठिकाणी दवाखाने खोलून नागरिकांना लुबाडत असल्याची माहिती समोर आली आहे.

अरेच्चा ! हे तर खोटे डॉक्टर, मुंबईतील धक्कादायक प्रकार उघड
ना शिक्षण, ना पदवी, तरीही दवाखाने खोलून बसले, मुंबई पोलिसांनी पाच बनावट डॉक्टरांच्या मुसक्या आवळल्या
| Edited By: | Updated on: Aug 19, 2021 | 3:01 PM
Share

मुंबई : आयुष्यात एक चांगली व्यक्ती, चांगलं मार्गदर्शक मिळणं आयुष्यात खूप गरजेचं असतं. पण बऱ्याचदा चांगलं माणूस असल्याचा आव आणणारी खोटी माणसंच आपल्याला भेटतात. आपण बराचवेळ त्यांच्या सानिध्यात राहतो. अखेर त्यांच्या चांगल्यापणाचा बुरखा फाटतो आणि त्यांचा खरा अवतार समोर येतो. आजच्या काळात तर आपल्या ओळखीत असणारी चांगली माणसं हे अगदी हाताच्या बोटावर मोजावे इतक्याच असतात. कारण लोकं आता सर्रासपणे खोटं वागतात. त्यांचं ते वागणं खोटं आणि नाटकी असतंच, पण ती माणसंही खोटी असतात. विशेष म्हणजे आपल्याला जीवनदान देणारी डॉक्टरं देखील खोटं असू शकतात, अशी माहिती आता समोर आली आहे. मुंबईत तर असे अनेक डॉक्टर वेगवेगळ्या ठिकाणी दवाखाने खोलून नागरिकांना लुबाडत असल्याची माहिती समोर आली आहे.

नेमकं प्रकरण काय?

वैद्यकीय क्षेत्राची कोणतीही पार्श्वभूमी किंवा शिक्षण नसताना मुंबईतील झोपडपट्टीच्या गजबजलेल्या परिसरात दवाखाने खोलून फी म्हणून चिक्कार पैसे लुबाडणाऱ्या बोगस डॉक्टरांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे. मुंबईच्या गुन्हे शाखा 6 ने ही कारवाई केली आहे.

पोलिसांनी नेमकी कारवाई कशी केली?

गुन्हे शाखा 6 चे पोलीस निरीक्षक हनमंतराव ननावरे आणि त्यांचे सहकारी नितीन सावंत यांना विश्वसनीय सूत्रांकडून शिवाजीनगर, गोवंडी परिसरात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट असल्याची माहिती मिळाली होती. हे बोगस डॉक्टर झोपडपट्टी परिसरात नागरिकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन जास्तीचे पैसे घेऊन सर्वसामान्यांना लुबाडत होते. संबंधित माहितीची खात्री केल्यानंतर मुंबई महापालिका आणि पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने कारवाई करण्यात आली. मुंबई महापालिकेच्या एम-वाड पूर्व येथील सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिया कोळी यांच्या नेतृत्वाखाली पाच वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकून कारवाई करण्यात आली.

पोलीस आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले

पोलीस आणि वैद्यकीय अधिकारी यांनी एकत्रितपणे टाकलेल्या छाप्यात पाच वेगवेगळ्या ठिकाणी बोगस डॉक्टर रुग्णांची तपासणी करुन त्यांना औषधोपचार करताना रंगेहात पकडले गेले. या बोगस डॉक्टरांकडे कोणताही वैद्यकीय परवाना नव्हता. तसेच महाराष्ट्र मेडिकल कॉन्सिलमध्ये नोंदणी नसताना डॉक्टर असल्याचे भासवून बेकायदेशिररित्या विविध आजारावरील रुग्णांना औषधे इंजेक्शन देवून औषोधोपचार करताना दिसून आले.

बोगस डॉक्टरांकडून वैद्यकीय साहित्य जप्त

या बोगस डॉक्टरांच्या ताब्यातून स्टेथस्कोप, वेगवेगळ्या प्रकारचे इंजेक्शन बॉटल्स, अॅन्टीबायोटिक टॅबलेट्स, सर्जिकल ट्रे, पॅरासिटॉमॉल डेक्झा टॅबलेट्स, टोरमॉक्झिान 500 एम.जी, सिरिन्स सलायन बॉटल्स, अॅन्टॉसिड्स टॅबलेट, बायेमेडिकल वेस्ट मटेरियल, रॅन्टीडाईन हायड्रोक्लोराईड इंजेक्शन असे वेगवेगळ्या प्राकरचे औषधे आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. क्षमा क्लिनिक, आलिशा क्लिनिक, आसिफा क्लिनिक, रेहमत क्लिनिक, मिश्रा क्लिनीक असे या दवाखान्यांची नावे आहेत.

हेही वाचा :

ब्लॅक फंगसच्या भीतीने दाम्पत्याची आत्महत्या, मात्र शवविच्छेदन अहवालात धक्कादायक माहिती समोर

पुण्यात निवृत्त एअरफोर्स अधिकारी ‘हॅनी ट्रॅप’च्या जाळ्यात, 50 लाखांची खंडणी मागितली, पोलिसांकडून रॅकेट उद्ध्वस्त

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.