स्किजोफ्रेनिया आजाराच्या नावाने लाखो लुबाडले, रुग्णांना गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड पटविण्याचा सल्ला, विरारमध्ये बोगस डॉक्टराचा भंडाफोड

डॉक्टरांना आपण देव मानतो. पण काही नराधम हे डॉक्टराच्या नावाने सर्वसामान्यांची फसवणूक करतात. सर्वसामान्यांना लाखो रुपयांनी लुबाडतात. अशीच काहिशी घटना विरारमधून समोर आली आहे.

स्किजोफ्रेनिया आजाराच्या नावाने लाखो लुबाडले, रुग्णांना गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड पटविण्याचा सल्ला, विरारमध्ये बोगस डॉक्टराचा भंडाफोड
लाखोंनी लुटलं, दारुच्या बाटल्या मागवल्या, रुग्णांना गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड पटविण्याचा सल्ला, सो कॉल्ड प्रख्यात डॉक्टराचा भंडाफोड

विरार (पालघर) : डॉक्टरांना आपण देव मानतो. पण काही नराधम हे डॉक्टराच्या नावाने सर्वसामान्यांची फसवणूक करतात. सर्वसामान्यांना लाखो रुपयांनी लुबाडतात. अशीच काहिशी घटना विरारमधून समोर आली आहे. विरारमध्ये एका सो कॉल्ड प्रख्यात डॉक्टराने तेलंगणातील एका कुटुंबाला तब्बल 9 लाखांनी लुबाडलं आहे. तसेच या डोक्टराने स्किजोफ्रेनिया या आजारापासून बरे होण्यासाठी अत्यंत किळसवाणा आणि संतापजनक असा सल्ला दिला आहे. या प्रकरणी पीडित कुटुबाने संबंधित बोगस डॉक्टराविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे.

नेमकं प्रकरण काय?

युट्यूब चॅनलवरुन मेंटल हेल्थ कन्सल्टंटच्या नावाखाली नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या बोगस डॉक्टरवर विरारच्या अर्नाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्किजोफ्रेनिया हा आजार कोणतेही औषध न देता 10 दिवसात बारा करण्याच्या नावाखाली या बोगस डॉक्टरने तेलंगणा राज्यातील एका कुटुंबाची 9 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.

नेमकं काय घडलं?

कैलाश मंत्री असे गुन्हा दाखल झालेल्या बोगस डॉक्टराचे नाव आहे. त्याने विरार पश्चिम येथील बोलींज परिसरात शुभम कॉम्प्लेक्समधील अजिंक्यतारा या बंगल्यात मेंटल हेल्थ कन्सल्टंट हे हॉस्पिटल सुरु केले होते. या हॉस्पिटलमधून स्किजोफ्रेनिया या आजारा विषयी युट्यूब चॅनलवर जाहिरात आणि मार्गदर्शन केले होते. यावरुन तेलंगणाच्या हैदराबाद येथील पेशाने प्रिन्सिपल असणारे किरण कुमार वंगला यांनी आपल्या 18 वर्षाच्या मुलीच्या उपचारासाठी या डॉक्टर सोबत संपर्क केला होता.

आरोपी डॉक्टराने पीडित कुटुंबाला मुंबईत बोलावलं

आरोपी बोगस डॉक्टरने मुलीला कोणत्याही औषधाशिवाय 10 दिवसात बरे करतो, असे आश्वासन देऊन वंगला यांच्याकडून आधी 5 लाख आणि नंतर 4 लाख असे एकूण 9 लाख रुपये उकळले होते. त्याने 3 दिवस ऑनलाईन क्लासही घेतला होता. पण वंगला कुटुंबाचे समाधान न झाल्याने डॉक्टरने त्यांना मुंबईला बोलावून घेतले होते.

दारुच्या बाटल्या मागवल्या, गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड पटविण्याचा सल्ला

पीडित कुटुंबीय तेलंगणाहून मुंबईत आल्यानंतर आरोपी डॉक्टरने त्यांना चक्क 10 बॉटल्स बिअर आणि 5 बॉटल्स व्हिस्की आणण्यास सांगितलं. एवढंच नाही तर बोगस डॉक्टरने चक्क उपचाराच्या नावाखाली मुलीला बॉयफ्रेंड पाटवावा लागेल, वाडीलाला गर्लफ्रेंड पटवावी लागेल, दारु प्यावी लागेल आणि मुलीला 1 महिना त्यांच्याकडे ठेवावे लागेल आणि हाच उपचार आहे. यातूनच हा आजार बरा होऊ शकतो, असा सल्लाही दिला.

पीडित कुटुंबाची पोलिसात तक्रार

अखेर वंगला कुटुंबियांना आपली फसवणूक झाल्याचं जाणवलं. त्यांनी विरारचे अर्नाळा पोलीस ठाणे गाठले. तिथे त्यांनी बोगस डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल करत त्याच्या कृत्याचा पर्दाफाश केला. पोलिसांनी डॉक्टराला अद्याप अटक केलेली नाही. डॉक्टरचे वैद्यकीय प्रमाणपत्र तपासणीसाठी पाठवले आहे. सर्व प्रकरणाची पडताळणी करुनच डॉक्टरला अटक केली जाईल, अशी भूमिका पोलिसांनी मांडली आहे.

हेही वाचा :

चालत्या गाडीत अल्पवयीन मुलीवर मेव्हण्याचा दोन वेळा बलात्कार, महिन्याभरानंतरही आरोपी मोकाट

VIDEO : पळून जाणाऱ्या जोडप्याला पकडलं, गळ्यात टायर टाकून नाचवलं, मध्यप्रदेशातील संतापजनक कृत्य

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI