AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai News : ट्यूशनला जातो सांगून निघाला, बॅगेत पुस्तकांऐवजी काय भरलं?.. बेपत्ता मुलाचा पोलिसांनी कसा घेतला शोध ?

शाळेतील एका चुकीमुळे तो बिथरला, आई-वडिलांना सामोरं जायची त्याला हिंमत नव्हती. त्यामुळे ट्यूशनच्या नावे बाहेर तर पडला तो घरी परतलाच नाही. चिंताग्रस्त पालकांनी लगेच पोलिसांत धाव तर घेतली पण...

Mumbai News : ट्यूशनला जातो सांगून निघाला, बॅगेत पुस्तकांऐवजी काय भरलं?.. बेपत्ता मुलाचा पोलिसांनी कसा घेतला शोध ?
| Updated on: Oct 05, 2023 | 9:41 AM
Share

मुंबई | 5 ऑक्टोबर 2023 : चांगल्या मार्कांचं, सतत अव्वल येण्याचं प्रेशर सध्या मुलांवर असतं. जे यात यशस्वी होतात, त्यांची वाहवा होते, पण ज्यांना अपेक्षित यश मिळत नाही, त्यांची काय अवस्था होत असेल. अपेक्षेच्या ओझ्याखाली दबलेली मुलं भावनेच्या भरात अशीच एखादी कृती करून बसतात, ज्यामुळे त्यांच्या आयुष्याचं नुकसान होऊ शकतं. पालकांचा जीव टांगणीला लागतो, ते वेगळचं… अशीच एक घटना मुंबईत घडल्याचे समोर आले आहे. शाळेच्या परीक्षेमध्ये चांगले मार्क न मिळवू (scored poor marks) शकल्याने त्या मुलाला पालकांना सामोरं जायची इतकी भीती वाटली, की त्यापेक्षा घरातून निघून जाणंच त्याने सोयीस्कर समजलं. मात्र त्यानंतर पालकांची जी अवस्था झाली… अशी वेळ कोणावरही येऊ नये.

अवघ्या १५ वर्षांचा तो अल्पवयीन मुलगा ट्यूशनच्या नावे बाहेर पडला, आई हो म्हणाली. पण मुलाच्या बॅगेत पुस्तकांऐवजी दुसरंच काही सामान, कपडे असल्याचं तिच्या लक्षातच आलं. संध्याकाळी नेहमीची वेळ उलटून गेल्यावरही मुलगा घरी न आल्याचे पाहून पालकांना चिंता वाटू लागली आणि त्यांनी पोलिसांत धाव घेतली. ५ दिवस उलटूनही त्यांचा मुलगा घरी न आल्याने अवस्था अतिशय बिकट झाली होती. पण पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने त्या मुलाचा अखेर शोध लागला. पण ही परिस्थिती खरंच का उद्भवली, याचा विचार सर्वांनी करायची गरज असल्याचे या घटनेतून अधोरेखित झाले.

शाळेतील एक चूक त्याल नडली

परळमधील एका नामांकित शाळेत १० वीत शिकणाऱ्या या मुलाला 25 सप्टेंबर रोजी प्राथमिक परीक्षेचा रिझल्ट मिळाला. सगळ्यांनी आपल्या पालकांच्या सह्या त्यावर आणाव्यात अशी सूचना शिक्षकांनी दिली होती. मात्र सरासरीपेक्षा कमी गुण मिळाल्यामुळे, मुलाने रिपोर्ट कार्ड पालकांना दाखवण्यास टाळाटाळ केली, पण सही तर हवी होती. शेवटी टक्केवारीमध्ये थोडी खाडाखोड करून, त्याने आईकडून रिपोर्ट कार्डवर सही करू घेतली आणि दुसऱ्या दिवशी शाळेत सबमिट केले. पण त्याचा हा खोडसाळपण वर्गशिक्षिकेच्या लक्षात आला आणि त्यांनी त्या मुलाच्याी आई-वडिलांना बोलावून त्याची चूक दाखवली, तसेच त्या मूळ मार्कही सांगितले.

क्लासच्या नावाने बाहेर पडला पण…

शाळा सुटल्यावर तो मुलगा शांतपणे त्याच्या घरी गेला आणि आपण क्लासला निघालोय असे सांगून बाहेर पडला. पण त्याच्या बॅगेत पुस्तकांऐवजी काही कपडे आणि लॉकरमधून काढलेले 5 हजार रुपये होते, हे त्याच्या आईच्या लक्षातचं आलं नाही. त्या मुलाच्या वडिलांचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे. संध्याकाळी सहाच्या सुमारास ते घरी आले, तोपर्यंत त्यांचा मुलगा घरी परत आला नव्हताच. एरवी रोज ५ वाजेपर्यंत क्लासवरून घरी येणार मुलगा, तासाभरानंतरही घरी न आल्याचे पाहून त्यांना चिंता वाटू लागली. त्यांनी सगळीकडे त्याचा शोध घेतला, मात्र तो काही सापडला नाहीच. अखेर त्याच्या वडिलांनी भोईवाडा पोलिस स्टेशनमध्ये धाव घेत (मुलगा अल्पवयीन असल्याने) अपहरणाची तक्रार नोंदवली.

अनेक दिवस पोलिस घेत होते शोध

या तक्रारीनंतर पोलिसांनी लगेच त्याचा शोध घेण्यास सुरूवात केली. मात्र गणपतीचे दिवस असल्याने रस्त्यांवर बरीच गर्दी होती. मुलगा बेपत्ता झाल्याची माहिती आम्ही आजूबाजूच्या सर्व पोलिस ठाण्यांना कळवली, त्याचे फोटोही पाठवले. त्याच चेहऱ्यामोहऱ्याचा एक मुलगा लालबाग आणि काळाचौकी परिसरात फिरत असल्याचे आम्हाला प्राथमिक तपासात समजले, परंतु या भागात गणपतीची गर्दी असल्याने आम्हाला त्याचा शोध लागला नाही, असे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर रेल्वे स्टेशनवर त्याचा शोध घेण्यास सुरूवात केली, त्यानुसार आम्ही जीआरपी-रेल्वे पोलिसांना या घटनेची माहिती देत, असा मुलगा दिसल्यास आम्हाला कळवा,अशी सूचना दिल्याचेही पोलिसांनी नमूद केले. अनेक दिवस पोलिस त्याचा शोध घेत होते.

पीएसआय सचिन भोरसे यांच्या नेतृत्वाखाली शोध मोहिमेसाठी तैनात करण्यात आलेल्या पथकातील अधिकाऱ्यांना तो मुलगा दादर रेल्वे स्थानकावर दिसला. सुरुवातीला तो प्लॅटफॉर्मच्या बेंचवर बसलेला होता, नंतर तो चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढला. प्रभादेवी, मरीन लाइन्स, चर्चगेट या स्थानकांवर उतरायचा आणि नंतर तो परत दादर स्टेशनवर परत यायचा. एफसीटी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे प्लॅटफॉर्मच्या वेगवेगळ्या भागात किंवा विविध रेल्वे स्थानकांवरून त्याचे स्कॅनिंग करण्यात मदत झाली, असे पोलिसांनी सांगितले. परंतू त्याला लगेच पकडण्यात यश मिळत नव्हते, तो निसटत होता. अखेर बुधवारी सकाळी तो दादर रेल्वे स्थानकाच्या बाहेर पडल्याचे दिसल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. आणि सुखरूपरित्या त्याच्या आई-वडिलांकडे त्याला सोपवण्यात आले.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.