मुंबई पोलिसांच्या हाती तब्बल 120 नवे अश्लील व्हिडीओ, राज कुंद्राचे पाय आणखी खोलात

मुंबई गुन्हे शाखेला तापासातून आता तर तब्बल 120 नवे अश्लील व्हिडीओ सापडले आहेत. त्यामुळे राज कुंद्राच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

मुंबई पोलिसांच्या हाती तब्बल 120 नवे अश्लील व्हिडीओ, राज कुंद्राचे पाय आणखी खोलात
राज कुंद्रा
Follow us
| Updated on: Jul 27, 2021 | 6:09 PM

मुंबई : अश्लील चित्रपट निर्मिती रॅकेट प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेचा तपास सुरु आहे. या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या तपासातून रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. तपासात मिळणाऱ्या या नवनवीन माहितीमुळे उद्योगपती राज कुंद्राचे पाय आणखी खोलात जाताना दिसत आहेत. गुन्हे शाखेला तापासातून आता तर तब्बल 120 नवे अश्लील व्हिडीओ सापडले आहेत. त्यामुळे राज कुंद्राच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

चित्रपटांची निर्मितीसाठी बोगस प्रोड्यूसर

गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्लील चित्रपटांची निर्मिती करण्यासाठी बोगस प्रोड्यूसर बनवले गेले होते. या चित्रपटांसाठी राज कुंद्रा हाच पैसा लावत होता. तसेच प्रत्येक निर्मात्याची एक वेगळी टीम असायची. एकाच वेळी बर्‍याच चित्रपटांचे चित्रीकरण इनडोर केले जायचे, अशीदेखील नवी माहिती आता समोर आली आहे. राज कुंद्राने मार्चमध्ये आपला फोन बदलल्यामुळे गुन्हे शाखेला जुना डेटा अद्याप परत मिळवता आलेला नाही. तो डेटा मिळवण्यात गुन्हे शाखेला यश आलं तर आणखी माहिती मिळण्याची शक्यता आहे.

राज कुंद्राला दिलासा नाही!

राज कुंद्राला (Raj Kundra) अश्लील चित्रपट बनवल्याप्रकरणी कोर्टाकडून आणखी एक मोठा धक्का बसला आहे. त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. राज कुंद्रा याला मुंबईच्या गुन्हे शाखेने 19 जुलै रोजी रात्री उशिरा अटक केली होती. त्यानंतर 20 जुलै रोजी कोर्टाने त्याला 3 दिवसांच्या पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर 23 जुलै रोजी पुन्हा सुनावणी झाली असता कोर्टाने राजला 27 जुलैपर्यंत कोठडी सुनावली होती. आता पुन्हा यात वाढ करण्यात आली आहे.

राज कुंद्रा याच्या घरातून अनेक महत्त्वपूर्ण पुरावे सापडल्याचे क्राइम ब्रँचने कोर्टाला सांगितले आहे. अनेक इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त करण्यात आले आहेत. या संदर्भात एका फॉरेन्सिक तज्ज्ञाची नेमणूक करण्यात आली आहे. ज्याच्या मदतीने डेटा परत मिळवला जात आहे. राज यांच्या घरातून हार्ड डिस्क व मोबाईल सापडला आहे. आयओएसवर आरोपींकडून हॉटशॉट्स दाखवले जात असताना त्यांना Apple कडून 1 कोटी 13 लाख 64,886 रुपये मिळाले होते. ज्या खात्यांमध्ये ही रक्कम जमा केली गेली होती ती कोटक महिंद्र बँक, येस बँक आणि अन्य बँक खाती गोठवली गेली आहेत. आता काही फरार आरोपींचाही शोध सुरू आहे.

संबंधित बातम्या :

अब्जावधींचा रिव्हेन्यू, कोट्यवधींचा नफा, राज कुंद्राच्या कंपनीला भविष्यात तब्बल इतका फायदा?

Raj Kundra Case | राज कुंद्राच्या अडचणीत आणखी वाढ, 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी

Non Stop LIVE Update
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा.
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल.
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा.
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन.
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?.