AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई लोकलमध्ये बेवारस बॅग, बॉडी म्हणून कोणी नाही लावला हात, पोलिसांनी तपासल्यावर… बॅगमध्ये नेमकं काय?

मुंबईमधील लोकलमधून एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. रात्रीच्या वेळी एक बेवारस बॅग आढळली. लोकांनी कोणीही तिला हात लावला नाही, मात्र पोलिसांनी बॅग तपासल्यावर वेगळंच सत्य समोर आलं आहे.

मुंबई लोकलमध्ये बेवारस बॅग, बॉडी म्हणून कोणी नाही लावला हात, पोलिसांनी तपासल्यावर... बॅगमध्ये नेमकं काय?
| Updated on: Sep 23, 2024 | 7:08 PM
Share

मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलमध्ये रोज हजारोजण प्रवास करतात. अनेकजण आपल्या काही वस्तू विसरतात, रेल्वे पोलिसांकडे पोहोचल्यावर त्या सुरक्षित राहतात. मूळ मालक आल्यावर शहानिशा करून संबंधित वस्तू त्याला सुपुर्द केली जाते. अशातच कसारा – CSMT लोकलमध्ये एक बेवार बॅग आढळली, मात्र त्या बॅगला कोणीही भीतीने हात लावल नाही. एका प्रवाशाने ती बॅग पोलिसांकडे सोपवली. पोलिसांनी ती बॅग सावधपणे उघडल्यावर त्यामध्ये असं काही होतं की कोणालाही विश्वास बसला नाही.

बॅगमध्ये होतं तरी काय?

आसनगाव स्थानकाहून सुटलेल्या कसारा-CSMT लोकल गाडीच्या जनरल डब्यामध्ये बॅग आढळून आली. ती बॅग कोणाचीही नसल्याचं लक्षात आलं. रात्रीची वेळ असल्याने कोणीही बॅगला हात लावला नाही ना त्यामध्ये काय आहे हे पाहण्याचा घेण्याचा प्रयत्न केला. प्रवाशाने ती बॅग तातडीने कल्याण जीआरपी पोलिसांच्या ताब्यात दिली. रात्री सुमारे 11वाजता पोलिसांनी सदर बॅग पोलिसांकडून तपासण्यात आली. या बॅगमध्ये एकूण 20 लाख रुपयांची रोकड पोलिसांनी सापडली. 500 रूपयांच्या नोटांचे सात बंडल्स या बॅगमध्ये होते. त्यासोतच एक औषधांचा बॉक्सही पोलिसांना मिळालाय.

या घटनेने कल्याण रेल्वे स्थानकात एकच खळबळ माजली आहे. पोलिसांनी तातडीने पंचनामा करून बॅग जप्त केली आहे. सदर बॅगचा मालक कोण आहे, याचा तपास सध्या सुरू आहे रविंद्र शिसवे, पोलीस आयुक्त, लोहमार्ग मुंबईयांच्या मार्गदर्शनाखाली, मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त व बुधवंत, सपोआ, कल्याण विभाग यांच्या सूचनांनुसार तपासकार्य सुरू आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.