AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फेरीवाल्याच्या कोयता हल्ल्यात दोन बोटं गमावली, ठाण्याच्या अतिरिक्त पालिका आयुक्त कल्पिता पिंपळेंची प्रकृती कशी?

ठाणे महापालिकेतील माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या हद्दीत येत असलेल्या कासारवडवली नाक्यावरील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी कल्पिता पिंपळे गेल्या होत्या. या कारवाईच्या दरम्यान अमरजित यादव या फेरीवाल्याकडून त्यांच्यावर कोयत्याने अचानक हल्ला करण्यात आला.

फेरीवाल्याच्या कोयता हल्ल्यात दोन बोटं गमावली, ठाण्याच्या अतिरिक्त पालिका आयुक्त कल्पिता पिंपळेंची प्रकृती कशी?
हल्ल्यात कल्पिता पिंपळे यांना दोन बोटे गमवावी लागली
| Edited By: | Updated on: Aug 31, 2021 | 8:20 AM
Share

ठाणे : फेरीवाल्याने कोयत्याने केलेल्या हल्ल्यात दोन बोटं गमवावी लागलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या ओवळा-माजिवडा प्रभागाच्या अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे (Kalpita Pimple) तसेच त्यांच्या अंगरक्षकाची ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ज्युपिटर रुग्णालयात जाऊन भेट घेतली. आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देश संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती शिंदेंनी दिली. सोमवारी दुपारी अमरजित यादव या फेरीवाल्याने केलेल्या हल्ल्यात पिंपळेंची दोन बोटं तुटली, तर अंगरक्षकाचेही एक बोट तुटले. दोघांचीही प्रकृती सध्या स्थिर आहे.

काय आहे प्रकरण?

ठाणे महापालिकेतील माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या हद्दीत येत असलेल्या कासारवडवली नाक्यावरील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी कल्पिता पिंपळे गेल्या होत्या. या कारवाईच्या दरम्यान अमरजित यादव या फेरीवाल्याकडून त्यांच्यावर कोयत्याने अचानक हल्ला करण्यात आला. यावेळी बचावासाठी त्यांनी हात वर केल्याने त्यांची दोन बोटेच तुटून पडली, तर बचावासाठी धावलेल्या अंगरक्षकाचेही एक बोट तुटले आहे. कल्पिता पिंपळे यांना सुरुवातीला जवळच्याच वेदांत रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. तर आरोपी अमरजित यादव याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

आरोपींवर कठोर कारवाई, एकनाथ शिंदेंचे आश्वासन

ठाणे महानगरपालिका हद्दीत एखाद्या फेरीवाल्याकडून थेट महिला अधिकाऱ्यावर हल्ला होण्याची ही पहिलीच घटना आहे. या घटनेत सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे आणि त्यांचा अंगरक्षक दोघेही जखमी झाले आहेत. त्यांच्यावरील उपचारांची सर्व जबाबदारी ठाणे महानगरपालिकेने घेतली असून त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी तात्काळ अटक केली. ही घटना अतिशय निंदनीय असून या प्रकरणातील आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देश संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. अधिकाऱ्यावर हल्ला करण्याची कृती अजिबात खपवून घेतली जाणार नसल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले.

अनधिकृत फेरीवाल्यांमध्ये मुजोरी येते कुठून? – जितेंद्र आव्हाड

ठाणे महापालिकेतील अधिकारी कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध आहे, पण प्रश्न आहे की अनधिकृत फेरीवाल्यांमध्ये इतका मस्तवालपणा, इतकी मुजोरी येते कुठून? प्रोटेक्शन मनी कोण घेतो, तो कुणापर्यंत जातो, हे चक्र उद्ध्वस्त केले पाहिजे, नाहीतर उद्या हे मुजोर एखाद्याचा मुडदा पाडतील, अशी भीती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली.

जिथे दिसेल तिथे मारणार, मनसेचा इशारा

दरम्यान, अमरजित यादव या परप्रांतीय व्यक्तीनं महिला सहाय्यक आयुक्त पिंपळेंवर हल्ला केला, तो जिथे दिसणार तिथे त्याला मारणार, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते महेश जाधव यांनी दिला आहे.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

मोठी घटना ! ठाण्यात सहाय्यक पालिका आयुक्तांवर फेरीवाल्याचा हल्ला, दोन बोटे तुटली, फेरीवाल्यांची गुंडगिरी पुन्हा चव्हाट्यावर

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.