AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकलमध्ये महिला प्रवाशांचे मोबाईल चोरणारी सराईत महिला चोर जेरबंद

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी धावणाऱ्या लोकलमधील महिला प्रवाशांच्या सॅकबॅगमधील मोबाईल फोन चोरणाऱ्या एका सराईत मोबाईल चोर महिलेला वाशी रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. मोबाईल चोरीत हातखंडा असलेल्या सराईत गुन्हेगार 29 वर्षीय राजश्री शिंदे असे या महिलेचे नाव असून तिच्यावर कुर्ला, बांद्रा, बोरीवली आणि वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

लोकलमध्ये महिला प्रवाशांचे मोबाईल चोरणारी सराईत महिला चोर जेरबंद
Navi Mumbai female thief arrest
| Edited By: | Updated on: Jul 17, 2021 | 12:40 PM
Share

नवी मुंबई : अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी धावणाऱ्या लोकलमधील महिला प्रवाशांच्या सॅकबॅगमधील मोबाईल फोन चोरणाऱ्या एका सराईत मोबाईल चोर महिलेला वाशी रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. मोबाईल चोरीत हातखंडा असलेल्या सराईत गुन्हेगार 29 वर्षीय राजश्री शिंदे असे या महिलेचे नाव असून तिच्यावर कुर्ला, बांद्रा, बोरीवली आणि वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. सीसीटीव्हीमध्ये लहान मुलीसोबत फिरणाऱ्या या महिलेने महिला प्रवाशांच्या मागे जाऊन त्यांच्या सॅकबॅगमधून मोबाईल फोन चोरुन पळून जायचं असे या महिला चोरट्यांची कार्यपद्धती होती (Navi Mumbai Crime Female thief arrested for stealing mobile phones of female passengers in local).

वाशी रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिला प्रवाशांच्या सॅकबॅगमधील मोबाईल फोन चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होऊ लागल्याने अशा चोरी करणाऱ्या चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या होत्या. त्यानुसार, वाशी रेल्वे पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांच्याकडून हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर गस्त घालण्यात येत होती.
यादरम्यान वाशी रेल्वे स्थानक परिसरामध्ये एक महिला लहान मुलीसह संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती वाशी रेल्वे स्टेशन कॉम्प्लेक्सचे सुरक्षा कर्मी  यांनी दिली. त्यानुसार, पोलिसांच्या पथकाने वाशी रेल्वे स्टेशन बाहेरील आवारातून सदर महिलेला ताब्यात घेऊन तिच्याकडे चौकशी केली असता, तिचे नाव राजश्री शिंदे असून ती बांद्रा खेरवाडी येथे रहात असल्याचे तिने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तिला वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात आणून झडती घेतल्यास तिच्याजवळ दोन मोबाईल फोन आढळून आले. दरम्यान, राजश्री शिंदे हिने कोपरखैरणे रेल्वे स्थानकाच्या सबवेमध्ये ज्या महिलेचा मोबाईल फोन जबरदस्तीने लुटला होता, त्या फॅमिदा मोहम्मद हनीफ हन्नुरे त्याचवेळी वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आल्या होत्या. त्यांनी राजश्रीला ओळखून तिनेच तिच्या सॅक बॅगमधून मोबाईल फोन चोरल्याचे आणि त्यांनी तिला पकडण्याचा प्रयत्न केला असता तिने त्यांना ढकलुन पलायन केल्याचे सांगितले. यावेळी फॅमिदा यांनी राजश्रीकडे सापडलेल्या दोन मोबाईल फोनपैकी एक फोन त्यांचा असल्याचे ओळखले.
त्यानुसार वाशी रेल्वे पोलिसांनी राजश्री शिंदे हिला जबरी चोरीच्या गुन्ह्याखाली अटक केली. त्यानंतर वाशी रेल्वे पोलिसांनी केलेल्या तपासात तसेच सीसीटीव्ही फुटेजवरुन राजश्री शिंदे हिने वाशी रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीचे दोन गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे.
दरम्यान, राजश्री शिंदे सराईत मोबाईल फोन चोर असून तिच्यावर कुर्ला, बांद्रा, बोरीवली आणि वाशी रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे दाखल असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू केसरकर यांनी दिली. सदरची कारवाई महिला पोलीस निरीक्षक मोनाली घरटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक लाड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नलावडे, खोतकर, हेड कॉन्स्टेबल सतीश पवार, आदिंच्या पथकाने केली.

Navi Mumbai Crime Female thief arrested for stealing mobile phones of female passengers in local

संबंधित बातम्या :

बक्कळ पैसा कमावण्यासाठी अनोखी शक्कल, चारचाकी गाड्यांच्या सायलेन्सरची चोरी, सत्य समोर येताच पोलीसही चक्रावले

VIDEO : फुकटात फरसाण न दिल्यानं पोलीस अधिकाऱ्याकडून विक्रेत्याला मारहाणीचा आरोप, सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.