मुंबईत नोर्कोटिक्सकडून एक कोटींचे काश्मिरी चरस जप्त, एका महिला ड्रग्स पेडलरला अटक

नागपाडा परिसरात जम्मू-काश्मीरमधून मोठ्या प्रमाणात चरस आणल्याची माहिती मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला गोपनीय सूत्रांकडून मिळाली होती. ही माहिती मिळताच समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात मुंबई अमली पदार्थ नियंत्रण मंडळाच्या पथकाने काल रात्री नागपाडा भागात छापा टाकला.

मुंबईत नोर्कोटिक्सकडून एक कोटींचे काश्मिरी चरस जप्त, एका महिला ड्रग्स पेडलरला अटक
मुंबईत नोर्कोटिक्सकडून एक कोटींचे काश्मिरी चरस जप्त
Follow us
| Updated on: Jul 12, 2021 | 7:40 PM

मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) मुंबईच्या नागपाडा भागात कारवाईत करत एक कोटींहून अधिक किंमतीचे काश्मिरी चरस जप्त केले आहे. एवढेच नव्हे तर ह्या काश्मिरी चरस सोबत एका महिला ड्रग्स पेडलरलाही अटक करण्यात आली आहे. एनसीबीच्या चौकशीत या चरसचे कनेक्शन थेट जम्मू-काश्मीरपर्यंत असल्याचे कळते. यासंदर्भात माहिती देताना मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे सहसंचालक समीर वानखेडे यांनी सांगितले की, जप्त केलेले दोन किलो काश्मिरी चरस जम्मू-काश्मीरमधून मुंबईत आणले गेले आणि तेथून मुंबई आणि इतर विविध भागात पुरवले जाणार होते. (One crore Kashmiri charas seized from narcotics in Mumbai, a woman drug peddler arrested)

काल रात्री छापा टाकत ड्रग्स केले हस्तगत

नागपाडा परिसरात जम्मू-काश्मीरमधून मोठ्या प्रमाणात चरस आणल्याची माहिती मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला गोपनीय सूत्रांकडून मिळाली होती. ही माहिती मिळताच समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात मुंबई अमली पदार्थ नियंत्रण मंडळाच्या पथकाने काल रात्री नागपाडा भागात छापा टाकला. या छाप्यात एनसीबीने 2 किलो काश्मिरी चरस जप्त केले, ज्याची किंमत एक कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. या प्रकरणात, एक महिला ड्रग्स पेडलरला मुंबई एनसीबीने अटक केली असून तिची कसून चौकशी केली जात आहे.

काश्मिरी चरस मुंबईत कसा आला याबाबत चौकशी सुरु

काश्मिरी चरस जम्मू-काश्मीरमधून मुंबईत कुठल्या मार्गे आणले आणि कोणाकडे त्याचा पुरवठा केला जाणार होता याबाबत एनसीबी अटक करण्यात आलेल्या महिलेची चौकशी करीत आहे. इतकेच नव्हे तर काही दिवसांपूर्वी पकडलेल्या कोट्यवधीच्या चरसशी त्याचा संबंध आहे का? हेही शोधण्याचा मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो प्रयत्न करीत आहे. एनसीबीने अटक केलेली टोळी ही जम्मू काश्मीरवरून आलेल्या ड्रग्सचा दुचाकीच्या माध्यमातून मुंबईत पुरवठा करत असल्याचे चौकशीत उघड झाले होते. मुंबई एनसीबीची एक मोठी कारवाई असून सध्या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीत एनसीबीची टीम सक्रिय आहे. (One crore Kashmiri charas seized from narcotics in Mumbai, a woman drug peddler arrested)

इतर बातम्या

SBI अलर्ट! आपला संपूर्ण डेटा चोरीला जातोय, मग चुकूनही हे मोबाईल अ‍ॅप्स डाऊनलोड करू नका

नाना पटोले सनसनाटी बोलून जाणिवपूर्वक चर्चेत रहायचा प्रयत्न करतायत का?; वाचा सविस्तर

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.