गरिबांच्या भल्यासाठी काम करेन, NCB च्या समुपदेशनावेळी आर्यन खानचा वानखेडेंना शब्द

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यासह पथकाने आर्यनचे समुपदेशन केले. तेव्हा त्याने भविष्यात आपले नाव चुकीच्या कारणासाठी प्रसिद्धीझोतात येणार नाही, याची काळजी घेण्याचं आश्वासन दिलं

गरिबांच्या भल्यासाठी काम करेन, NCB च्या समुपदेशनावेळी आर्यन खानचा वानखेडेंना शब्द
Shahrukh Khan Aryan Khan, Sameer Wankhede

मुंबई : मुंबई ड्रग्ज क्रुझ पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेला अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचे अंमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या (एनसीबी) कोठडीत समुपदेशन करण्यात आले. त्यावेळी, इथून बाहेर पडल्यानंतर मी गरिब, आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास व्यक्तींसाठी काम करण्याचा प्रयत्न करेन, तसेच सर्वांना आपला अभिमान वाटेल, असेच काम करेन, असा शब्द आर्यनने समुपदेशनावेळी दिल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

आर्यन खान सध्या आर्थर रोड कारागृहात आहे. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यासह पथकाने आर्यनचे समुपदेशन केले. तेव्हा त्याने भविष्यात आपले नाव चुकीच्या कारणासाठी प्रसिद्धीझोतात येणार नाही, याची काळजी घेण्याचं आश्वासन दिलं. आर्यनसह मूनमून धमेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर, गोमित चोप्रा, अरबाझ र्मचट यांना एनसीबीने मुंबई ड्रग्ज क्रुझ पार्टी प्रकरणात अटक केली आहे.

20 ऑक्टोबरपर्यंत जेलमध्ये

आर्यन खानच्या जामीन अर्जावरील निकाल कोर्टाने राखून ठेवला आहे. त्यामुळे 20 ऑक्टोबरपर्यंत आता आर्यनला जेलमध्येच राहावं लागणार आहे. क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात दोन दिवसांपूर्वी आर्यन खान तसेच अरबाज मर्चंट आणि मूनमून धमेचा या आरोपींच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. आर्यन खानच्या बाजूने अॅड. अमित देसाई यांनी युक्तिवाद केला. त्यांनी पूर्ण क्षमतेने आर्यन खानची बाजू मांडून त्याला जामीन देण्यात यावा अशी मागणी केली. तर एनसीबीच्या वकिलांनी विरोध केला. दोन्ही बाजू जाणून घेतल्यानंतर न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला.

आर्यन खानला मनी ऑर्डर

दरम्यान, काही दिवसांपूर्वी आर्यन खानला कुटुंबीयांकडून 4500 रुपयांची मनी ऑर्डर आली आहे. कारागृह प्राधिकरणाकडे ही मनी ऑर्डर पाठवावी लागते. हे पैसे आर्यनच्या कँटीनच्या खर्चासाठी कूपनच्या स्वरुपात दिले जातात. जेल मॅन्युअलनुसार, कोणत्याही कारागृहातील आरोपीला महिन्यातून एकदा मनीऑर्डर मिळू शकते, जी साडेचार हजार रुपयांपेक्षा जास्त असू शकत नाही.

खान कुटुंबासाठी कठीण काळ

अभिनेता शाहरुख खानसाठी 15 दिवस खूप कठीण गेले आहेत. अंमली पदार्थ प्रकरणात मुलगा आर्यन खानच्या अटकेनंतर शाहरुख खान आणि गौरी खान हे आर्यनला जामिनावर बाहेर काढण्याचा हरप्रकारे प्रयत्न करत आहेत. त्यातच शाहरुख खानची लेक सुहाना खान बऱ्याच दिवसांपासून मुंबईत नाही. सुहाना खान आपला अभ्यास पूर्ण करण्यासाठी बऱ्याच काळापासून न्यूयॉर्कमध्ये आहे. मात्र, 3 ऑक्टोबर रोजी ड्रग्ज प्रकरणात भाऊ आर्यन खानच्या अटकेनंतर सुहाना खान आई गौरी खान आणि वडील शाहरुख खान यांच्या सतत संपर्कात आहे.

संबंधित बातम्या :

आर्यन खान आधी ‘या’ बॉलिवूडकरांनीही खाल्लीय ‘आर्थर रोड’ तुरुंगाची हवा, पाहा कोणाकोणाचे नाव सामील…

मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात अडकला, शाहरुख खानच्या ब्रँड व्हॅल्यूवर परिणाम होणार?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI