AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आर्यन खान आधी ‘या’ बॉलिवूडकरांनीही खाल्लीय ‘आर्थर रोड’ तुरुंगाची हवा, पाहा कोणाकोणाचे नाव सामील…

नारकोटिक कंट्रोल ब्युरोने (NCB) बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रगच्या प्रकरणात 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. 2 ऑक्टोबर रोजी क्रूझवर एनसीबीच्या छाप्यानंतर आर्यन खानला अटक करण्यात आली होती.

आर्यन खान आधी ‘या’ बॉलिवूडकरांनीही खाल्लीय ‘आर्थर रोड’ तुरुंगाची हवा, पाहा कोणाकोणाचे नाव सामील...
Aryan Khan
| Edited By: | Updated on: Oct 13, 2021 | 8:49 AM
Share

मुंबई : नारकोटिक कंट्रोल ब्युरोने (NCB) बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रगच्या प्रकरणात 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. 2 ऑक्टोबर रोजी क्रूझवर एनसीबीच्या छाप्यानंतर आर्यन खानला अटक करण्यात आली होती. गुरुवारीच मुंबईच्या दंडाधिकारी न्यायालयाने आर्यन आणि उर्वरित आरोपींना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र, न्यायालयाच्या निर्णयानंतर लगेचच आरोपींनी जामीन अर्ज दाखल केला होता. या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायालयाने शुक्रवारी जामीन अर्ज फेटाळला.

जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आर्यनला सध्या आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात आले आहे. पण, आर्यन हा पहिला सेलिब्रिटी नाही, ज्याला या जेलची हवा खावी लागली आहे. आर्यन-राज कुंद्राच्या  आधी अनेक कलाकारांनी आर्थर रोड कारागृहाची हवा खाल्ली आहे.

राज कुंद्रा

आर्यन खान ड्रग्स प्रकरणापूर्वी, आणखी एका हायप्रोफाईल प्रकरणामुळे प्रसारमाध्यमांमध्ये खूप मथळे आले होते. अलीकडेच शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांना पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक करण्यात आली होती. राज कुंद्रावर आरोप आहे की, त्याने काही अॅप्सद्वारे कथितरित्या प्रकाशित करण्याच्या हेतूने प्रौढ चित्रपट बनवले होते. या प्रकरणात 46 वर्षीय राज कुंद्रा जवळपास दोन महिने आर्थर रोड तुरुंगात होता. सध्या तो जामिनावर बाहेर आहे.

संजय दत्त

बॉलिवूडचा मुन्नाभाई म्हणजेच संजय दत्तनेही  1993च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात आर्थर रोड जेलची हवा खाल्ली. या अभिनेत्याला येथे हाय-सिक्युरिटी ब्लॉकमध्ये ठेवण्यात आले होते. यानंतर त्याची रवानगी पुण्याच्या येरवडा कारागृहात करण्यात आली.

सलमान खान

2015 मध्ये, मुंबई सत्र न्यायालयाने 2002च्या हिट अँड रन प्रकरणात सलमान खानला दोषी ठरवले आणि पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. न्यायालयाच्या निर्णयानंतर अभिनेत्याला लवकरच शरणागती पत्करावी लागली. यानंतर सलमानला प्रथम आर्थर रोड जेलमध्ये नेण्यात आले होते.

शायनी आहुजा

बॉलिवूड अभिनेता शायनी आहुजाला जून 2009 मध्ये त्याच्या घरातील 19 वर्षीय मोलकरणीवर बलात्कार आणि धमकी दिल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. या प्रकरणात त्याला जामीन मिळेपर्यंत तो आर्थर रोड जेलमध्ये होता.

सूरज पांचोली

2013 मध्ये जिया खानच्या मृत्यूनंतर आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज पांचोलीवर जियाची आई राबिया यांनी आरोप केला होता. यानंतर, सूरजला जामिन मिळेपर्यंत सुमारे तीन आठवडे आर्थर रोड जेलच्या हाय-सिक्युरिटी ब्लॉकमध्ये ठेवण्यात आले होते.

इंदर कुमार

दिवंगत अभिनेता इंदर कुमारलाही 2014 मध्ये एका मॉडेलवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली 45 दिवस तुरुंगात घालवावे लागले होते.

हेही वाचा :

Bigg Boss Marathi 3 | घरात वाईल्ड कार्ड एंट्री होताच वादाचा नवा अध्याय सुरु, जय-आदिश आपापसांत भिडले!

‘डोई धरीला धरीला आईचा देव्हारा, भाळी लाविला लाविला देवीचा भंडारा’, ‘सोयरीक’ चित्रपटातील गोंधळाला अजयचा स्वरसाज!

‘या’ प्रसिद्ध संगीत दिग्दर्शकाची नात झळकणार ‘सूर्यवंशी’ चित्रपटात, सर्वत्र आहे बोल्डनेसची चर्चा

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.