Andheri Murder : ज्या चाकूने भाजी कापत होता, त्याच चाकूनं वेटरचा कूकनं खून केला! अंधेरीतील फाईव्ह स्टार हॉटेलात हत्याकांड

Mumbai Murder : मूळचा हिमाचलचा असणारा जगदीश वेटरचा काम करत होता. तर बिहारमधील रहिवाशी असणारा माधव गेल्या एक वर्षापासून हॉटेलात कूक म्हणून कामाला लागला होता.

Andheri Murder : ज्या चाकूने भाजी कापत होता, त्याच चाकूनं वेटरचा कूकनं खून केला! अंधेरीतील फाईव्ह स्टार हॉटेलात हत्याकांड
खळबळजनक हत्याकांड...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 23, 2022 | 9:31 AM

मुंबई : मुंबईच्या अंधेरीत (Mumbai Andheri News) हत्येच्या घटनेनं खळबळ माजली आहे. धक्कादायक बाब म्हणजे एका प्रतिष्ठीत हॉटेलात काम करणाऱ्या कूकने वेटरचा जीव घेतलाय. ऑर्डरच्या वादातून कूक आणि वेटरमध्ये वाद झाला. यावेळी कूक ज्या चाकूने भाजी कापत होता, त्याच चाकूने त्याने वेटरवर सपासप वार केले. छाती आणि पोटावर वार करत कूकने वेटरचा जीव (Andheri Murder Case) घेतला. या घटनेनं हॉटेलातील संपूर्ण स्टाफही बिथरला. ही धक्कादायक घटना अंधेरीच्या एमआयडीसी (Andheri MIDC Police) परिसरातील एका पंचतारांकीत हॉटेलात घडली. शुक्रवारी सकाळी हत्येचा हा प्रकार उघडकीस आला. या हत्याकांडप्रकरणी आरोपी कूकला अंधेरीच्या एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. तर पुढील तपास केला जातो आहे. रागाच्या भरात हॉटेलच्या कूकने हे कृत्य केलं असल्याचं समोर आलं आलंय. आरोपी कूकला आता न्यायालयात हजर केलं जाणार असून एमआयडीसी पोलीस मारेकरी कूकची कसून चौकशीही करत आहेत. नेमकी घटना काय घडली होती? वेटरने कूकचा जीव घेण्याइतका नेमका वाद काय झाला होता? याचा उलगडा करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय.

हिमाचलला वेटर, बिहारी कूक..

अंधेरी एमआयडीसी परिसरात असणाऱ्या एका पंचतारांकीत हॉटेलात मूळचा हिमाचलचा असणारा जगदीश वेटरचा काम करत होता. तर बिहारमधील रहिवाशी असणारा माधव गेल्या एक वर्षापासून हॉटेलात कूक म्हणून कामाला लागला होता.

गुरुवारी रात्रीच्या सुमारास जगदीश आणि माधव यांच्या जेवणाच्या ऑर्डरवर काहीतरी वाद झाला. हा वाद प्रचंड पेटला होता. पण हॉटेलच्या मॅनेजरने दोघांचीही समजून काढून कसाबसा वाद मिटवला होता. त्यानंतर शुक्रवारी सकाळी माधव आणि जगदीश नेहमीप्रमाणे कामावर हजर झाले. यावेळी जगदीश किचनमध्ये गेला. तेव्हा माधव भाजी कापत होता. यावेळी दोघांमध्ये पुन्हा वाद पेटला. दरम्यान, माधवला राग अनावर झाला आणि ज्या चाकूने तो भाजी कापत होता, त्यानेच जगदीशवर वार करण्यात आले होते.

हे सुद्धा वाचा

खळबळ

पाठीत आणि छातीवर वार झाल्याने जगदीशला मोठा मार लागला. प्रचंड रक्तस्त्रावही झाला. किचनमध्ये कूकने जगदीशची हत्या केल्यानं हॉटेलात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, या घटनेची हमाति मिळताच, हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी जगदीशला रुग्णलयात नेलं. पण तिथं डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. अखेर एमआयडीसी पोलिसांनी हत्येप्रकरणी कूक माधव मंडल याला अटक केली असून पुढील तपास केला जातोय.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.