AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोंबिवली बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबियांच्या जीवाला धोका, त्यांचं सुरक्षितस्थळी पुनर्वसन करा : रामदास आठवले

डोंबिवली अत्याचार पीडित मुलीच्या सर्व कुटुंबियांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे राज्य सरकारतर्फे पीडित मुलीच्या कुटुंबियांना म्हाडातर्फे घर देऊन सुरक्षितस्थळी पुनर्वसन केले पाहिजे, अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

डोंबिवली बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबियांच्या जीवाला धोका, त्यांचं सुरक्षितस्थळी पुनर्वसन करा : रामदास आठवले
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले
| Edited By: | Updated on: Oct 03, 2021 | 7:37 PM
Share

कल्याण (ठाणे) : डोंबिवलीमधील सामूहिक बलात्कारातील पीडित मुलीच्या कुटुंबियांची रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांत्वनपर भेट घेऊन रिपब्लिकन पक्षातर्फे 1 लाख रुपयांची सांत्वनपर मदत दिली. डोंबिवली मानपाडा पोलीस ठाणे येथे ही भेट झाली. यावेळी अत्याचार पीडित मुलीचे आई-वडिलांच्या हाती एक लाख रुपयांचा बेरर चेक देण्यात आला. त्यांचे डोंबिवलीत भाड्याने घर होते. त्या घरात आता पुन्हा आम्हाला जाता येत नाही. अत्याचार पीडित मुलीची लहान बहीण इयत्ता 4 थी मध्ये शिकत आहे. अत्याचार पीडित मुलीच्या सर्व कुटुंबियांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे राज्य सरकारतर्फे पीडित मुलीच्या कुटुंबियांना म्हाडातर्फे घर देऊन सुरक्षितस्थळी पुनर्वसन केले पाहिजे, अशी मागणी रामदास आठवले यांनी यावेळी केली.

डोंबिवली पीडितेच्या कुटुंबियांना 20 लाखांची मदत द्या, रामदास आठवलेंची मागणी

मुंबईत साकिनाका येथे अत्याचाराची घटना घडल्यानंतर त्यातील पीडितेच्या परिवाराला मुख्यमंत्र्यांनी 20 लाखांची मदत जाहीर केली आहे. त्या प्रमाणे डोंबिवलीतील बलात्कार पीडितेच्या कुटुंबाला राज्य सरकारने 20 लाखांची सांत्वनपर मदत देण्याची मागणी रामदास आठवले यांनी केली. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादाहरी चौरे, नायब तहसीलदार सुषमा बांगर, रिपाई जिल्हा अध्यक्ष प्रल्हाद जाधव, डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड, दयाळ बहादूर, डी एम मामा चव्हाण, अण्णा रोकडे, घनश्याम चिरणकर, मीना साळवे, रामा कांबळे आणि भारत सोनवणे उपस्थित होते.

‘आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी’

डोंबिवली सामूहिक अत्याचाराचा खटला जलद गती न्यायालयात चालवून 6 महिन्यात निकाल लावून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करावी, अशी मागणी रामदास आठवले यांनी यावेळी केली. डोंबिवली बलात्कार प्रकरणात पोलिसांनी 33 आरोपींना अटक केली. एव्हढ्या मोठ्या प्रमाणात आरोपी असण्याचा हा प्रकार देशात पाहिल्यांदाच घडला आहे. हे बलात्कार प्रकरण मानवतेला कलंक असून रिपाईंच्या वतीने या प्रकरणाचा रिपब्लिकन पक्षातर्फे तीव्र निषेध, असं रामदास आठवले म्हणाले. याप्रकरणी पोलिसांनी तपास काम करुन चांगली कामगिरी केल्याबद्दल रिपाईतर्फे पोलिसांचे अभिनंदन करण्यात आले.

पीडितेवर 8 महिन्यांपासून लैंगिक अत्याचार

डोंबिवली येथे अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार झाल्याचे समोर येताच राज्यात संतापाची लाट उसळली होती. भाजप तसेच इतर विरोधी पक्षांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली होती.  15 वर्षीय मुलीने मानपाडा पोलीस ठाण्यात आपल्यावर 8 महिन्यांपासून लैंगिक अत्याचार सुरु असल्याबाबत तक्रार नोंदवल्यानंतर चौकशीमध्ये जी माहिती समोर आली ते ऐकून पोलीस हैराण झाले होते.

हेही वाचा :

लग्नाच्या आमिषाने विवाहित पोलीस उपनिरीक्षकाकडून बलात्कार, कोथरुड पोलिसात तक्रार

उल्हासनगरात वालधुनी नदीत अज्ञात मृतदेह, परिसरात खळबळ, हत्या की आत्महत्या, गूढ कसं उलगडणार?

आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा.
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया.
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.