VIDEO | लॉक तोडून महागड्या स्पोर्ट्स सायकलची चोरी, मुंबईत एकाला अटक, दोघे पसार

ब्रिजभान जैस्वार

| Edited By: |

Updated on: Jun 30, 2021 | 11:02 AM

मुंबईतील माहीम, दादर, शिवाजी पार्क आणि वरळी परिसरातून महागड्या स्पोर्ट्स सायकल चोरीला जात असल्याचे प्रकार वाढले होते. स्थानिकांच्या तक्रारीनंतर सायकल चोरणाऱ्या टोळीतील एका आरोपीला माहीम पोलिसांनी सापळा रचून अटक केली

VIDEO | लॉक तोडून महागड्या स्पोर्ट्स सायकलची चोरी, मुंबईत एकाला अटक, दोघे पसार
मुंबईत महागड्या सायकलची चोरी

Follow us on

मुंबई : मुंबईतून महागड्या स्पोर्ट्स सायकल चोरणाऱ्या टोळीला पोलिसांनी सापळा रचून अटक केली. माहिम पोलिसांनी तब्बल 24 स्पोर्ट्स सायकल जप्त केल्या आहेत. चोरीच्या सायकल अन्यत्र विकल्या जात असत. एका आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या असून त्याच्या दोघा साथीदारांचा शोध सुरु आहे. (Mumbai Sports Cycle Theft Gang burst one arrested)

कशी झाली अटक?

मुंबईतील माहीम, दादर, शिवाजी पार्क आणि वरळी परिसरातून महागड्या स्पोर्ट्स सायकल चोरीला जात असल्याचे प्रकार वाढले होते. स्थानिकांच्या तक्रारीनंतर सायकल चोरणाऱ्या टोळीतील एका आरोपीला माहीम पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. अटक केलेला आरोपीकडून माहीम पोलिसांनी तब्बल 24 स्पोर्ट्स सायकल जप्त केल्या आहेत. या आरोपीच्या आणखी दोन साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत.

काय होती मोडस ऑपरेंडी?

आरोपी महागड्या स्पोर्ट्स सायकल चोरी करत होता. त्यांनी चोरी केलेल्या सर्व 24 स्पोर्ट्स सायकल जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपी माहीम, दादर, शिवाजी पार्क आणि वरळी भागातून महागड्या स्पोर्ट्स सायकलचे कुलूप तोडून त्या चोरी करत होते. नंतर त्या अन्यत्र विकून टाकत असत. अटक आरोपीला कोर्टात हजर केले असता त्याला 2 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत पाठवण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु असून पसार आरोपींचा शोध सुरु आहे.

पाहा व्हिडीओ

संबंधित बातम्या :

चोराच्या उलट्या बोंबा, मध्यरात्री चोरटा सोसायटीत घुसला, चोरी करताना रंगेहाथ पकडलं, पण…

दोन जण ग्राहक बनून दुकानात आले, दुकानदाराला बोलण्यात गुंतवलं, नंतर चाकू हल्ला, कपड्याच्या दुकानात थरार

(Mumbai Sports Cycle Theft Gang burst one arrested)

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI