विरारमध्ये मोबाईल, सोनं, घरातील वस्तू चोरणारी सराईत टोळी अटक; पोलीस ठाण्यात नेताच 12 गुन्ह्यांची उकल

सर्वसामान्य कुटुंबाच्या (Virar Thief Gang) घराची टेहाळणी करुन घरात कोणी नसताच त्यांच्या घरातून मोबाईल, सोन्याचे दागिने, घरातील वस्तू चोरणाऱ्या सराईत टोळीला विरारच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने जेरबंद केलं आहे. या टोळीतील तीन जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 12 चोरी आणि घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आलं आहे. यात एक मुख्य आरोपी अद्यापही फरार आहे.

विरारमध्ये मोबाईल, सोनं, घरातील वस्तू चोरणारी सराईत टोळी अटक; पोलीस ठाण्यात नेताच 12 गुन्ह्यांची उकल
Virar Thief Gang
Follow us
| Updated on: Nov 20, 2021 | 12:22 PM

विरार : सर्वसामान्य कुटुंबाच्या (Virar Thief Gang) घराची टेहाळणी करुन घरात कोणी नसताच त्यांच्या घरातून मोबाईल, सोन्याचे दागिने, घरातील वस्तू चोरणाऱ्या सराईत टोळीला विरारच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने जेरबंद केलं आहे. या टोळीतील तीन जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 12 चोरी आणि घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आलं आहे. यात एक मुख्य आरोपी अद्यापही फरार आहे.

चोरट्यांच्या टोळीला शिताफीने अटक

विरारच्या स्लम एरियाला टार्गेट करुन, तेथील नागरिकांच्या घरातील वस्तू, मोबाईल, टीव्ही, शिलाईन मशीन, सोनं अशा वस्तू काही क्षणात चोरुन हैदोस घालणाऱ्या टोळीला विरारच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने मोठ्या शिताफीने अटक केली आहे. ही टोळी दिवसा चाळ-वस्तीत शिरुन, उघड्या घरात हॉलमध्ये ठेवलेल्या वस्तू घरातील रहिवाशांच्या नकळत अगदी क्षणात चोरायचे.

त्यांनी मोठ्या प्रमाणात नागरिकांचे मोबाईल चोरले होते. या टोळीतील सोहेल खान, कार्तिक सिंग, मिराज खान या तिघांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. तर यातील मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. या टोळीने आतापर्यंत 12 गुन्ह्यांची कबूली दिली आहे. तर गुन्ह्यातील 1 लाख 60 हजार किंमतीचा मुद्देमाल ही त्यांच्याकडून जप्त करण्यात आला आहे. ही टोळी चोरलेला माल अगदी कमी भावात विकून मजा करायचे.

बदलापुरात दुरुस्तीसाठी आलेल्या फोनवर चोरट्यांचा डल्ला, दीड लाखांचा मुद्देमाल लंपास

चोरट्यांनी मोबाईलचं दुकान फोडून तब्बल दीड लाखांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ठाणे जिल्ह्यात बदलापूर शहरातील पूर्व भागात शिरगाव आपटेवाडी परिसरात बुधवारी पहाटेच्या सुमारास ही चोरीची घटना घडली. विशेष म्हणजे शोकेसमधल्या नवीन मोबाईलला चोरट्यांनी हातही लावला नाही. तर दुकानात रिपेरिंगसाठी आलेले आणि रिचार्ज करण्यासाठी ठेवलेले फोन या चोरट्यांनी चोरून नेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

काय आहे प्रकरण?

शिरगाव आपटेवाडी नाक्यावर तुषार पवार यांच्या मालकीचं आर. टी. इन्फोटेक नावाचं मोबाईलचं दुकान आहे. या दुकानात बुधवारी पहाटे साडे तीन वाजताच्या सुमारास दोन अज्ञात चोरटे शटर वाकवून आत घुसले. यानंतर त्यांनी बॅटरीच्या साहाय्याने मोबाईलच्या दुकानात शोधाशोध केली.

दीड लाखांचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार

दुकानाच्या काउंटरमध्ये ठेवलेला एक लॅपटॉप, काही मोबाईल फोन्स, स्मार्टवॉच, हेडफोन्स असा तब्बल दीड लाखांचा मुद्देमाल घेऊन हे चोरटे पसार झाले. विशेष म्हणजे शोकेसमधल्या नवीन मोबाईलला मात्र या चोरट्यांनी हात लावला नाही. तर दुकानात रिपेरिंगसाठी आलेले आणि रिचार्ज करण्यासाठी ठेवलेले फोन या चोरट्यांनी चोरून नेले.

संबंधित बातम्या :

महिला पोलिसानं केली आत्महत्या, घरीच लावला गळफास, पाच वर्षांची मुलगी वाऱ्यावर

फेसबुकवरील मैत्री महागात, नगरमध्ये सरकारी कर्मचाऱ्याची 2 लाख 30 हजारांना फसवणूक

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.