जोगेश्वरी रेल्वे स्थानकात महिला प्रवाशाचा विनयभंग, घटना सीसीटीव्हीत कैद

वैजंता गोगावले, Tv9 मराठी

Updated on: Sep 24, 2022 | 7:44 PM

कोणत्याही महिला डब्यात पुरुष प्रवासी आल्यास त्याची माहिती तात्काळ हेल्पलाइन क्रमांक 1512 वर द्यावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक अनिल कदम यांनी महिला प्रवाशांना केले आहे.

जोगेश्वरी रेल्वे स्थानकात महिला प्रवाशाचा विनयभंग, घटना सीसीटीव्हीत कैद
महिला वकिलाचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला अटक
Image Credit source: TV9

मुंबई / गोविंद ठाकूर (प्रतिनिधी) : लोकल ट्रेनमधून प्लॅटफॉर्मवर उतरत असताना एका आरोपीने महिलेचा विनयभंग (Molestation) करुन पळ काढल्याची घटना जोगेश्वरी (Jogeshwari) हार्बर रेल्वे स्थानकावर घडली आहे. महिला प्रवाशाचा विनयभंग करणाऱ्या आरोपीविरुद्ध रेल्वे पोलिसात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. बोरिवली रेल्वे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. विनयभंगाची ही घटना रेल्वे स्थानकातील सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाली आहे.

महिला ट्रेनमधून उतरत असताना घडली घटना

बोरिवली जीआरपीकडून मिळालेल्या माहितीनुसार, 21 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 10 वाजता जोगेश्वरी रेल्वे स्थानकाच्या हर्बल मार्गावर एक महिला प्रवासी ट्रेनमधून खाली उतरत होती. यावेळी एका खोडकर आरोपीने महिलेचा विनयभंग करून पळ काढला.

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर बोरिवली रेल्वे पोलिस चार वेगवेगळ्या टीम तयार करत विनयभंग करणाऱ्या आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदवून आरोपींचा शोध घेत आहेत.

आरोपी गतीमंद असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न

रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही तपासले असता सीसीटीव्हीमध्ये आरोपी कपडे काढून नग्न अवस्थेत फिरताना दिसत आहे. प्राथमिक तपासात पोलिसांना हा आरोपी गतीमंद असल्याचे समोर आले आहे. सध्या बोरिवली जीआरपी पोलीस आरोपीला लवकरच पकडण्याचा दावा करत आहेत.

कोणत्याही महिला डब्यात पुरुष प्रवासी आल्यास त्याची माहिती तात्काळ हेल्पलाइन क्रमांक 1512 वर द्यावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक अनिल कदम यांनी महिला प्रवाशांना केले आहे.

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI