AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर उभे राहिलेले पाच प्रश्न? सत्ताधारी नेत्याच्या हत्येनंतर विरोधक सरकारवर बरसले?

ncp leader baba siddique murder: बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रातील गृह खात्याबद्दल काही प्रश्न उभे राहिले आहेत, असे ट्विट अंबादास दानवे यांनी केले आहे. स्वतःला काडतुस-काडतुस म्हणून घेणाऱ्या गृहमंत्र्यांना आता लोकही फडतूस म्हणू लागले आहेत.

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर उभे राहिलेले पाच प्रश्न? सत्ताधारी नेत्याच्या हत्येनंतर विरोधक सरकारवर बरसले?
baba siddique, devendra fadnavis
| Updated on: Oct 13, 2024 | 12:20 PM
Share

ncp leader baba siddique murder: माजी राज्यमंत्री आणि अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची शनिवारी रात्री गोळ्या घालून हत्या झाली. त्यांना वाय दर्जाची सुविधा असताना त्यांची हत्या कशी झाली? हा प्रश्न सर्वांना पडला आहे. दरम्यान या हत्या प्रकरणावरुन सत्ताधारी गटातील मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. दुसरीकडे विरोधक सरकारवर बरसले आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारला पाच प्रश्न विचारले आहे.

काय आहे दानवे यांचे प्रश्न

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रातील गृह खात्याबद्दल काही प्रश्न उभे राहिले आहेत, असे ट्विट अंबादास दानवे यांनी केले आहे. स्वतःला काडतुस-काडतुस म्हणून घेणाऱ्या गृहमंत्र्यांना आता लोकही फडतूस म्हणू लागले आहेत. महाराष्ट्रातील पक्षफोडीचे मास्टरमाईंड आणि अधूनमधून गृहमंत्री असलेल्या या माणसावर आणि त्याच्या खात्यावर सामान्य जनतेला काडीचा विश्वास उरलेला नाही, असा हल्ला दानवे यांनी केला आहे. त्यांनी पाच प्रश्न उपस्थित केले आहे.

  1. महाराष्ट्राला खरच पूर्णवेळ गृहमंत्री आहे का?
  2. आरोपी दोन महिने अगोदर मुंबईत येतात, भाड्याने राहतात याचा मागमूस पोलिसांना कसा लागत नाही?
  3. आरोपींना बंदूक दिली जाते तरीही कोणाला खबर कशी मिळत नाही?
  4. हेर खात्यावर पोलिसांनी पैसे खर्च करणे बंद केले आहे का?
  5. सुरक्षा पुरवून पोलिसांनी आपली जबाबदारी संपवली का? असे असेल तर हा हलगर्जीपणा कोणी केला?

बाबा सिद्धिकी यांची हत्या केली जात असताना त्याची माहिती गुप्तचर यंत्रणेस मिळाली नाही, गुप्तचर यंत्रणा काय काम करते. पोलिसांचे हात बांधलेले आहेत. त्यांनी त्या चाळीस आमदारांना फुकटची सुरक्षा दिली. त्यांच्या त्या सुरक्षेला कुत्रे विचारत नाही. यासंदर्भात राज्य शासनाचे मंत्री छगन भुजबळ जे बोलले, ते योग्य आहे, असे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. दरम्यान या प्रकरणावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, माझी स्वत:ची त्यांच्याशी मैत्री होती. आम्ही सोबत काम केले आहे. दोन आरोपी पकडले गेले आहे. चौकशी सुरू आहे. काही धागेदोरे मिळत आहेत. काही अँगलही मिळत आहेत. त्यावर आता जास्त बोलणे योग्य नाही.

गुप्तहेर यंत्रणा काय करते…

बाबा सिद्दिकी हे मुंबईतील एक ज्येष्ठ नेते आहेत. परंतु ज्या पद्धतीने त्यांच्यावर गोळ्या घातल्या गेल्या. आता सर्व तपासानंतर जी माहिती समोर आली, त्यानुसार दोन दोन महिने आधी आरोपी येऊन थांबले. बाबा सिद्दिकी यांना वाय प्लस सुरक्षा असताना देखील गोळ्या घालणं म्हणजे त्यांच्या सुरक्षा विषयी शंका उपस्थित करणार आहे. सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना गोळ्या घालणं हे त्यापेक्षाही महाभयानक आहे. आम्ही ज्या वेळेस कायदा आणि सुव्यवस्थेवर बोलतो त्यावेळेस राजकारण केलं जातं असं सत्ताधारी म्हणतात. त्यामुळे राज्यातले गृहमंत्री फुल टाईम आहेत का? असाही प्रश्न आता उपस्थित होतोय. महाराष्ट्रातील गुप्तचर आणि गुप्तहेर यंत्रणा काय काम करते. त्यामुळे आताच्या घडीला गृहमंत्री हेच बेपरवा असल्याची स्थिती आहे, असा अंबादास दानवे यांनी म्हटले.

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.