मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात अडकला, शाहरुख खानच्या ब्रँड व्हॅल्यूवर परिणाम होणार?

शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) मुंबई क्रूजच्या ड्रग्स पार्टी प्रकरणात अटक केल्याने अभिनेत्याच्या ब्रँड व्हॅल्यूवर देखील परिणाम झाला आहे. शैक्षणिक तंत्रज्ञान कंपनी BYJU'S ने शाहरुख खानसोबतच्या जाहिरातींवर तात्पुरती बंदी घातली आहे.

मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात अडकला, शाहरुख खानच्या ब्रँड व्हॅल्यूवर परिणाम होणार?
Shah rukh khan-aryan

मुंबई : शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) मुंबई क्रूजच्या ड्रग्स पार्टी प्रकरणात अटक केल्याने अभिनेत्याच्या ब्रँड व्हॅल्यूवर देखील परिणाम झाला आहे. शैक्षणिक तंत्रज्ञान कंपनी BYJU’S ने शाहरुख खानसोबतच्या जाहिरातींवर तात्पुरती बंदी घातली आहे. BYJU’S गेल्या काही दिवसांपासून शाहरुख खानसोबत टीव्हीवर चित्रित केलेल्या जाहिराती दाखवत नाही. तसेच, आगाऊ बुकिंग असूनही त्याने शाहरुखसोबतच्या जाहिरातीचे काम थांबवले आहे.

BYJU च्या या मोठ्या निर्णयामागे लोकांनी त्यांना शाहरुखच्या नावाने ट्रोल केले हेच कारण आहे. ट्विटरवर अलीकडेच #Boycott_SRK_Related_Brands चा ट्रेंड गेला. यामध्ये वापरकर्त्यांनी शाहरुख खानसोबत काम करणाऱ्या ब्रॅण्डवर बहिष्कार टाकण्याविषयी बोलले गेले. वापरकर्त्यांना BYJU’S बद्दल असे म्हणायचे होते की, त्यांनी अशा सेलिब्रिटींसोबत काम करू नये, जे आपल्या मुलाला योग्य शिक्षण देऊ शकले नाहीत.

शाहरुख खान गेल्या दोन दशकांपासून पेप्सी, ह्युंदाई, एलजी, बिग बास्केट, फ्रूटी, लक्स, फेअर अँड हँडसम, दुबई टुरिझम आणि रिलायन्स जिओसारख्या मोठ्या मोठ्या ब्रॅण्डसाठीच्या जाहिरातींमध्ये काम करत आहे. BYJU’S हा शाहरुखचा सर्वात मोठा प्रायोजक करार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख खान आणि BYJU’S चा सौदा दरवर्षी 3 ते 4 कोटींमध्ये केला जात होता. शाहरुख 2017 पासून BYJU’s चा ब्रँड अॅम्बेसेडर आहे.

शाहरुखच्या ब्रँड मूल्यावर काय परिणाम होईल?

विशेष म्हणजे शाहरुख खानच्या एलजी कंपनीच्या जाहिराती अजूनही टीव्हीवर चालू आहेत. एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की, या गोष्टी अनेक महिन्यांसाठी आखलेल्या आहेत आणि अचानक बदलल्या जाऊ शकत नाहीत. अशा स्थितीत शाहरुख खानचे ब्रँड म्हणून काय होणार हा मोठा प्रश्न निर्माण होत आहे.

काही तज्ज्ञांचे असे म्हणे आहे की, मनोरंजन करणारा म्हणून त्याच्यावर काही परिणाम होणार नाही. पण ब्रँड प्रमोटर म्हणून काही काळ गोष्टी बदलतील. दीपिका पदुकोणचे उदाहरण देत तज्ज्ञ म्हणतात की, ती सुद्धा ड्रगच्या प्रकरणात अडकली होती, पण काही काळानंतर ब्रँड्सचा चेहरा म्हणून परत आली. एक सेलिब्रिटी म्हणून, तुम्ही नेहमी स्वतःला जोखमीच्या मार्गावर ठेवता. पण, आपण अनेक सेलेब्स अडचणीत येताना आणि नंतर त्यातून बाहेर पडताना पाहिले आहे. सेलिब्रिटींना नेहमीच अशा गोष्टींना बळी पडण्याचा पडण्याचा धोका असतो. जरी एखादा ब्रँड त्यांना पाठिंबा देत असला, तरी सोशल मीडिया मध्येच येतो. अशा परिस्थितीत, ब्रँडकडे दुसरा कोणताही मार्ग नसतो.

ही पहिलीच वेळ नाही!

एखाद्या सेलिब्रिटीला वादात अडकवण्याची आणि ब्रँड सोडण्याची ही पहिली वेळ नाही. 2015 मध्ये, आमिर खानच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर स्नॅपडीलने त्याचा करार संपवला. पुढच्या वर्षी, थम्स अपने हिट अँड रन प्रकरणामुळे सलमान खानसोबतचा करार संपवला. आता ट्रोल झाल्यावर अमिताभ बच्चन यांनी कमला पसंद पान मसाला सोबतचा करार संपवला आहे.

वरवर पाहता शाहरुख खानची केस वेगळी आहे, कारण तो थेट वादात अडकलेला नाही. अशा परिस्थितीत आर्यन खान प्रकरण कसे पुढे जाते, हे शाहरुखशी संबंधित ब्रँड्सचा निर्णय काय असेल ते पुढे कळेल.

हेही वाचा :

‘या’ व्यक्तीच्या आठवणीत व्याकूळ होऊन जगजीत सिंह यांनी गायले होते गाणे, वाचा ‘चिट्ठी ना कोई संदेश’ गाण्याचा किस्सा

Happy Birthday Akshara Haasan | हुबेहूब आपल्या आईसारखीच दिसते कमल हासनची लेक, पाहा अक्षराचे फोटो

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI